सध्या परीक्षांचा काळ चालू आहे. ऑफलाईन असो वा ऑनलाईन असो, परीक्षा या यथावकाश होतीलच. मग त्यानंतर येतील त्या सुट्ट्या आणि सोबतच लग्नांचा काळ ! आता लग्न म्हंटलं की मग समारंभ आले आणि त्यातील रंगेबीरंगी कार्यक्रम ही आलेच आता हे सगळं असल्यावर त्यांचे वायरल व्हिडियोज ही होणारच. ते अर्थात यथावकाश प्रसिद्ध होतीलच. पण तोपर्यंत लग्नाची आणि त्यातील धमाल मस्तीचा अनुभव कसा घेणार? याला उत्तर आहे आपल्या टीमचे लेख !
आपली टीम अगदी सातत्याने विविध विषयांवर लेखन करत असते. त्यातही लग्नाचे वायरल व्हिडियो हा तर आमचा आणि आपल्या वाचकांचा अगदी आवडता विषय आहे. याआधीही या विषयावर आम्ही विपुल लेखन केलेलं आहे. मध्ये फक्त थोडे दिवस विश्रांती होती. जरा थोडा बदल म्हणून ! पण आता आपली टीम पुन्हा एकदा नव्या दमाने विविध वायरल व्हिडियोज वर लेख लिहिण्यास सज्ज झाली आहे. आता आपल्याला एखादी गोष्ट हवी असली की कायनात वगैरे आपल्या मदतीला येतच असते. याचाच प्रत्यय आज आम्हाला आला. लग्नाचा वायरल व्हिडियो हवा म्हणून बघायला सुरुवात केली आणि चट्कन एक व्हिडियो गावला सुदधा ! हा व्हिडियो कधीचा असेल याविषयी कल्पना नाही. पण त्यातील मनोरंजन हे आजही बघणाऱ्याला आवडून जातं.
पण हे मनोरंजन आहे काय? तर यात आहे एका नव्या नवरीने तिच्या नवऱ्यासाठी केलेला एक अप्रतिम डान्स आणि त्याने त्या डान्सला दिलेला गोड असा प्रतिसाद ! व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला हे नवरेबुवा हॉलच्या एका बाजूला बसलेले दिसून येतात. पाठीमागे करवल्या असतातच. सोबतच इतरही मंडळी असतात. हे नवरेबुवा आणि बाकीची मंडळी ही परदेशी वाटत असतात. तर नवरी मुलगी ही भारतीय वंशाची वाटत असते. या सगळ्यांसमोर ही ताई अगदी आत्मविश्वासाने उभी असते. तिचा हाच आत्मविश्वास तिच्या पुढील दोन्ही परफॉर्मन्स मधून ही प्रतीत होतो. तिचा पहिला डान्स परफॉर्मन्स हा ‘मैं मस्तानी हो गयी’ या प्रसिद्ध गाण्यावर असतो. अगदी सुरुवातीपासूनच तिच्या डान्स स्टेप्स बघून तिला डान्सची आवड असावी हे कळून येतं. तिचं मुरडण, गिरकी घेणं यातून या परफॉर्मन्स मध्ये रंग भरत जातात. आपण डान्सचे चाहते म्हणून हा परफॉर्मन्स बघत असतो आणि दाद देत असतो. तिथे भावोजींची तर पूर्ण विकेट गेलेली असते. ते कौतुक, प्रेम आणि बऱ्याचश्या समिश्रित भावाने हा डान्स बघत असतात. पण एवढ्यावरच गोष्ट संपलेली नसते. अजून एक परफॉर्मन्स बाकी असतो. हा डान्स परफॉर्मन्स ही जबरदस्त होतो.
कारण अर्थातच या ताईंचा मस्त डान्स होय. बरं एक डान्स केला तरी माणूस थकून जातो हो ! पण या ताईंच डान्सवर आणि भावोजींवर असलेलं प्रेम या सगळ्याला पुरून उरतं. या ताई हा परफॉर्मन्स ही जबरदस्त ऊर्जा वापरत सादर करतात. हे दोन्ही परफॉर्मन्स इतके जबरदस्त असतात की उपस्थितांना त्यांचं चित्रीकरण करण्याचा मोह आवरत नाही. अर्थात आपल्या पर्यंत प्रोफेशनल व्हिडियोग्राफर ने चित्रित केलेला व्हिडियो येतो. ज्यांनी कोणी हे काम केलेले आहे त्यांचं कौतुक करायला हवं. कारण विविध बाजूंनी हे चित्रीकरण करणं आणि त्यात अपेक्षित परिणामकारकता आणण महत्वाचं असतं. हे या कलाकाराला जमलं आहे. त्यातही नवरदेवाच्या खांद्यावरन घेतलेला शॉट हा तर अप्रतिम म्हणावा असाच आहे. त्यात झुम आणि फोकसचा खूप छान वापर केला आहे. आपणही हा व्हिडियो एव्हाना बघितला असेल तर आपल्याला ही जाणवला असेल. अशा आणि बऱ्याच छोट्या मोठया गोष्टींनी हा व्हिडियो बनला आहे. पण त्यावर गोड कळस चढतो तो शेवटच्या काही सेकंदात ! अर्थात आता या काय घटना आहेत ते आपण स्वतः बघायला हवं ! कारण त्याविषयी आम्ही इथे लिहिलं तर भ्रमनिरास होईल. मजा निघून जाईल. पण तुम्ही म्हणाल ही मजा घ्यायला व्हिडियो आहे कुठे? आहे ना !आपली टीम हा व्हिडियो खाली शेअर करेल. आपण हा व्हिडियो नक्की बघा. आपल्याला संपूर्ण व्हिडियो आवडून जाईल हे नक्की !
बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :