लावणी म्हटलं की अनेकांना ठेका धरायला आवडतं. त्या लावणीवर धुंद व्हायला आवडतं. सुरुवातीच्या काळातील लावणी आणि आताची लावणी यात मोठा बदल झाल्याचे आपण नेहमीच ऐकतो. ज्येष्ठ संगीतकार राम कदम- गीतकार जगदिश खेबुडकर यांच्या जोडगोळीने अनेक अजरामर लावण्या संगीत क्षेत्राला दिल्या. सध्याच्या काळात अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली लावणी म्हटलं की अनेकांचे पाच थिरकतात.
सध्या चंद्रमुखी या मराठी चित्रपटातील लावणी “चंद्रा” तरुणाईला ठेका धरायला लावत आहे. प्रख्यात अभिनेत्री अमृता खानविलकर हिने या गाण्यात आपल्या नृत्याने बहार आणली आहे. त्यानंतर अनेक लग्नांच्या वरातीमध्ये या लावणीवर ठेका धरणाने नागरिक आपण पाहतो. तसेच सम्पूर्ण गणपती उत्सव या लावणीने गाजवला. अनेक लहान मुलांनी या गाण्यावर डान्स केले. तसेच मधल्या काळात हुबेहूब या गाण्यावर डान्स करणाऱ्या एका छोट्या पैलवाणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
आताही अशाच एका शाळकरी विद्यार्थ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र आता या विद्यार्थ्याने हे गाणं गायलं आहे, ते इतकं अफलातून आहे की, तुम्हीही या विद्यार्थ्याचे फॅन व्हाल. मात्र हा मुलगा कोण आहे, कुठला आहे, याविषयी सर्वांच्या मनात उत्सुकता होती. या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे.
अशी लचकत, मुरडत, झुलवत… आले मी… नुसती धून ऐकली तरी पाय थिरकू लागतात आणि ओठ गुणगुणू लागतात. चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा या गाण्याने सर्वानांच वेड लावलं आहे. आजवर या गाण्यावर अनेकांनी ठेका धरला याचे व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या लहान मुलाने हे संपूर्ण गाणंच गायलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मुलाने चंद्रा गाणं इतकं भारी गायलयं की व्हिडिओ एकदा पाहिल्यावर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहतचं रहावसं वाटत आहे. जयेश खरे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. जिल्हा परिषद शाळेचा हा विद्यार्थी आहे. त्याच्या शाळेतील शिक्षक कृष्णा राठोड यांनी त्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. मुलाचे टॅलेंट पाहून सरांनी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.
जयेश खरेचे शिक्षक कृष्णा राठोड यांनी ही मुळ पोस्ट शेअर केली होती. त्यांनी पोस्ट शेअर करत लिहिले, “श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, करजगाव या शाळेत बदली झाल्यानंतर इयत्ता सहावीच्या वर्गावर गेलो.विद्यार्थ्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील विशेष गुणांची तपासणी करत असताना जयेश खरे नावाच्या विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम गाणं सादर केले.. गाणं ऐकल्यानंतर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं एक वाक्य आठवलं या मातीमध्ये अनेक प्रकारची रत्ने तुम्हाला सापडतील फक्त ती माती ढवळण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. चिमुकल्या जयेशचा हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असून त्यावर लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :