Breaking News
Home / मनोरंजन / ह्या शाळेतल्या मुलांनी केलेला हा डान्स पाहून तुम्हांला बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या शाळेतल्या मुलांनी केलेला हा डान्स पाहून तुम्हांला बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही, बघा व्हिडीओ

गेल्या वर्षी पहिला लॉकडाऊन सूरु झाला त्याला वर्ष उलटून गेलं. या वर्षात आपण अनेक उलथा पालथी होताना पाहिल्या. आपल्या आयुष्यात अनेक बदल होताना पाहिले. लॉकडाऊन मुळे जसं वर्क फ्रॉम होम ला प्राधान्य मिळालं, त्याचप्रमाणे इतर गोष्टीही बदलल्या. त्यातील एक म्हणजे ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री ही या काळात फोफावली. येत्या काळात तर ऑनलाईन गेमिंग क्षेत्रात भारत महासत्ता असेल असंही भाकीत वर्तवलं जातं. पण एक मात्र खरं की ऑनलाईन गेम्स कितीही खेळले गेले तरी आपण जे मैदानी आणि इतर ऑफलाईन गेम्स खेळत आलो त्यांचं महत्व कधीच कमी होणार नाही. त्यांचं प्रमाण कमी झालंय खरं, पण त्यांना पर्याय नाही हे खरं. आमच्या टीमच्या हाती या ऑफलाईन गेम्स ची आठवण करून देणारा एक व्हिडियो लागला. हा व्हिडियो म्हणजे एका शाळेचे स्नेहसंमेलन असल्याचे दिसून येते.

या स्नेहसंमेलनात छोट्या मुलांचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केलेला असतो. या कार्यक्रमाद्वारे पारंपरिक खेळांची एक झलक प्रेक्षकांना दाखवण्यात येते. सोबत ‘यादों की बारात’ हे अगदी चपखल असं गीतही सुरू असतं. या कार्यक्रमाची सुरुवात होते ती कवयातीने. मग मुली येतात आणि त्यांचं ‘आओ मीना, सुपरसीना’ चालू होतं. मग एक गट येतो जो मामाचं पत्र हरवलं या खेळाची आठवण करून देतो. मग येतात गोट्या, विटी दांडू आणि अगदी कागदी विमानं सुद्धा. प्रेक्षकांना ही संकल्पना प्रचंड आवडलेली जाणवते. आपल्या रम्य बालपणात रमायला कोणाला आवडणार नाही. पण ही तर सुरुवात असते. या पाठोपाठ येतात दोरीच्या उड्या मारून दाखवणाऱ्या मुली. रंगमंचाच्या पुढील भागात दोरीवरच्या उड्या रंगल्या असताना, पाठीमागे खो खो चा खेळ सुरू होतो. प्रेक्षकांचा जल्लोष त्यांना होत असणारा अतीव आनंद दर्शवत असतो. मग अनेक मैदानी खेळ प्रातिनिधिक स्वरूपात दाखवले जातात. अनेक खेळ तर आपल्या विस्मरणात गेल्याचं लक्षात येतं, जेव्हा त्यांना आपण या व्हिडियो मार्फत पुन्हा एकदा पाहतो.

या कार्यक्रमाचा हा मध्यवर्ती भाग. उत्तरार्धात येते ती आपल्या सगळ्यांची लाडकी आंधळी कोशिंबीर. त्याच्या सोबत येते ती पकडा पकडी. आता पकडा पकडी आली की लं’गडी आल्यावाचून थांबते होय, ती ही येते. ही लहान लहान मुलं आपल्याला या कार्यक्रमामार्फत आणि या व्हिडियो मार्फत आपल्या बालपणीचे खेळ दाखवून त्या रम्य काळात घेऊन जातात. हा व्हिडियो उन्हाळ्यात बघत असताना खासकरून आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आठवण झाल्यावाचून राहत नाही. या व्हिडियोच्या शेवटी तर आपल्याला प्रेक्षकांकडून येणाऱ्या टाळ्या शिट्ट्याच ऐकायला येतात. यावरून उपस्थितांना हा कार्यक्रम किती आवडतो हे लक्षात येतं. हा कार्यक्रम ज्या मुलांनी साकार केला त्या सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद आणि ज्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना शोधून काढली त्यांचे मनःपूर्वक आभार.

आपल्याला हा लेख आवडला असल्यास नेहमीप्रमाणे शेअर नक्की करा. तसेच आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही आवर्जून वाचा आणि आवडलेले लेख शेअर ही करा. मराठी मुलांच्या या टीमला आपलं प्रोत्साहन नेहमी मिळू द्या. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *