Breaking News
Home / मनोरंजन / ह्या शिक्षकांनी वर्गामध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा सरांचे कौतुक कराल

ह्या शिक्षकांनी वर्गामध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा सरांचे कौतुक कराल

सध्याचं जग हे कंटेंट क्रिएटरचं जग आहे. कंटेंट क्रिएटर म्हणजे सोशल मीडिया अथवा इतर माध्यमातून माहिती लेखी, दृश्य अथवा इतर पद्धतीने मांडणारे. याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणून वेगवेगळे युट्युबर्सचं आपण उदाहरण घेऊ शकतो. सध्याच्या काळात ही मंडळी नव्याने उदयाला आलेले सेलिब्रिटीज आहेत, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. मग ही मंडळी सोशल मीडियावर जो काही कंटेंट तयार करतात त्याविषयी चर्चा होतेच, सोबतच चर्चा होते ती त्याव्यतिरिक्त त्यांनी केलेल्या अनेक बाबींची.

आता एका गुरुजींचं उदाहरण घ्या ना. या गुरुजींना आपण प्रिन्स सर (पी.एस. सर) म्हणून ओळखतो. प्रिन्स सिंघ असं त्यांचं नावं. अतिशय हुशार शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले हे गुरुजी त्यांच्या शिकवणीसाठी जसे प्रसिद्ध आहेत तसेच त्यांच्या स्वभावातील काही इतर गोष्टीही मुलांना आणि नेटकर्यांना आवडतात. या बाबीतील एक बाब म्हणजे त्यांच्या रहस्यमय गोष्टी सांगण्याची कला आणि दुसरा त्यांचा दिलखुलास डान्स. यातील रहस्यमय गोष्टींसाठी त्यांचं एक सोशल मीडियावर चॅनेल सुद्धा आहे असं कळतं. तर त्यांच्या डान्सचे अनेक व्हिडियोज ही प्रसिद्ध झालेले आहेत.

सुदैवाने आपल्या टीमने त्यातील एक व्हिडियो पाहिला. हा व्हिडियो होता २०१९ साली साजऱ्या झालेल्या शिक्षक दिनाच्या (टीचर्स डे) निमित्ताने झालेल्या एका छोटेखानी समारंभाचा. यात विविध शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत मस्त मजा करताना दिसून येतात. अर्थात शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं बदलत्या काळानुसार काही बाबतीत अनौपचारिक होत चाललं आहे याचं हे लक्षण. या समारंभात प्रिन्स सरांनी ही डान्स केला होता. त्यांचा हा डान्स त्यांच्या इतर व्हिडियोज प्रमाणे वायरल ठरला होता. या छोटेखानी व्हिडियोत प्रिन्स सर आपला मस्त डान्स करताना दिसतात. सुरुवातीस गाण्याशी हळूहळू एकरूप होतात. एकदा ते झालं की मग मात्र त्यांची गाडी सुसाट सुटते. त्यात त्यांचं पदलालित्य म्हणजे लेग मुमेंट्स म्हणजे वाखाणण्याजोगी गोष्ट. त्यांना डान्सची आवड आणि सवय असावी असं यातून दिसून येतं. त्यांचा डान्स जस जसा पुढे सरकतो तस तसा विद्यार्थ्यांचा उत्साह आणि प्रतिसाद ही वाढत जातो. हा प्रतिसाद इतका असतो की केवळ ४०-५० सेकंदांचा हा व्हिडियो पुन्हा पुन्हा बघावा असं वाटतं.

ह्या तरुण शिक्षकाने केलेला डान्स आपल्याला आवडून जातो. त्यांच्या इतर व्हिडियोजमधून ते विद्यार्थ्यांना प्रिय असल्याचं दिसून येतंच. त्यात त्यांना असणारी डान्सची आवड हा ही एक महत्वाचा दुवा असणार हे नक्की. आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला. आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याला ही तो आवडला असेलच.

त्याचप्रमाणे आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार अशी खात्री आहे. कारण आपली टीम जेव्हा जेव्हा लेख प्रदर्शित करते तेव्हा तेव्हा आपण ते लेख मोठ्या प्रमाणात शेअर करत असता. कमेंट्स मधून आपल्या टीमला प्रोत्साहन देत असता. यातून आम्हाला जी सकारात्मक ऊर्जा मिळते ती विविध विषयांवर लेखन करण्यास चालना देत राहते. तेव्हा आपला हा पाठिंबा येत्या काळातही आपल्या टीमच्या पाठिशी कायम असू द्या ही विनंती. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *