Breaking News
Home / मनोरंजन / ह्या शिक्षकांचे टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा अद्भुत कलाकारी असलेला हा व्हिडीओ

ह्या शिक्षकांचे टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा अद्भुत कलाकारी असलेला हा व्हिडीओ

कलाकार आणि सोशल मीडिया यांचं अगदी जुनं नातं आहे. ज्यांनी या नवं माध्यमाची ताकद ओळखली त्यांनी याचा अगदी पुरेपूर वापर केलेला आहे. स्वतःची कला प्रेक्षकांसमोर आणण्याचं एक प्रभावी साधन म्हणून आज सोशल मीडिया बघितला जातो. या माध्यमाच्या साहाय्याने अनेक जण स्वतःतील कला आपल्यासमोर सादर करत असतात.

यातही काही कलाकार मात्र अगदी उठून दिसतात हे नक्की. याची कारणे काही वेळेस त्यांनी सादर केलेल्या कलाकृती आणि त्या साकार करण्याची वेगळी पद्धत अशी असू शकतात. त्यातही या कलाकारांनी जर आपल्या मनाला आवडणाऱ्या विषयांना हात घालणारी कलाकृती निर्माण केली तर आपसूक त्याला अजून जास्त प्रतिसाद मिळतो. लोकप्रियता मिळते. तसेच त्यांनी साकार केलेली कलाकृती एखाद्या दिवसाचं औचित्य साधून केलेली असेल वा आपल्याला दिसली असेल तर तिचं आपल्या दृष्टीने महत्व अजून वाढतं. याचाच काहीसा अनुभव आज आमच्या टीमला आणि अनेकांना झाला असणार हे नक्की. याचं कारण आहे एक वायरल होत असलेला व्हिडियो.

हा व्हिडियो प्रसिद्ध झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने पाहण्यात आलेला हा व्हिडियो म्हणजे महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली ठरावी असच वाटलं. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक दादा बसलेले दिसून येतात. त्यांच्या पाठी फळा असतो आणि एकंदर पोशाख हा एखाद्या शिक्षकासारखा असतो. त्यामुळे हे पेशाने शिक्षक असावेत असा अंदाज करायला हरकत नाही. असो. अर्थात ते उत्तम चित्रकार असावेत हे पुढच्या काही क्षणांत कळून येतं. आता सहसा आपण चित्र काढताना आपल्या समोर कॅनव्हास असतो. पण इथे तसं होताना दिसत नाही. इथे हे दादा फळ्याला पाठ करून बसलेले असतात. दोन्ही हातात खडू असतो. व्हिडियो सुरू होतो आणि हे दादा दोन्ही हातांनी चित्र रेखाटण्यास सुरुवात करतात. खरं तर एकाच वेळी उजव्या आणि डाव्या हातावर नियंत्रण ठेवत चित्र काढणं कठीण असतं. ते ही आपल्या पाठीमागे न बघता चित्र काढणं तर अजून कठीण असतं. पण माणसाच्या कलात्मकतेस आणि श्रद्धेस कशाचेही बंधन नसते.

हे दादा प्रत्येक क्षणागाणिक उत्तम चित्र रेखाटत जातात. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला महाराणा प्रताप यांचं रेखाटन सुरू असतं. प्रत्येक रेषेतून या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा आपल्या समोर पूर्ण होताना पाहत असतो. या दोन्ही महापुरूषांविषयी आपल्या प्रत्येकाच्या मनात अपार आदर आणि श्रद्धा आहे. त्यात महाराणा प्रताप यांची पुण्यतिथीचं औचित्य ही असतं. हे चित्र जसजसं पूर्ण होत येतं, तस तसे आपले हात नकळत जोडले जातात. इतिहासाला आपल्या कार्यकतृत्वाने झळाळून टाकणाऱ्या या दोन्ही महापुरुषांना आपण नमन करतो.

हा व्हिडियो संपला आणि तत्क्षणी आपल्या टीमने ठरवलं की यावर एक लेख लिहायचा. कारण आपण तसेही वायरल व्हिडियोज वर लेखन करत असतोच. त्यात ही तर कौतुक करावी अशी कलाकृती आहे. त्यामुळे या विषयावर लेखन केले. आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. या लेखासोबतच आम्ही त्या व्हिडियोला ही शेअर करू. जेणेकरून आम्ही बघितलेली ही उत्तम कलाकृती आपल्याला ही अनुभवता येईल. आपण या कलाकृतीला कदाचित एव्हाना बघितलं ही असेल. नसेल बघितलं तर जरूर बघा. असो. मंडळी, लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमने लिहिलेल्या अन्य विषयांवरील लेखही वाचा. या सगळ्यांना आठवणीने शेअर करा. आपल्या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *