Breaking News
Home / मनोरंजन / ह्या वृद्ध जोडप्याने ‘मेरे रशके कमर’ गाण्यावर केला अतरंगी डान्स, पाहून हसू आवरणार नाही

ह्या वृद्ध जोडप्याने ‘मेरे रशके कमर’ गाण्यावर केला अतरंगी डान्स, पाहून हसू आवरणार नाही

गेल्या काही दिवसांपासून आजी आजोबांच्या डान्सचे वायरल व्हिडियोज आपली टीम बघते आहे. यातून काही भन्नाट व्हिडियोज हे समोर आले आहेत. त्यातील काही तर इतके आवडले आहेत की त्यांच्या विषयी लिखाण केले जाणार आहे. किंबहुना आजचा लेखही त्यातीलच एक आहे. चला तर मग आपण जाणून घेऊयात की हा व्हिडियो नक्की आहे काय ते !

पण त्याआधी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ही म्हणजे या प्रत्येक आजी आजोबांचं कौतुक करायला हवं. वय मोठं असलं तरीही त्यांच्यातील उत्साह आणि प्रसन्नता कमी झालेली दिसून येत नाही. किंबहुना आयुष्याची वयोमानाने झालेली संध्याकाळ ही आनंदाने उपभोगावी याकडे त्यांचा कल दिसून येतो. आजच्या व्हिडियोत असलेले आजी आजोबा तर याचं एक नंबर उदाहरण आहेत. आता बघा ! काही जोड्यांना पाहून आपण म्हणतोच ना, की यांच्या ऋणानुबंधाच्या गाठी स्वर्गात बांधल्या गेल्या असतील. ही जोडी अशीच काहीशी आहे. अगदी तरुण जोडप्यांनी ही बघत राहावं असा या जोडीचा उत्साह असल्याचं दिसून येतं. त्यात त्यांचे कपडे बघता ते फार श्रीमंत असावेत असं वाटत नाही. पण आहे त्या परिस्थितीत आनंद मानण्याचं कसब त्यांना अगदी जमलेलं दिसतंय. बरं त्यांच्या उत्साहसोबतच त्यांच्यात असलेला खट्याळ स्वभाव ही दिसून येतो. ते ही हा व्हिडियो सुरू झाल्यापासून अगदी काहीच सेकंदात !

कारण व्हिडियो सुरू होतो आणि हे दोघे नाचायला लागतात. खरं तर आपल्याला पार्श्वभूमीवर जे गाणं ऐकायला येतं ते नंतर व्हिडियो एडिटिंग करताना टाकलं गेलं असावं. पण तरीही या दोघांचा डान्स मात्र मन जिंकून जातो. आणि हो तो खट्याळपणाची गोष्ट राहिलीच. ती म्हणजे हे आजोबा चक्क आजींचा गालांवर पप्पी घेतात. त्या क्षणी लक्षात येतं आजोबा वयाने वृद्ध वाटत असले तरी मनाने तरुणच आहेत. बरं जोडी कोणा एकामुळे तयार होते का आणि टाळी एका हाताने वाजते का? उत्तर आहे नाही. तसंच इथेही असतं. आजोबा जेवढे खट्याळ असतात तेवढ्याच आजी सुदधा बिनधास्त असतात. फक्त त्या पप्पी वगैरे घेत नाहीत. पण त्यांचा डान्स तर सुरूच राहतो. बरं हा व्हिडियो काही छोट्या व्हिडियोजने मिळून बनला आहे. बरं त्यामुळे व्हिडियोची मजा निघून जाते का? अजिबात नाही. उलट ती वाढते. कारण या दोघांच्या जोडीचा डान्स अजून बहरत जातो. खरं तर तो काही ठरवून केलेला डान्स नसतो. आपसूक झालेला डान्स असतो. पण कदाचित त्यामुळेच जास्त मजा येते. बरं ही मजा आपल्या टीमने अनुभवली आहे. हा व्हिडियो पाहिला आणि पाहतच राहिलो.

वर उल्लेख केल्याप्रमाणे या आजी आजोबांच्या उत्साहाचं आणि उर्जेचं कौतुक वाटलं. नंतर बघितलं तर लक्षात आलं की हा एकेकाळी वायरल झालेला व्हिडियो आहे. त्याला थोडा काळ उलटला म्हणा ! पण म्हंटलं, या आठवणींना उजाळा दिला तर चांगलंच आहे. आपल्या वाचकांना ही आवडेल. त्यामुळे आपण या लेखाची मजा घेतली आहेच. आता व्हिडियोची ही मजा घ्या. या लेखानंतर हा व्हिडियो आपली टीम शेअर करेलच. आपण हा व्हिडियो एव्हाना बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असेलच. पण नसेल बघितला तर जरूर बघा. आपल्याला खूप आवडून जाईल.

असो. बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.