Breaking News
Home / मनोरंजन / ह्या शिक्षकांचा आवाज ऐकून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

ह्या शिक्षकांचा आवाज ऐकून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

आपले गुरुजन म्हणजे आपल्याला घडवणारे कुटुंबाबाहेरील पालकच असतात. आपण त्यांच्याकडे पाहत, त्यांचं अनुकरण करत शिकत असतो, वाढत असतो. हे गुरुजन जर चौकस वृत्तीचे, नाविन्याची आवड असणारे, चौफेर माहिती असणारे, कलासक्त असतील तर त्यांचे विद्यार्थी ही तसेच कलासक्त, जीवनाविषयी कुतूहल असणारे बनत जातात. तसेच असे चौकस शिक्षक मग स्वतःच्या विद्यार्थ्यांना आणि स्वतःला सुद्धा अगदी मोकळेपणाने वाव देत असतात. मग त्याच निमित्त कधी तरी या गुरुजनांची कलासक्त बाजू ही बघण्याचा योग येतो. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक व्हिडियो. व्हिडियो तसा अडीच वर्षे जुना आहे. या काळात जवळपास दहा लाखांच्या आसपास व्ह्यूज या विडोयोने मिळवले आहेत. यावरून त्यातील गंमत ही आजही मन प्रसन्न करून जाते हे आपल्याला कळलं असेलच. चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडियो विषयी. हा व्हिडियो आहे साकेत त्रिवेदी यांचा. सध्या आय आय टी येथून व्यवस्थापनाचे धडे गिरवणारे साकेत हे काही काळापूर्वी एका संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते भौतिक शास्त्र शिकवत असत.

तसेच त्यांना गाण्याचीही प्रचंड आवड होती आणि ते गिटार ही मस्त वाजवतात. एकूणच काय तर अभ्यासू असण्यासोबतच ते कलासक्त सुद्धा आहेत. त्यांच्या शिक्षक म्हणून घडलेल्या कारकिर्दीत एके दिवशी त्यांनी समोर जमलेल्या श्रोत्यांना काही छान ऐकवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हा प्रयत्न म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो होय. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा साकेतजी आपल्याला मंचावर बसलेले दिसून येतात. सोबत हातात असते ती गिटार आणि कानाला एक छोटा माईक लावलेला असतो. तर बाजूला अजून एक व्यक्ती बसलेले असतात. त्यांच्या हातात माईक असतो आणि या माईकचा वापर गिटारचा आवाज ऐकू जाण्यासाठी केला जाणार असतो. गाण्याच्या सुरुवातीलाच हे गाणं सगळ्या प्रियकरांसाठी आहे असं साकेत नमूद करतात आणि सगळीकडुन त्याला प्रतिसाद मिळतो. सगळे जण आता साकेत यांना ऐकायला तयार असतात. साकेत गिटारवर तार छेडतात आणि काही क्षण स्वतःसाठी घेतात. याच काळात अजून एक व्यक्ती आपल्याला कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूला आलेली दिसते. जवळच असलेल्या डेस्कच्या इथे ते येऊन उभे रहातात. तेवढ्यात साकेत गाणं सुरू करतात आणि माहोल तयार होण्यास सुरुवात होते.

गंमत अशी की सगळे जण साकेत यांच्या सुरांनी एवढे मंत्रमुग्ध होऊन जातात की आपसूक त्यांच्यासोबत गाऊ लागतात. त्यात, ‘दिल संभल जा जरा’ या ओळींवर तर सगळ्यांचा आवाज स्पष्ट ऐकायला येत असतो. एकूणच काय तर समोर उपस्थितांमध्ये प्रियकरांची उपस्थित अगदी लक्षणीय असते अस म्हंटल्यास वावगं ठरू नये. गंमतीचा भाग सोडला तरी साकेत यांना मिळणारा प्रतिसाद हा अगदी उत्तम असतो. यात थोडासा वाटा मघाशी डेस्कच्या इथे येऊन उभ्या राहिलेल्या व्यक्तीचाही असतो हे मान्य करायला हवं. कारण त्यांनी त्या लाकडी डेस्कवर वाजवलेला काँगो साकेत यांना नकळतपणे मदत करून जातो. अर्थात हे केवळ आम्हीच नाही तर सोशल मीडियावर ज्यांनी ज्यांनी हा व्हिडियो पाहिला आहे त्यांनी त्यांनी बघितलं आहे आणि त्यांचं कौतुक केलं आहे. या व्यक्तीचं नाव आदित्य रघुवंशी असल्याचं कळून येतं. या सगळ्यांचं ज्यांनी चित्रीकरण केलं आहे त्यांचे धन्यवाद मानायला हवेत. कारण त्यांच्यामुळे एक सुरेल व्हिडियो आपल्याला अनुभवता आला. एकूणच काय तर हा व्हिडियो आपल्याला खूप आनंद देऊन जातो. या व्हिडियोत आपल्याला बरीचशी हलचल दिसत नाही. पण जे गाणं आपण साकेत यांच्या आर्त स्वरात ऐकतो ते मनाला स्पर्शून जातं. बरं वाटतं.

आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला आहेच. हा व्हिडियो बघितला आणि वाटलं की आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल. म्हणूनच आजच्या या लेखाचा घाट घातला आहे. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा. कारण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नवनव्या विषयांवर लेखन करायला प्रोत्साहन देतात. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला सतत मिळत राहू दे ही सदिच्छा. धन्यवाद. लेख वाचत राहा, शेअर करत राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *