गॅदरिंग म्हणजे शाळेतील पूर्ण वर्षाचा सुवर्णदिवस. शाळेत असताना आपण या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला स्नेहसंमेलन म्हणत असू. हे स्नेहसंमेलन म्हणजे शाळेतील सगळ्यात मोठा, महत्वाचा उत्सव. शाळेसाठी ही जणू दिवाळीच असते. शाळेतील स्नेहसंमेलन म्हणजे सगळीकडे एक टिपिकल कार्यक्रम असतो. संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम सुरू होणार असतो पण 4 वाजल्यापासून मुले-मुली मेकअप करून आपल्या डान्स/नाटकाच्या वेशात बसलेली असतात. मोठया वर्गातील काही दनगट मुले ही स्वयंसेवक म्हणून काम पाहत असतात. पिटीचे सर किंवा मॅडम रांगोळीपासून तर सत्कार, बक्षिसे अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात. कार्यक्रम शेवटपर्यंत शांततेत पार पडेल, यावरही ते लक्ष ठेवून असतात. ‘प्रोग्रॅम पाच मिनिटांत सुरू होईलच,’ अशी अधून-मधून घोषणा होत असते मात्र तरीही दर 5 मिनिटांनी स्टेजवरचा पडदा तसाच असतो.
पाहुणे येतात. स्वागताला उभ्या असलेल्या मुली त्यांना स्टेजवर घेऊन जातात. टाळ्या वाजतात. सगळे पाहुणे, स्टाफ स्टेजवर स्थानापन्न होतात आणि मग सुरू होतो खरा कार्यक्रम बोले तो गॅदरिंग… मग काही ठराविक गाण्यांवर डान्स होतो. त्याच स्टेप्स तीच गाणी… आजही गॅदरिंगमध्ये वाजतात. हृदयी वसंत फुलताना… हे तर सगळयांना आवडणारं आणि प्रत्येकाला नाचावस वाटणार गाणं… या गाण्याशिवाय कोणतीच गॅदरिंग होत नाही. आमच्यावेळी मात्र एकदम कसा बसा डान्स या गाण्यावर केला जायचा. कुणीतरी डान्स स्टेप्स चुकायच. कुणाचा ड्रेस सुटायचा. कुणाचा या गाण्याचा जोडीदार आलेला नसायचा. असं काय काय करून डान्स पूर्ण व्हायचा. काल असाच एका गॅदरिंगमधील व्हायरल व्हिडीओ आमच्यासमोर आला. गाणं तर आपल्या आवडीचं होतं. पण जेव्हा शाळेतील 5-7 वीच्या मुलांचा हा भन्नाट डान्स बघितला तेव्हा आम्ही आश्चर्यचकित झालो.
मूळ गाण्यात असलेल्या जोडीला लाजवेल, असा अफलातून डान्स या मुलाने आणि मुलीने केला. तुफान एनर्जी, आत्मविश्वास आणि तयारी याच्या जीवावर अख्खी शाळा यांच्यासोबत नाचू लागली. अवघ्या 4 मिनिटात त्यांनी सगळ्यांना आपलं फॅन केलं. तुम्हीही हा व्हिडीओ जेव्हा बघाल तेव्हा तुम्हीही नक्कीच यांचे फॅन व्हाल. सलग 4 मिनिट त्या उत्साहाने नाचणं, म्हणजे काही खायचं काम नाही. उगाचच या जोडीला तब्बल 40 लाख लोकांनी बघितलेलं नाही. यांचा डान्स बघून असं वाटत की, यांना कुठल्यातरी डान्स रिऍलिटी शो मध्ये संधी भेटलाच पाहिजे. हया व्हिडिओ हजारो लोकांनी शेअर केला आहे. मूळ गाण्यातील डान्स स्टेप्स वापरून त्यांनी जो काही डान्स केला आहे, त्याला तोड नाही. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :