Breaking News
Home / मनोरंजन / ह्या वासुदे’वांचा आवाज ऐकून खुद्द शंकर महादेवन सुद्धा मं’त्रमुग्ध झाले, बघा हा वायरल व्हिडीओ

ह्या वासुदे’वांचा आवाज ऐकून खुद्द शंकर महादेवन सुद्धा मं’त्रमुग्ध झाले, बघा हा वायरल व्हिडीओ

आजकाल आपण सकाळी उठतो ते सहसा ‘आज आयुष्याने पुढ्यात काय वाढून ठेवलं आहे’ अशा विचारांनी. डोळे उघडले रे उघडले की डोळ्यांसमोर हे विचार येतात आणि मूड अगदी जातोच. पण अनेक वेळेस घरी कोणी संगीत प्रेमी असेल किंवा अगदी आज्जी आजोबा असतील तर मात्र देवाची गाणी ऐकायला मिळतात. ही भक्तिगीते मनाला नकळतपणे शांत करतात. अगदी काही प्रमाणात का होईना. अनेक वेळेस सकाळी ट्रेनच्या प्रवासात आपणच नाही का काही जणांना देवाची गाणी, मं’त्र जप ऐकताना बघतो. कदाचित आपल्यापैकीच अनेक जणं असं करत असतील. पण जेव्हा रेडिओ नव्हता, किंवा कोणतंही नवीन साधनं नव्हती तेव्हा एक व्यक्ती मात्र अगदी नियमितपणे आपल्या दारी येई, तेही भगवंतांचं नामस्मरण करत करत आणि आपली सकाळ अगदी प्रसन्न करत असे. होय आपण बरोबर ओळखलंत. वासुवेद.

आपल्या दारी मोरपिसांची टोपी घालून आपल्या पारंपारिक वेषात येणारे वासुदेव. आपल्या पैकी अनेक जुन्या जाणत्या लोकांना तर गत काळात या वासुदेवाच्या येण्याची सवयच असावी. पण मग आज या वासुदेवाची आठवण का यावी. कारण आहे त्यापाठी. नुकताच एक जुना वायरल व्हिडीओ आमच्या टीमच्या नजरेस पडला. खरं तर या वायरल व्हिडियोची चर्चा तेव्हा खूप झाली होती. पण आमच्या वे’बसाइट वर तेव्हा वायरल व्हिडियोज बद्दल लिहिलं गेलं नव्हतं. पण आज तो योग आला. हा वायरल व्हिडियो आहे सुप्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन आणि त्यांना भेटलेल्या वासुदेवाचा. झालं असं होतं की शंकरजी आपल्या कामात व्यस्त होते. पण जवळच त्यांना एक सुरेल आवाज ऐकू आला. आता जात्याच संगीतकार असल्याने त्यांनी या आवाजातील अवीट गोडी हेरली. हा आवाज होता एका वासुदेवाचा. त्यांचं नाव पोपट विधाते. ते जवळच आपल्या गाण्यात मग्न होऊन पुढे जात होते. शंकर जी त्यांना भेटले. त्यांच्या आवाजाचं शंकरजींना कौतुक वाटलं होतंच. त्यांनी आपल्या सोबत असलेल्या एका व्यक्तीस विधाते यांना गाताना एक व्हिडियो काढा असे सांगितले.

शंकरजी यांची यामागे एकच भावना होती, ती म्हणजे विधाते यांचं गाणं अनेकांपर्यंत पोहोचावे आणि आपल्या देशात असलेल्या या अप्रसिद्ध कलाकारांनाही लोकांनी ओळखावे. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं आणि मग विधाते यांना आपला सुरेल आवाज लोकांसमोर आणावा असे सांगितले. विधाते यांनीही अगदी धीटपणे आपली कला सादर केली. ती केवळ शब्दात वर्णन करणे शक्य नाही. पण हा व्हिडियो पाहण्यापेक्षा ऐकून एकप्रकारचं समाधान मिळतं. मन नकळत प्रसन्न होतं. विधाते विठ्ठलाचं नाम घेत आपला अभंग संपवतात आणि हा वायरल व्हिडियो ही संपतो. पण आपल्याला नकळत एक प्रकारचा प्रसन्नपणा देऊन जातो. काही क्षणात आपल्या मनोवृत्तीत बदल करणाऱ्या विधाते यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! तसेच अशा अप्रसिद्ध व्यक्तींना सगळ्यांसमोर आणणाऱ्या शंकर महादेवन यांचेही धन्यवाद !

आपल्याला हा लेख आवडला असल्यास हा लेख शेअर करायला विसरू नका. तसेच इतर वायरल व्हिडियोज वरील लेख वाचण्यासाठी वे’बसाईटवरील सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात वायरल असं लिहून स’र्च करा. आपल्याला अनेक लेख वाचावयास मिळतील. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *