Breaking News
Home / मनोरंजन / ह्या वधूचा डान्स होतोय खूपच लोकप्रिय, बघा किती अप्रतिम डान्स केला आहे तो

ह्या वधूचा डान्स होतोय खूपच लोकप्रिय, बघा किती अप्रतिम डान्स केला आहे तो

आपली टीम सध्या बऱ्याच गोष्टींमध्ये व्यस्त आहे. तशी ती एरवी ही व्यस्त असतेच. पण आता आपली दैनंदिन कामं तर आहेतच. सोबतच अनेक मित्रमंडळींची लग्न ही आहेतच. त्यात बहुतांश लग्न ही ऐन आठवड्याच्या मध्यांत आहेत. त्यामुळे आपल्याला निमंत्रण असेल तर उपस्थिती असणं क्रमप्राप्त असतं. थेट जाणं नाही जमलं तर ऑनलाईन उपस्थिती ही असतेच. पण एवढा वेळ काढून लग्नाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन उपस्थिती लावणं म्हणजे तारेवरची कसरतच ठरते. पण मित्रप्रेम आणि लग्नसोहळे बघायची भारी हौस यांपुढे सगळा त्रास अलाहिदा ठरतो.

पण यातूनच नवनवीन अनुभव आपल्याला येतात. अगदी त्या लग्नमंडपात पाऊल ठेवल्यापासून ते निघेपर्यंत एकेक किस्से, संभाषण यातून बरंच काही शिकायला मिळतं. अगदी मानपान कसे राखवेत (किंवा राखू नयेत) इथपासून ते सगळं नियोजन कसं असावं इथपर्यंत सगळं अनुभवता येतं. पण या सगळ्या अनुभवात एक अनुभव मात्र अवर्णनीय असतो आणि खूप आवडून जातो. हा अनुभव म्हणजे जेव्हा नवरा नवरी डान्स फ्लोअरवर डान्स करत असतात ते क्षण होय. कारण लग्नात डान्स करण्याची हौस कोणाला नसते. सगळ्यांनाच नाचून घ्यायचं असतं. काही जण तर फक्त खाणं आणि नाचणं यासाठीही हजेरी लावतात.

पण खुद्द नवरा नवरीने केलेला डान्स जास्त महत्वाचा. कारण त्यांच्या आयुष्यात एक महत्वाची घटना घडत असते. त्यामुळे काही प्रमाणात ते तणावाखाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हाच ताण आणि थकवा जेव्हा ते झुगारून देतात आणि जबरदस्त नाचतात तेव्हा खूप मजा येते. अर्थात ही मजा सगळ्यांनाच हवी असते. त्यामुळे लग्नाच्या व्हिडियोज मध्ये सहसा नवरा नवरीच्या डान्सचे व्हिडियोज जास्त प्रमाणात वायरल झाल्याचे दिसून येतं. आता आज आपल्या टीमने पाहिलेल्या वायरल व्हिडियोचं उदाहरण घ्या. हा व्हिडियो आजच्या घडीला दहा ते अकरा महिन्यांपूर्वी अपलोड केला गेला होता असं प्रथमदर्शनी दिसून येतं. या काळात या व्हिडियोला तब्बल २.३ करोडहुन अधिकांनी पाहिलेलं आहे. तसेच ६.१ लाखांहून अधिकांनी लाईक केलेला हा व्हिडियो आहे. त्यावरून आपल्याला या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. या व्हिडियोत आपल्याला एक गोड जोडपं दिसून येतं. त्यांच्या स्वतःच्या लग्नात ते डान्स करत असतात.

अर्थात त्यातही नवराई एकदम मस्त जोमात डान्स करत असते. तर नवरोबा तिला प्रोत्साहन देत असतात. त्या दोघांचा उत्साह आणि ऊर्जा ही गगनाला भिडणारी असते हे नक्की. कारण त्यांच्या या उत्साहपूर्ण वावरण्यानेच त्यांचा डान्स उत्तम होतो. आणि जी गोष्ट उत्तम ती सहसा वायरल होतेच. त्यात हे दोघेही त्यांच्या लग्नाच्या पेहरावात एकदम सुंदर दिसत असतात. त्यामुळे ही जोडी एकदम लक्षात राहते. बरं हा व्हिडियो खरं तर शॉर्ट व्हिडियो आहे. पण त्यांचा डान्स बघून हा व्हिडियो थोडा जास्त वेळेचा असता तर किती बरं झालं असतं अस वाटून जातं. पण ठीक आहे. कारण जे उपलब्ध आहे त्यातही मजा येतेच आहे की. आपणही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला आवडला असणारच. आपण जर हा व्हिडियो नसेल बघितला तर जरूर बघा. आपला वेळ नक्कीच आनंदात जाईल हे नक्की.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.