Breaking News
Home / मनोरंजन / ह्या शिक्षकांनी शाळेच्या कार्यक्रमामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या शिक्षकांनी शाळेच्या कार्यक्रमामध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

इतर कोणत्याही कलेपेक्षा नृत्य आणि संगीत या दोन कला आपल्या सगळ्यांना जास्त जवळच्या असतात असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. कारण बहुतांश सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स आणि संगीत यांचा समावेश हा हमखास असतोच असतो. बरं हे केवळ भारतातच नव्हे तर जगातही होताना दिसतं. या दोन्ही कला आपल्याला एवढ्या जवळच्या वाटत असल्याने आपल्या पैकी अनेक जण स्वतः या कलांचं सादरीकरण करत असतात. त्यात हौशी कलाकार असतील तर बघायलाच नको. विविध सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे अशा हरहुन्नरी कलाकारांना पर्वणीच म्हणायला हवी.

अशीच एक संधी साधली ती नेपाळ मधील एका शिक्षकांच्या ग्रुपने. नेपाळ आणि भारतात तिज या नावाने ओळखला जाणारा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आपल्याकडे हरतालिका त्रितीया या नावाने हा सण ओळखला जातो. या सणाचं नेपाळ मध्येही खूप महत्व असतं. यानिमित्ताने नेपाळमधील मंसालु येथील एका बोर्डिंग स्कुल मध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात तेथील शिक्षिकांनी अत्यंत उत्साहात सहभाग घेतला होता.

यात सहभागी तीन शिक्षिकांनी जो अप्रतिम डान्स सादर केला तो पुढे बराच वायरल झाला होता. हाच व्हिडियो आज आपल्या टीमने बघितला आणि म्हंटलं की याविषयी आपल्या वाचकांना सांगायला हवंच. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा कॅमेरामन अगदी फिल्मी स्टाईलने कॅमेरा मंचाच्या पायऱ्यांपासून ते या तिन्ही शिक्षकांवर नेत केंद्रित करतो. मंचावर दोन अतिथी ही स्थानापन्न झालेले असतात. तसेच नृत्यांगना असणाऱ्या शिक्षिका आपापल्या जागी उभ्या असतात. गाणं सुरू होतं आणि मग त्यांच्या एकेक स्टेप्स उलगडत जातात. ‘चिट्टीके भा छु रे’ या सुप्रसिद्ध गाण्यावर या तिघी जणी नाचत असतात. या गाण्याला आतापर्यंत जवळपास दोन करोड लोकांनी पाहिलं आहे यावरून या गाण्याची लोकप्रियता लक्षात यावी. वर म्हंटल्याप्रमाणे गाणं आणि नृत्य एकेक स्टेप प्रमाणे उलगडत जात असत. आपल्याला भाषा कळत नसते, पण त्यांच्या नृत्यामुळे आपण या गाण्याचा आनंद घेत असतो. त्यात अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे या तिघींनाही मंचाच्या मध्यभागी येत डान्स करण्याची संधी मिळताना दिसते.

नाही तर सहसा मध्यभागी उभी असलेली व्यक्तीच पूर्णवेळ मध्ये राहून डान्स करत राहते आणि आजूबाजूला असलेल्या व्यक्ती साईड डान्सर्स ठरतात. पण इथे अस होताना दिसत नाही याचं विशेष कौतुक. तसेच प्रत्येकीने ही मध्यवर्ती भूमिका घेताना स्टेप्सचा ज्या खुबीने वापर केला आहे तो सुदधा कौतुकास पात्र ठरतो. कारण एकमेकांच्या पाठीशी येत तिघीही सरळ रेषेत उभ्या राहत डान्स करतात. आणि क्षणार्धात त्यांनी आपापल्या जागा बदललेल्या असतात.

तसेच प्रत्येकीची जागा बदलून झाल्यावर गाण्याच्या शेवटी पुन्हा त्याच ताई येतात ज्यांनी डान्सची सुरुवात केली होती. त्यामुळे गाण्याची कोरिओग्राफी एकदम परिपूर्ण वाटते. बरं त्या कोरिओग्राफीस या तिन्ही जणी मस्त नाचत न्याय देतात. त्यांचे ठुमके, फेर धरणं आणि नाचताना कलात्मकता दाखवणं हे सगळं होत असत. आपण हा डान्स बघताना एवढे गुंग होऊन जातो की पाच मिनिटं कधी निघून गेली हे कळत सुदधा नाही. बघायला गेलं तर एरवी पाच मिनिटांचा व्हिडियो सुदधा खूप वेळ खाऊ वाटू शकतो. पण त्यातील कंटेंट उत्तम असेल तर ती पाच मिनिटं वेळ सत्कारणी लागला याचं समाधान मिळतं. हेच समाधान हा व्हिडियो पाहताना येतं. आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर आम्ही काय म्हणतो आहोत याची आपल्याला कल्पना आली असेलच. पण नसेल बघितला तर हा व्हिडियो नक्की बघा. आपल्याला जरूर आवडेल.

सोबतच आपल्या टीमने हा जो लेख लिहिला आहे त्याविषयी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. कारण आपल्या प्रतिक्रियांतून आम्हाला प्रोत्साहन मिळतं. नवनव्या गोष्टी शिकता येतात. यांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपले लेख हे दिवसेंदिवस उत्तमोत्तम होत जातात. त्यामुळे आपल्याला ही खऱ्या अर्थाने उत्तम लेखांची मेजवानी मिळत राहते. तेव्हा आपला प्रतिसाद आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि राहील. तेव्हा आपलं प्रोत्साहन आम्हाला मिळत राहू द्या ही सदिच्छा. लेख वाचत राहा, लेख शेअर करत राहा !! धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *