वायरल व्हिडियोज विषयी लिहिणं हे आपल्या टीमला आवडतं. कारण आम्ही लिहिलेले लेख आपण वाचक म्हणून अगदी आवडीने वाचता आणि आम्हाला प्रोत्साहन ही देता. त्यामुळे आपल्याला आवडतील अशा विषयांवर लेख लिहिणं म्हणजे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असते. याच निमित्ताने अनेक डान्स वायरल व्हिडियोज, लग्नातील वायरल व्हिडियोज बघण्याचा योग आला. अर्थात लग्न म्हंटलं म्हणेज त्यातही डान्स हा आलाच. आपल्या टीमने या दोन्ही विषयांवर विपुल लेखन केलं आहे. त्यात बहुतांशी अशा जोडप्यांचा समावेश होता जी सेलिब्रिटी किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नाहीयेत.
पण आज आपल्या टीमला असा एक व्हिडियो बघायला मिळाला ज्यात एक नव्हे तर दोन दोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सना आपल्या बघायला मिळालं. निमित्त होतं ते त्यांच्या रिंग सेरेमनीचं. हे दोघेही एकमेकांशी गेल्या वर्षभरापूर्वी विवाह बंधनात अडकले. त्याआधी झालेल्या रिंग सेरेमनीच्या निमित्ताने नववधूने जो डान्स केला होता तो वायरल झाला होता. तोच व्हिडियो आज आपल्या टीमच्या पाहण्यात आला. आता तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल की ही मंडळी आहेत तरी कोण..
तर या दोघांचं नाव अनुक्रमे सायमा आणि मयांक अशी आहेत. यातील सायमा यांचं एक युट्युब चॅनेल असून त्यातून सायमा या त्यांच्या चॅनेलच्या प्रेक्षकांना मेकअप शी संबंधित टिप्स देत असतात आणि ट्युटोरिअल्स ही करत असतात. तर मयंक हे व्लॉगर आहेत. त्यांचं ही एक युट्युब चॅनेल आहे. दोघेही दिल्लीचे निवासी आहेत. या दोघांची ओळख ही दिल्लीमध्येच झाली अस त्यांच्या व्हिडियोज वरून कळतं. पुढे मैत्री, यथावकाश प्रेम आणि मग गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायमा यांनी आपल्या युट्युब चॅनेल वरून त्या मयंक यांच्या सोबत लग्नाबंधनात अडकणार असल्याचं घोषित केलं. त्यांच्या चाहत्यांना या घोषणेबद्दल उत्सुकता होतीच. सगळ्यांना आनंद ही झाला. तसेच एकदा का हे लग्न लवकरच होणार आहे हे कळल्यावर मग सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती ती त्यांच्या साखरपुडा आणि लग्नाची. मग यथावकाश या दोन्हीचे अनेक व्हिडियोज या गोड जोडप्याने लगोलग आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. त्यातीलच एक व्हिडियो म्हणजे वर उल्लेख झालेला वायरल व्हिडियो होय. हा व्हिडियो जवळपास २६ लाख लोकांनी पाहिला आहे आणि एक लाख लोकांनी लाईक ही केला आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता आपल्या लक्षात यावी.
या व्हिडियोत आपल्याला प्रामुख्याने सायमा या डान्स करताना दिसतात. त्या कॉलेज जीवनात डान्स मध्ये भाग घेत असत अस कळतं. त्याकाळचा एक व्हिडियो त्यांनी स्वतः अपलोड ही केला होता. हीच त्यांची डान्सची आवड आजही ताजी असल्याचं दिसून येतं. तसेच त्यांना सोबत द्यायला इतर ही मुली असतातच. आणि अर्थातच नवरा मुलगा म्हणजे मयंक ही असतातच. या व्हिडियोत नीती मोहन यांनी गायलेलं ‘कीथे रेह गया’ हे गाणं ऐकायला मिळतं. त्यामुळे सायमा यांचा मस्त डान्स आणि त्यासोबत आपलं हे आवडतं गाणं यांमुळे हा व्हिडियो आपल्या लक्षात ही राहतो आणि आपल्या पसंतीस ही पडतो. आपणही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असणार हे नक्की. आपण जर हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर पहा. तुम्हाला छान डान्स परफॉर्मन्स बघायला मिळेल.
तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला आज पाहिलेल्या एका वायरल व्हिडियो वरील लेख. हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :