Breaking News
Home / मनोरंजन / ह्या शाळेतल्या मुलीने पुष्पाच्या गाण्यावर केलेला डान्स सोशल मिडियावर जबरदस्त गाजतोय, बघा व्हिडिओ

ह्या शाळेतल्या मुलीने पुष्पाच्या गाण्यावर केलेला डान्स सोशल मिडियावर जबरदस्त गाजतोय, बघा व्हिडिओ

जेव्हा जेव्हा ‘लोक काय म्हणतील?’ हा प्रश्न तुम्हाला पडेल, तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल आणि त्याला लोक काय म्हणतील ही बंधने असतील तर तुम्ही हा व्हिडीओ सेव्ह करून कायमसाठी साठवण करून ठेवा. कारण हा व्हिडीओ एकदम अफलातून आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका मुलीने असला भारी एक्स्प्रेशन्ससह डान्स केला आहे, जे पाहून तुमच्या चेहऱ्यावर आपोआप एक स्माईल येईल. कलेला वयाचं बंधन नसतं, असं म्हणतात हे खरच आहे. विविध वयातील लोक काहीतरी अचाट आणि अफाट कृज दाखवतात, योगायोगानं तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी हे क्षण कॅमेरात कैद केलेले असतात. आणि कालांतराने हे अफलातून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक अफलातून व्हिडीओ आमच्या टीमच्या हाती लागलेला आहे.

‘मैं झुकेगा नहीं…’ हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा : द राइज’ या सुपरहिट चित्रपटातील गाणी, डान्स स्टेप्स आणि डायलॉग्स सर्वत्र चर्चेच आहेत. नेटकरी तर अगदी वाट्टेल तसे रिल्स बनवतायेत. याच पार्श्वभूमीवर एका चिमुकलीने केलेला डान्स सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय. सामी सामी या गाण्यावर केलेला डान्स पाहून खुद्द रश्मिका देखील थक्क झाली. ती तर या मुलीची फॅनच झाली आहे. एवढंच नव्हे तर या मुलीला भेटण्यासाठी ती प्रचंड उत्सुक आहे. तुम्ही देखील या लहान मुलीचा डान्स पाहून हैराण व्हाल.

हा व्हिडिओ एका शाळेतील डान्स रिहर्सलदरम्यानचा असल्याचे दिसत आहे. इतर मुले देखील तिच्यासोबत नाचताना दिसत आहे. याशिवाय, ती गाण्याच्या हुक स्टेपची उत्तम प्रकारे कॉपी करताना दिसली आणि तिने चेहऱ्यावर एक मोहक हास्य कायम ठेवले. मुलीचा हा अफलातून डान्स व्हिडिओ पाहून अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने देखील तिचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मुलीचा डान्स पाहून ती खूप प्रभावित झाली आणि कॅप्शनमध्ये मला या गोंडस मुलीला भेटायचे आहे असे देखील ती म्हणाली आहे. हा व्हिडीओ एका शिक्षकाने शूट केला असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप तरी ही मुलगी कुठली आहे, हे कळले नाही मात्र तिचा भारी भन्नाट असा डान्स मुळे देशभरात ती व्हायरल झाली आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत 18 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. एवढंच नव्हे तर यावर 92 हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी गंमतीशीर कमेंट देखील केल्या आहेत. या 31 सेकंदांच्या व्हिडीओने त्या चिमुकलीला रातोरात स्टार केलं आहे. तिच्या क्यूटनेसमुळे अनेक लोक या चिमुकलीच्या प्रेमात पडले आहे. या मुलीला पाहून तुम्हालाही एखाद्या अशाच अफलातून डान्सरची आठवण येत असेल तर हा व्हिडीओ त्यांना शेअर करा. हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.