Breaking News
Home / मराठी तडका / ह्या लोकप्रिय मराठी मालिकांचा हिंदीमध्ये रिमेक बनवला गेला, नंबर ५ मालिका खूप गाजली होती

ह्या लोकप्रिय मराठी मालिकांचा हिंदीमध्ये रिमेक बनवला गेला, नंबर ५ मालिका खूप गाजली होती

मनोरंजन विश्वात नवनवीन कलाकृती या येत असतात. यातील काही कलाकृती या इतर काही कलाकृतींवर आधारित असतात. अनेक वेळेस या मूळ कालाकृतींमधील कथा, पात्र, त्यांना मिळालेली प्रसिद्धी ही काही करणं असू शकतात. यात इतर माध्यमांप्रमाणेच मालिकांचीही समावेश होतो. आज आपण आपल्या लेखातून अशाच काही मालिकांचा आढावा घेणार आहोत ज्या मालिका मराठीतील मालिकांवरून बनवल्या गेल्या तसेच इतर भाषिक मालिकांवरून बनवलेल्या मराठी मालिकांचीही आपण यात आढावा घेऊ.

आई कुठे काय करते – अनुपमाँ
सध्या तेजीत असलेल्या मालिकांमध्ये ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची प्रसिद्धी अतिशय वाखाणण्याजोगी आहे. मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी या मालिकेतील मध्यवर्ती भूमिका अतिशय खुबीने साकार केली आहे. या मालिकेच्या धर्तीवर हिंदीत अनुपमाँ ही मालिका दाखल होते आहे. यात रुपाली गांगुली या मध्यवर्ती भूमिकेत आहेत. मराठीत या मालिकेत मिलिंद गवळी हे मधुराणी यांच्यासमवेत मुख्य भूमिकेत आहेत. तर हिंदी मालिकेत सुधांशु पांडे हे रुपाली यांच्या समवेत मुख्य भूमिकेत दिसतील.

रंग माझा वेगळा – कार्तिक पूर्णिमा
रंग माझा वेगळा ही मालिका नावाप्रमाणेच वेगळा विषय घेऊन दाखल झाली. अनेकांनी या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं. या मालिकेत अनेक प्रथितयश कलाकार हे कार्यरत आहेत. यातील हर्षदा खानविलकर यांची व्यक्तिरेखा ही त्यांच्या इतर व्यक्तीरेखांप्रमाणेच गाजते आहे. या मराठी मालिकेच्या धर्तीवर सध्या कार्तिक पूर्णिमा या नावाने एक मालिका सुरू झाली आहे. यात पौलोमी दास यांनी मध्यवर्ती भूमिका साकार केली आहे तर रेश्मा शिंदे हिने मराठी मालिकेत मुख्य भूमिका लोकप्रिय केली आहे.

होणार सून मी ह्या घरची – सतरंगी ससुराल
जान्हवी, श्री आणि सहा सासूबाई यांची कथा मराठी मालिकेच्या प्रेक्षकांनी खूप वर्षे अनुभवली. या मालिकेतील श्री जान्हवी ही जोडी तर आजही काहींसाठी प्रेक्षकप्रिय आहे. त्या मालिकेची प्रसिद्धी एवढी होती की जान्हवीने घातलेलं मंगळसूत्र हे खूप प्रचलित झालेलं होतं. या लोकप्रिय मराठी मालिकेवर आधारित सतरंगी ससुराल ही मालिका नंतर हिंदी भाषेत तयार झाली होती. या मालिकेत विहान आणि आरुषी ही पात्रे अनुक्रमे श्री आणि जान्हवी यांच्या जागी होती. मराठीत अर्थातच ह्या लोकप्रिय व्यक्तिरेखा शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी साकार केल्या होत्या. तर हिंदीत रविश देसाई आणि मुग्धा चाफेकर हे मुख्य कलाकारांच्या भूमिकेत होते.

पुढचं पाऊल – साथ निभाना साथीयां
वर हर्षदा खानविलकर यांचा उल्लेख झाला आणि त्यांच्या अक्कासाहेब या भूमिकेची अनेकांना आठवण झाली असेल. मनोरंजन क्षेत्रातील एक अजरामर व्यक्तिरेखा म्हणजे अक्कासाहेब. या व्यक्तिरेखेसोबतच इतर व्यक्तिरेखा आणि मालिकेचं कथानक यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. ही मालिका साथ निभाना साथीयां या हिंदी मालिकेवर बेतलेली होती. पुढचं पाऊल या मालिकेत जुई गडकरी ही मुख्य भूमिकेत होती तर साथ निभाना साथीयां मध्ये देवोलीना भट्टाचारजी हिने मुख्य नायिका साकारली होती.

देवयानी – मन की आवाज प्रतिज्ञा
पुढचं पाऊल या मालिकेप्रमाणे अजून एक मालिका अतिशय प्रसिद्ध झाली ती म्हणजे देवयानी. शिवानी सुर्वे या लोकप्रिय अभिनेत्रीने या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकार केली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेची मोहिनी आजही प्रेक्षकमनावर कायम आहे. ही मालिका हिंदीतील मन की आवाज प्रतिज्ञा या मालिकेवर बेतलेली होती. पूजा गोर या अभिनेत्रीने हिंदीत मुख्य नायिका साकार केली होती.

असावा सुंदर स्वप्नांचा बंगला – उतरन
रंग माझा वेगळा प्रमाणे सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे असावा सुंदर स्वप्नांचा बंगला. ही मालिका तेवढीच लोकप्रिय झालेल्या उतरन या मालिकेवर आधारित होती. टीना दत्ता, रश्मी देसाई या आघडीच्या कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत होत्या. तर रश्मी अनपट, जुही पटवर्धन, संयोगीता भावे या ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होत्या.

मानसीचा चित्रकार तो – दिया और बाती हम
मानसीचा चित्रकार तो या मालिकेने स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग बनवण्यात यश मिळवलं होतं. या मालिकेतील कथानक, पात्र यांमुळे या मालिकेस मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग लाभला होता. ही मालिका दिया और बाती हम या हिंदी सुप्रसिद्ध मालिकेवर आधारित होती. मानसीचा चित्रकार तो या मालिकेत ऋत्विक केंद्रे आणि अक्षया गुरव हे मुख्य भूमिकेत होते. दिया और बाती हम या मालिकेत दीपिका सिंघ, अनस रशीद हे मुख्य भूमिकेत दिसून आले होते.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *