सध्या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या बातम्यांनी आपले व्हॉट्सअप स्टेटस अगदी भरून गेले असतील. हाच ट्रेंड सध्या मनोरंजन विश्वातही आहे हे वेगळे सांगणे न लगे. मराठी गप्पाच्या वाचकांना तर आमची टीम वेळोवेळी या बातम्या देत असतेच. काही काळापूर्वी सई लोकूर रॉय हिचं लग्न असो वा करण बेंद्रे या अभिनेत्यांचं लग्न, तसेच मानसी नाईक हिचा साखरपुडा. मराठी गप्पाच्या नियमित वाचकांनी यासंदर्भातील लेख गेल्या काही काळात नक्कीच वाचले असणार. एकूणच काय तर सध्या मंगल कार्यांचा माहोल जोमात आहे. यात अजून एका सेलिब्रिटी ची भर पडली आहे. काही काळापूर्वी या सेलिब्रिटीच्या साखरपुड्याबद्दल आपण मराठी गप्पावरून वाचलं असेलंच.
ही सेलिब्रिटी म्हणजे कार्तिकी गायकवाड. आपल्या उमद्या गाण्याने लोकप्रिय ठरलेली ही गायिका आता लग्नबंधनात अडकली आहे. प्रेक्षकांनी तिला लिटिल चॅम्प्स मधून पहिल्यांदा पाहिलं. तिच्या वडिलांकडून म्हणजे कल्याणजी गायकवाड यांच्या कडून तिने गाण्याचे धडे घेतले होते. त्यांचा पुरेपूर उपयोग तिने सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स च्या मंचावर केला आणि विजेती झाली. पुढे भावगीतं, सिनेमांसाठी, मालिकांसाठी गायन करत करत तिचा प्रवास चालू होता. पंढरीच्या वारीनिमित्त काही वाहिन्यांवर ती सूत्रसंचालन करतानाही दिसे. प्रेक्षकांनी तिला खऱ्या अर्थाने घडताना पाहिलं. ती आपसूक लोकप्रिय होत गेली. तिच्यावरील या प्रेमामुळे तिच्या साखरपुड्याची बातमी आल्यावर कार्तिकी आणि नवरदेवावर म्हणजेच रोनीत पिसे या जोडीवर आशीर्वादाचा वर्षाव झाला. रोनीत हा पेशाने इंजिनियर असून तो व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे. त्याचा आणि कार्तिकी हीच एक गोड व्हिडियो त्यांच्या साखरपुड्या प्रसंगी त्यांनी अपलोड केला होता, ज्याचं प्रत्येकाने कौतुक केलं.
साखरपुड्यानंतर आता तिचं नुकतंच लग्न पार पडलं आहे. तिच्या लग्नसोहळ्याला अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. त्यात लक्ष वेधून घेत होते ते तिचे लिटिल चॅम्प्स मधील सह गायक कलाकार. तसेच संगीत क्षेत्रातील दिग्गजांची वावर होताच. राहुल रानडे यांची विशेष उपस्थिती दिसून आली. तसेच अनेक अभिनेत्रीही उपस्थित होत्या. प्राजक्ता गायकवाड हिची उपस्थितीही या लग्न सोहळ्याला होती. मराठी गप्पाच्या टीमकडून कार्तिकी आणि रोनीत या नवीन जोडीला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !
वर नमूद केल्या प्रमाणे मराठी गप्पाने वेळोवेळी कलाकारांच्या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या बातम्या आपल्या वाचनासाठी आणल्या आहेत. आपल्याला त्या आत्ता वाचायच्या असल्यास आपण वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शन चा वापर करा. त्यात साखरपुडा असं लिहून सर्च केल्यास आपल्याला हे लेख मिळतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक होण्यासाठी मनापासून धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)