Breaking News
Home / मनोरंजन / ह्या शिक्षक जोडप्यांनी शाळेमध्ये केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या शिक्षक जोडप्यांनी शाळेमध्ये केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

जोड्या ह्या स्वर्गात बनलेल्या असतात, असं म्हणतात. आता याविषयी अनेकांची मतमतांतरे असतीलच. काहींना हे योग्य वाटेल. तर काहींना हे म्हणणं पटणार नाही. असो. पण एका गोष्टीवर मात्र सगळ्यांचं एकमत होईल. ही गोष्ट म्हणजे काही जोड्यांना एकत्र बघून या जोड्यांना खरंच स्वर्गात बनवलं आहे, असं वाटल्यावाचून राहत नाही. कारण या जोड्यांचा एकत्र वावर म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा अनुभव असतो. या जोड्यांमध्ये दिसून येणारी प्रेम भावना, त्यांचं ट्युनिंग, प्रसन्न भाव या सगळ्यांमुळे आपल्याला असं वाटणं साहजिक असतं.

बरं अशा जोड्या दिसल्या की केवळ काही क्षणांत त्यांची ओळख पटते आणि हे दोघे ‘एक दुजे के लिये’ बनले आहेत हे स्पष्ट होतं. बरं आज हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आज आपल्या टीमने बघितलेली अशीच एक जोडी. या जोडीचं दर्शन आम्हाला झालं ते एका वायरल व्हिडियोद्वारे. म्हणजे तसा आमच्या टीमने हा वायरल व्हिडियो आधीच बघितला होता. पण त्यावर लेख लिहायचा लिहायचा म्हणून राहून गेला होता. पण म्हणतात ना, की प्रत्येक गोष्टीची स्वतःची म्हणून अशी एक वेळ असते.

आज या व्हिडियो बद्दल लिहायची जणू वेळ आली आहे. असो. तर हा व्हिडियो एका जोडीचा आहे हे आपल्याला कळलं असेलच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हा कदाचित एका शिक्षक दांपत्याचा व्हिडियो आहे, असं वाटतं. कदाचित हे दोघेही एकाच ठिकाणी शिकवत असावेत. त्यावेळी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांनी डान्स केला अस दिसून येतं. त्यांचा हा डान्स परफॉर्मन्स म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला हे दोघेही समोरे दिसून येतात. एखाद्या वर्गातच हा छोटेखानी कार्यक्रम किंवा डान्सची तालीम होत असावी असं वाटतं. व्हिडियो सुरू होतो आणि एक सुप्रसिद्ध गाणं ऐकायला येतं. ‘गोमु संगतीनं’ हे ते सदाबहार गाणं होय. आजही थिरकायला लावेल असंच हे गाणं. या व्हिडियोत याचीही जादू आपल्याला पाहायला मिळते. हे गाणं इतकं सुरेल आणि मजेशीर आहे की यावर समोर आजच्या जोडीसारखी मस्त गोड जोडी डान्स करत असेल तर आपसूक मनमोहक माहोल बनून जातो. याची प्रचिती येते ती उपस्थितांच्या प्रतिक्रियांमधून. कारण एकदा का डान्स परफॉर्मन्स आणि डान्सर्स पसंत पडले की उपस्थित त्या गाण्यात वाहत जातात. हा व्हिडियो याचं उत्तम उदाहरण.

या व्हिडियोत असा एकही क्षण जात नाही जिथे कॅमेऱ्यामागून प्रोत्साहनपर आवाज आले नाहीत. त्यात व्हिडियोच्या दीड मिनिटाच्या आसपास तर अशी काही धमाल यायला सुरुवात होते की विचारू नका. बरं हे सगळं वातावरण इतकं जिवंत वाटतं की हा व्हिडियो नसून आपण त्याच क्षणी उपस्थित आहोत असं वाटत राहतं. यातील मुख्य श्रेय अर्थातच या जोडीला. कारण त्यांच्या डान्स स्टेप्समध्ये त्यांचं मस्त असं ट्युनिंग दिसून येतं. तसेच एकमेकांना सांभाळून घेत पुढे जाण्याची वृत्ती दिसून येते. तसेच त्या क्षणांचा जबरदस्त असा आनंद ते दोघेही घेत असतात. त्यामुळे दोघेही प्रसन्न चित्ताने नाचत असतात. काही क्षणांना तर त्या ताई लाजताहेत असं ही जाणवतं. लाजत नसले तरी दादांच्या मनाला ही आनंद झालेला असतोच. दोघांचा ही हा आनंद पदोपदी जाणवतो. इतकंच नव्हे तर दर क्षणाला वृद्धिंगत होत जातो. त्यामुळे आपसूक आपण सुद्धा या जोडीच्या एकंदर डान्स परफॉर्मन्सचा आनंद घेतो. बरं केवळ एकदा बघून आपलं पोट भरत नाही. आपण हा आनंद पुन्हा पुन्हा घेतो. निदान आमच्या टीमने तर घेतला आहेच. आमच्या टीमने केवळ आनंद म्हणून हा व्हिडियो तीन ते चार वेळा पाहिला आहे. शक्यता आहे की कदाचित आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर यापेक्षा ही जास्त वेळा पाहिला असेल. कारण व्हिडियो आहेच एकदम झकास. तेव्हा आपण अजूनपर्यंत जर हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर बघा. निखळ आनंद मिळवण्याची संधी चुकवू नका.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.