Breaking News
Home / मनोरंजन / ह्या शाळेतल्या मुलाचा पहाडी आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, बघा हा वायरल व्हिडीओ

ह्या शाळेतल्या मुलाचा पहाडी आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, बघा हा वायरल व्हिडीओ

मराठी गप्पाची टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेखन करत आली आहे. मग ते मनोरंजन विश्वाशी निगडित बातम्या, कलाकारांच्या कारकीर्दिवरील लेख, वायरल व्हिडियोजवरील लेख किंवा जगभरातील बातम्या असोत. जे जे आमच्या वाचकांना आवडतं ते ते आमची टीम लेखांच्या स्वरूपात सादर करत असते. गेल्या काही काळात आम्ही वायरल व्हिडियोज द्वारे स्वतःची कला सादर करणाऱ्या अनेक नवोदित कलाकारांविषयी लेखन केले आहे. त्या सगळ्याच लेखांना आपण उत्तम प्रतिसाद दिला आहेत. आज याच मांदियाळीतील एक लेख घेऊन आपल्या भेटीस आलो आहोत. हा लेख आहे एका वायरल व्हिडियो वर आधारित. हा वायरल व्हिडियो आहे एका शाळकरी मुलाचा. त्याने गायलेलं गाणं हा या व्हिडियोचा केंद्रबिंदू. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा हा मुलगा एका वर्गात उभा असतो आणि श्रोते म्हणून त्याचे शिक्षक आणि वर्गमित्र असतात.

त्याचं गाणं सुरू होतं तेच मुळी त्याच्या वरच्या पट्टीतील स्वरांनी. अक्षय कुमार, परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘केसरी’ या चित्रपटातील हे गाणं. सुप्रसिद्ध पंजाबी गायक असलेल्या बी. प्राक (प्रतीक बचन) यांनी हे गीत गायलं होतं. बॉलिवूड मध्ये डेब्यु करतांनाचं हे त्यांचं पहिलं गीत. या गाण्यासाठी त्यांना ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ठ गायक म्हणून पुरस्कार मिळाला होता. या गाण्याचे बोल लिहिले होते मनोज मुंतासिर यांनी आणि संगीत संयोजन होतं अर्को प्रावो मुखर्जी यांचं. हे गाणं आपल्या सगळ्यांच्या आवडीचं बनलं ते त्यातील विचारपूर्वक वापरल्या गेलेल्या शब्दांमुळे आणि त्यांना तितक्याच आर्ततेने बी. प्राक यांनी गायल्याने. त्यामुळे जेव्हा जेव्हा हे गाणं आपण ऐकतो तेव्हा त्या त्या गायकाने किती आर्ततेने हे गाणं गायलं आहे, याकडे आपलं लक्ष असतंच. या व्हिडियोतील हा मुलगा अगदी तितक्याच आर्ततेने गाणं गातो. अशा गाण्यांना सादर करताना आपला आवाज ओरडल्यासारखा वाटणार नाही, याची दक्षता घेणं महत्वाचं असतं. कारण तसं झालं तर त्यातील भावना हरवून जाण्याची भीती असते.

पण या मुलाने अगदी संयमितपणे या गाण्याचा अभ्यास आणि रियाज केल्यासारखा वाटतो. आमच्या टीम मधील कोणीही संगीत क्षेत्राशी निगडित नाही. त्यामुळे त्यातील तांत्रिक बाजू अजून उलगडून सांगता येत नाहीत. पण एकूणच हे लोकप्रिय गाणं या मुलाच्या तोंडून ऐकायला खूप छान वाटलं, हे नक्की. प्रत्येक शब्द आणि त्यामागील अर्थ समजून उमजून हा मुलगा गायला, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. त्याच्या सोबतच कौतुक आहे ते त्याच्या शिक्षकांचं आणि त्याच्या मित्राचं. हा मुलगा गात असताना उपस्थित असलेले शिक्षक आणि वर्गमित्र त्याला प्रोत्साहन देताना आपल्या दिसतात. एवढंच नाही तर व्हिडियोच्या अधे मध्ये ही मंडळी या मुलाच्या सुरात सूर मिसळताना दिसतात. जेव्हा गायकासमोरील प्रेक्षक त्याच्या सोबत एकरूप होऊन गाऊ लागतात तेव्हाच त्याला पसंतीची पावती मिळालेली असते. या श्रोत्यांइतका आनंद आपल्यालाही होतोच. त्यामुळे त्यांच्या प्रमाणे आपल्यालाही या मुलाचं कौतुक वाटतं.

मराठी गप्पाच्या टिमकडून या मुलाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! तसेच त्याला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणाऱ्यांचं विशेष कौतुक. आपल्याला हा लेख आवडला असल्यास आम्हाला कमेंट्समध्ये न चुकता तुमच्या प्रतिक्रिया सांगा. तसेच या मुलाच्या गाण्यातील काही सांगीतिक बारकावे आपल्याला कळल्यास त्यांचाही उल्लेख नक्की करा. आपल्या सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.