Breaking News
Home / मनोरंजन / ह्या शिक्षकाची मुलांना शिकवण्याची हि अनोखी पद्धत पाहून तुम्ही देखील स’लाम कराल, बघा व्हिडीओ

ह्या शिक्षकाची मुलांना शिकवण्याची हि अनोखी पद्धत पाहून तुम्ही देखील स’लाम कराल, बघा व्हिडीओ

आई वडील यांच्या नंतर गुरूंना आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं स्थान असतं. आपल्या पालकांसोबतच आपल्याला घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. त्यांनी केलेले संस्कार, दिलेलं शिक्षण, केलेल्या शिक्षा या सगळ्यांचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा आणि दीर्घकालीन परिणाम होत असतो. त्यामुळे शिक्षक हे जसे ज्ञानी, अनुभवी, विवेकी हवेत तसेच ते कल्पकही हवेत. कारण पुस्तकातून वाचून सांगणं कोणीही करू शकतं, पण त्यामागील विचार, भावना समजावून सांगू शकतात तेच खरे शिक्षक ठरतात. सुदैवाने आपल्या महाराष्ट्रात अजूनही अनेक शिक्षक विविध क्लुप्त्या वापरून त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देताना दिसतात. अशाच एका कल्पक शिक्षकाचा वायरल व्हिडियो आमच्या टीमने पाहिला.

हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना भारताचा भूगोल आणि त्यातील वैशिष्ट्ये समजावून सांगत असतात. पण हे सगळं वर्गाच्या चार भिंतींऐवजी मोकळ्या पटांगणात चालू असतं. तिथे विद्यार्थ्यांना गोलाकार बसवलेलं आहे, असं वाटतं. पण पूर्ण व्हिडियो पाहिल्यावर लक्षात येतं की त्यांनी मुलांना भारताच्या नकाशाशी साधर्म्य असणाऱ्या आकारात बसवलेलं असतं. त्यांच्या या उपक्रमात त्यांनी मदत घेतलेली असते ती काही विद्यार्थ्यांची. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यात दिसून येतो. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी आणि लक्षात राहण्यासाठी खऱ्या आयुष्यातील उदाहरणं आणि जमेल तेवढा सक्रिय सहभाग असणं केव्हाही उत्तम. या दोन्ही घटकांचा मेळ या गुरुजींनी या उपक्रमात घातलेला दिसून येतो. त्यामुळे मुलांच्या डोक्यात भूगोलासारख्या क्लिष्ट वाटणाऱ्या विषयाची भेळ होत नाही. उलट विविध प्रदेशांची, त्यांच्या देशांतर्गत असलेल्या स्थानांची आणि वैशिष्ठयांची अगदी रीतसर आणि मनोरंजक पद्धतीने माहिती मिळते. यात सहभागी मुलांना सोबत एक कार्ड घेऊन उभं केलेलं असतं.

या कार्डवर प्रत्येक राज्यांची नावे असतात. वर नमूद केल्याप्रमाणे मुलांना विशिष्ट स्वरूपात बसवल्याने कार्ड घेऊन उभी असलेली मुले प्रत्येक राज्याच्या भौगोलिक स्थानानुसार उभी असतात. व्हिडियोच्या सुरवातीस गुरुजी आपल्या महाराष्ट्राविषयी माहिती देतात. मग एखादं कथानक उलगडत जावं त्याप्रमाणे प्रत्येक राज्याची ओळख करून देतात. यात त्यांनी दाखवलेली कल्पकता वाखाणण्याजोगी. प्रत्येक राज्याच्या वैशिष्ठयांचं शब्दांकन करण अवघड ठरू शकतं. पण हे गुरुजी मात्र अगदी सहजगतीने ते करताना दिसतात. पश्चिम भारतापासून सुरू करत ते उत्तर आणि मध्य भारत करत ते पूर्वेकडे जातात. इथुन मग त्यांचा मोर्चा अर्थात वळतो ते दक्षिण भारताकडे आणि मग गोवा राज्याविषयी बोलत बोलत महाराष्ट्रात पुन्हा दाखल होतात. या त्यांच्या संपूर्ण ‘प्रवासात’ मुलं जसा भारताचा भूगोल ‘शिकतात’ तसेच आपलीही ‘उजळणी’ होतेच. या प्रवासात प्रत्येक राज्याची वैशिष्ट्ये समजवून सांगितल्याने या कथानकात रंजकता वाढते. मग होते ती विद्यार्थ्यांची उजळणी.

अर्थात शिक्षकांचं शिकवणं कल्पक असल्याचा परिणाम मुलांच्या उत्तरातून दिसून येतो आणि काही काळात हा व्हिडीओ संपतो. या सगळ्यांत कौतुक वाटतं ते विद्यार्थ्यांचं. त्यांचं वागणं अतिशय शिस्तीचं असलेलं दिसून येतं. पण म्हणून या उपक्रमात असलेला सहभाग कमी किंवा अवघडलेला वाटत नाही. तो या शिक्षकांसारखाच सहज वाटतो. या व्हिडियोतुन मुलांना कसं शिकवलं जावं हे जसे कळतं तसाच आपल्याला काही तरी छान अनुभवल्याचा आनंदही मिळतो. अतिशय कल्पकतेने शिकवणाऱ्या या शिक्षकांचं आणि त्यांच्या आज्ञाधारक विद्यार्थ्यांचं कौतुक करावे तेवढं थोडं आहे. या सगळ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!

हा लेख आवडला असल्यास आपल्या सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तसेच आमच्या टीमने इतरही अनेक मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखही लिहिले आहेत. त्यांचाही आपण आनंद घ्या. मराठी गप्पाचे नियमित वाचक होण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *