Breaking News
Home / मनोरंजन / ह्या वधूने स्वतःच्याच हळदीमध्ये केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या वधूने स्वतःच्याच हळदीमध्ये केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून अस म्हणतात. या म्हणीवरून या दोन्ही गोष्टी साध्य करण्यास किती अवघड असतात हे प्रतीत होतं. बरोबरंच आहे म्हणा ते. कारण या दोन्ही घटना आपल्या आयुष्यात इतक्या महत्वाच्या आणि मैलाचा दगड ठरणाऱ्या असतात की त्या पार पाडताना अगदी निगुतीने सगळं सांभाळावं लागतं. अर्थात अस असलं तरी या दोन्ही गोष्टी तितक्याच प्रमाणात मोठ्ठा आनंद देणाऱ्या आहेत. त्यामुळे कितीही दडपण असलं तरी या दोन गोष्टी मार्गी लागताना आणि खासकरून त्या प्रत्यक्षात येताना आनंद पराकोटीला गेलेला असतो.

आता एवढा आनंद झाला की तो व्यक्त ही केलाच पाहिजे. आणि लग्न म्हणजे एका अर्थाने हा आनंद पदोपदी व्यक्त करण्याची सुवर्ण संधी सुद्धा असते. ज्यांची ज्यांची नजीकच्या काळात लग्न झाली आहेत त्यांना याचा अंदाज असावाच. कारण हल्ली लग्न हे केवळ देवा ब्राह्मणांच्या साहाय्याने करावयाच्या कार्यासोबतच आनंद सोहळा होत चालला आहे. अर्थात या आधीही त्याचं असं स्वरूप होतच. पण बदलत्या काळानुसार त्याची व्यापकता वाढत आहे हे नक्की. त्यामुळे या लग्न सोहळ्यांमध्ये अनेक वेळेस मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल असते. इतकंच काय तर या सगळ्याची मजा खुद्द नवरा नवरी सुदधा घेत असतात. ते ही अगदी लग्न सोहळ्याच्या पहिल्या क्षणापासून.

त्यात आजचा जमाना हा सोशल मीडिया आणि व्हिडियोजचा आहे. त्यामुळे ही सगळी मजा चित्रित केली जाते आणि आपसूक सोशल मीडियावर येते. त्यात ज्यांचं लग्न झालं आहे त्याच जोडीचं सोशल मीडिया अकाउंट असेल आणि फॉलोअर्स असतील तर बघायलाच नको. मजाच मजा. या जोडीने त्यांच्या लग्नात केलेली मजा अनेक जणांना घर बसल्या घेता येते. आता आज आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोचं उदाहरण घेऊ. हा व्हिडियो म्हणजे एका मराठी नवं दाम्पत्याच्या हळदी समारंभातील डान्सचा व्हिडियो आहे. या दोघांचं युट्युब चॅनेल असून त्यावर हा वायरल व्हिडियो बघायला मिळतो. वायरल म्हणजे किती वायरल असेल तर केवळ तीन आठवड्यांत ९.९४ लाख व्ह्यूज या व्हिडियोने मिळवले आहेत. इतक्या गतीने प्रसिद्ध होणारा व्हिडियो आमच्या आज दृष्टीस पडला. त्यातील या जोडीचा डान्स आमच्या टीमला खूप आवडला. या डान्स दरम्यान दिसून आली ती दोघांची मस्त केमिस्ट्री. दादांचा डान्स अगदी अगदी साधा असतो. पूर्ण व्हिडियोभर एक हात उंचावून ते नाचताना दिसतात. कदाचित त्यांना डान्सची तेवढी सवय नसावी. पण अस असलं तरी आपल्याला त्यांचा हा साधेपणा आवडून जातो. त्याचवेळी आपल्याला वहिनी ताईंचा डान्स ही आवडून जातो.

त्यांना मात्र डान्सची भरपूर सवय असावी असं वाटून जातं. कारण पार्श्वगीत म्हणून वाजत असलेल्या गाण्याच्या कडव्यांवर साजेशा स्टेप्स करत त्या नाचत असतात. एवढंच काय तर अनेक वेळा त्या दादांना सुदधा वेगवेगळ्या स्टेप्स करत नाचायला लावतात. त्यामुळे या जोडीचा डान्स बघताना मजा येते. बरं त्यात या व्हिडियोत एक जबरदस्त प्रसिद्ध होत असलेलं गाणं ही आपल्याला ऐकायला मिळतं. ‘देख तुनी बायको कशी नाची रायनी’ हे ते गाणं. आपण नजीकच्या काळात एखाद्या लग्नात गेले असाल तर हे गाणं हमखास आपल्या कानावर पडलं असेलच. अहो आता हा लेख लिहीत असताना ही जवळच एक कार्यक्रम चालू होता. त्यात हे गाणं ही ऐकायला मिळालं होतं. अजब पण दुर्मिळ असा योगायोग. पण यावरून या गाण्याची लोकप्रियता लक्षात यावी. इतकंच काय तर युट्युब वर या गाण्याची लोकप्रियता लक्षात येते. अंजना बरलेकर यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं आहे. या व्हिडियोला ही तब्बल सवा दोन कोटी हुन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आता बोला.

त्यामुळे आज पाहिलेला व्हिडियो हा खरं तर डबल धमाका आहे. ज्यातून मस्त अशा जोडीचा डान्स ही बघायला मिळतो आणि मस्त जबरदस्त अस गाणंही ऐकायला मिळतं. आपण जर हा व्हिडियो बघितलेला असेल तर या दोन्हींची मजा आपण घेतली असेलच. पण आपण हा व्हिडियो नसेल बघितला, तर जरूर बघा. मस्त मजा घ्या. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.