Breaking News
Home / मराठी तडका / ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचे अ का उं ट झाले हॅ क, दिली स्वतः व्हिडिओद्वारे माहिती

ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचे अ का उं ट झाले हॅ क, दिली स्वतः व्हिडिओद्वारे माहिती

अमृता धोंगडे म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी सुमी उर्फ मिर्सेस मुख्यमंत्री. मिथुन नावाच्या चित्रपटातून मुख्य भूमिका केल्यानंतर तिला मिळाली मिर्सेस मुख्यमंत्री हि मालिका. तिच्या ठसकेबाज अभिनयाने सुमी या व्यक्तिरेखेसाठी आपण अगदी योग्य आहोत हे तिने दाखवून दिलंय. अप्लावधीतच मी मिरवणार, सगळ्यांची जीरवणार म्हणत ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. इंस्टाग्रामवरती तर तिचे ७७,००० इतके फॉलोवर्स होते. हो होते म्हणायची वेळ २८ ऑगस्ट ला आली. काय घडलं असं अघटीत? वाचा तर मग.

तर झालं असं कि अमृताला इंस्टाग्रामवरती एक मेसेज आला. तो मेसेज अकाउंट वेरीफिकेशन साठी असल्याचं तिला सांगण्यात आलं. वरवरची माहिती वाचता, तिचा विश्वास बसला. समोरील व्यक्तीकडून मग व्हॉटसअप वर संपर्क साधला गेला. बोलता बोलता तिला एक लिंक दिली गेली. लिंक युज करताना , अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटचा युजरनेम आणि पासवर्ड वापरला. या दरम्यान अमृताला, आपलं इंस्टाग्राम अकाउंटवर लॉगइन करता येईना. तिला शंका आली. पण तो पर्यंत ते अकाउंट समोरील व्यक्तीच्या म्हणजे हॅकरच्या ताब्यात गेलं होतं. आणि जसे हॅकर करतात तसचं त्यांनीही केलं. पैसे मागितले.

पण अमृता मात्र यातून तोपर्यंत सावरली होती. अचानक झालेल्या या प्रकाराने बावरून जाण्यापेक्षा तिने, पैसे द्यायचे नाहीत असं ठरवलं. आणि जे कोणत्याही सुजाण नागरिकाने करावं ते केलं. कोल्हापूर येथील सायबर क्राईम च्या शाखेत तिने तक्रार नोंदवली. पोलिसांनी आपला तपास एव्हाना सुरु केला आहेच. आणि हे सगळं तिने सांगितलं ते तिच्या नवीन इंस्टाग्राम अकाउंटवरून. amrutadhongade_official हे नवीन अकाउंट तिने २९ ऑगस्टला सुरु केलंय. त्यातली पहिली पोस्टच मुळात आहे ती हि सगळी माहिती देणारा विडीयो. आणि अजून एक विडीयो तिने शेयर केला काही दिवसांपूर्वी तो याच संदर्भात.

ती त्यात असं म्हणते कि, तिच्या इतर मित्र, मैत्रिणींना जे मागील अकाउंटवर सुद्धा होते त्यांनाही एक लिंक शेयर करणारा मेसेज आला आहे. तेव्हा सगळ्यांना सावध करण्यासाठी तिने हा विडीयो अपलोड केला आहे. तसचं त्या जुन्या अकाउंटला रिपोर्ट करण्याचं आवाहनही तिने यानिमित्ताने केलं आहे जेणेकरून इतर कोणाला अजून त्रास होऊ नये. तिच्या जुन्या अकाउंटचे हॅकरने नाव बदलून @copyrightdirect असे ठेवले. परंतु आता चाहत्यांनी केलेल्या रिपोर्टमुळे तिचे हे हॅक झालेले अकाऊंट डिलीट करण्यात यश मिळाले आहे, असे दिसत आहे.

खरं तर, एवढ्या जोशात चालणाऱ्या मालिकेत काम करणं, मानसिकदृष्ट्या थकवा निर्माण करतं. आणि त्यात असं काही घडलं कि मनस्ताप होतो तो वेगळाच. पण अमृता यातून सावरताना वाटते आहे. येत्या काळात, “मिथुन” आणि “मिर्सेस मुख्यमंत्री” यांची हि मुख्य अभिनेत्री अजून जोमाने काम करेल आणि सध्या तिचे विखुरलेले फॉलोवर्ससुद्धा परत येतील यात शंका नाही. येत्या काळातील यशासाठी तिला टीम मराठी गप्पा कडून खूप खूप शुभेच्छा ! (Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *