वायरल व्हिडीओ वरील लेख ही मराठी गप्पाची नवीन ओळख बनत चालली आहे. कधी नाव्ह्याला ओरडणारा मुलगा, कधी पाढे चुकीची म्हणणारी मुलं, तर कधी घरी लवकर जाण्यासाठी किंवा शाळेत उशिरा आलेली मुलं असोत. या वायरल व्हिडीओजनी प्रेक्षकांचं मनोनरंजन केलेलं आहेच. असाच एक वायरल व्हिडीओ आमच्या टीमच्या हाती लागला आणि आमची टीम या व्हिडीओला ऐकून मंत्रमुग्ध झाली. हो बरोबर वाचलंत, ऐकून मंत्रमुग्ध. कारण या विडीयो मध्ये एक लहान मुलगी आपल्या सुरेल आवाजात एक स्वागत गीत आपल्याला ऐकवत असते. हे स्वागत गीत ऐकवत असताना तिचं लक्ष संपूर्णपणे गाण्यावर असतं आणि त्यामुळे आपणही आपसूक त्या गाण्याच्या शब्दांवर आणि तिच्या सुरेल आवाजावर लक्ष केंद्रित करतो. अवघ्या दोन मिनिटांचा हा व्हिडिओ आपल्याला अक्षरशः आंनद देऊन जातो.
लहान मुलांची निरागसता आपण नेहमी त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून अनुभवत असतो. या व्हिडीओ मधील ही मुलगी व्हिडिओ संपेपर्यंत अगदी लक्षपूर्वक गात असते, आणि गाणं संपलं की मग मात्र ती हरखून जाते पण तेवढ्यात हा व्हिडिओ संपतो. पण तिच्या सुरेल सुरावटींनी मंत्रमुग्ध झालेला प्रेक्षक तिचं काही नाव वगैरे कळेल म्हणून गाण्याचे बोल आपसूक सर्च करतो. गाण्याचे बोल असतात, ‘तुम्ही गुलाब या जनवनातले’. सुदैवाने या गाण्याच्या इतर व्हिडीओज सोबतच या मुलीविषयी थोडी माहितीही मिळते. या मुलीचं नाव सानिका दीपक बेंडकर. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मध्ये राहणारी ही मुलगी. कुंभार्ली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ती शिकते. तिच्या शिक्षकांना तिचं गाण्याविषयीची आवड ज्ञात असते. एके दिवशी ती गाणं गुणगुणत असताना तिचे शिक्षक हे गाणं रेकॉर्ड करतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतात. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सानिका हीच गोड आवाज सगळ्यांना आवडतो. व्हिडीओज वायरल होतो आणि अनेक प्रथितयश युट्युब चॅनेल्स सानिका हिच्या व्हिडियोला पसंती दर्शवतात. किंबहुना काही जणं त्यांची मुलाखतही घेतात. त्याच मुलाखतींतून ही माहिती मिळण्यास मदत होते.
या प्रसंगी सानिकाचे शिक्षक आणि तिची मुलाखत घेणारे युट्युब चॅनेल यांचे आभार मानावेसे वाटतात. कारण आपल्या आजूबाजूस अनेक जणांमध्ये सुप्त कलागुण असतात. पण अनेक वेळेस आपण त्या कलागुणांना वाव देणं महत्वाचं असतं. सानिका हिच्या शिक्षकांनी घेतलेला पुढाकार यामुळे प्रशंसनीय ठरतो. सानिका हिचा सुरेल प्रवास संगीताचं शिक्षण घेत सुरू होता, असं कळतं. तिचा हा सुरेल प्रवास असाच सुरू राहावा आणि अवीट गोडीची अनेक गीतं आमच्या टीम सकट सगळ्या प्रेक्षाकांच्या कानावर पडु देत हीच इच्छा. सानिकाला तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा! आम्ही तो व्हडिओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पहा. आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपल्याला वर दिलेल्या वायरल व्हिडीओज सारख्या वायरल विडीयोज विषयीचे लेख वाचायचे असल्यास आपण वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करू शकता. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला वैविध्यपूर्ण लेख वाचनास उपलब्ध होतील. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !
बघा व्हिडीओ :