Breaking News
Home / मनोरंजन / ह्या सफेद शर्टवाल्या भाऊंनी हलगीच्या तालावर केला जबरदस्त डान्स, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या सफेद शर्टवाल्या भाऊंनी हलगीच्या तालावर केला जबरदस्त डान्स, बघा हा अतरंगी व्हिडीओ

कोणताही समारंभ असला आणि सोबतीला साजेशी मिरवणूक असेल तर बहार येते. या दोहोंमध्ये उत्साह आणण्याचं काम हे बहुतेक वेळेस वाद्य करत असतात. मग तो ढोल असो, संबळ असो वा अगदी हलगी. ही वाद्य वाजायला लागली की मन आणि मग तन अस काही झुलायला लागतं की विचारू नका. काही जण तर अंगात जणू काही वीज संचारल्यागत नाचायला लागतात. एरवी लाजरीबुजरी वाटणारी माणसं बी एकदम रंगात येऊन नाचायला लागतात. ते ही एकदम ठसक्यात. असाच एक जबरदस्त धमाल व्हिडियो आपल्या टीमने बघितला. मस्त वाटलाच आणि आपल्या वाचकांना त्याविषयी सांगावं अस मनापासून वाटलं. मग काय त्यातूनच आजचा हा लेख लिहिला जातोय ना. चला मग वेळ न घालवता या व्हिडियोविषयी जाणून घेऊयात. हा व्हिडियो एका मिरवणुकीतील आहे असं प्रथमदर्शनी दिसून येतं. आता मिरावणूक म्हंटली की वाद्यांचा आवाज घुमणारच ना. या मिरवणुकीत आपल्याला हलगीचा आवाज घूमताना दिसतो. सोबतीला ढोल ही असतातच. पण हलगी अशी काही कडक वाजत असते ना राव की आपसूक नाचायचं मन करतं बघा.

तिथे असलेल्या लोकांचं काही वेगळं नसतं. तिथला एक भाऊ आणि त्याच्याबरोबर दोन पोरं या हलगी वर असे काही नाचत असतात की जणू काही दह्यात रवी घुसळावी. व्हिडियो सुरू झाल्यापासून आपण त्यांना अगदी उत्साहाने डान्स करताना पाहतो. तरी सुरवाती सुरुवातीला त्यांच्यात आपसातच डान्स चालू असतो. त्यातही हा भाऊ आणि नारंगी शर्टवाल्या मुलामध्ये जुगलबंदी असते जणू. पण भावाचा नादच खुळा. त्याच्या एवढं अतरंगी नाचताच येत नाही त्या पोराला. मग येतं दुसरं पोरगं. तो पण पुढे पुढे करत नाचत असतो. पण भाऊ आज पेटलेला असतोय. अंग पिळवटून पिळवटून डान्स करत असतो. आळोखे पिळोखे देत त्याचा डान्स चालू असतो. पण लक्ष मात्र त्या हलगी आणि ढोलाच्या तालावर असतं. त्याच्या नाचण्याचा कोणत्या ठराविक स्टेप्स नसतात. कारण हा बसवलेला डान्स नसतो. त्याला त्यावेळी जे वाटतं त्यानुसार भाऊ नाचत राहतो. खरं सांगायचं तर आपल्याला पण त्याचा हाच मोकळा ढाकळा डान्स आवडून जातो. कारण दुसऱ्यांना काय वाटेल वगैरे विचार न करता भाऊ स्वतःच्या धुंदीत नाचत असतो. पण ही धुंदी त्याच्या पूरतीच मर्यादित नाहीये. हलगीचा आवाज ऐकला की आपोआप आपलं मन त्यात गुंगून जातं.

आता बघा ना एका मिनिटापेक्षा कमी वेळेचा हा व्हिडियो आहे. पण आपण कित्येकवेळा पाहतो. तसेच या व्हिडियोमुळे हलगी या वाद्याशी निगडित काही आठवणी जाग्या होतात. कारण आपल्या महाराष्ट्रात हलगी हे वाद्य खूपच लोकप्रिय आहे. इतकं लोकप्रिय की अनेक वेळेस समारंभांतून हे वाद्य वाजवताना आपण अनेक मात्तबर लोकांना पाहिलं आहे. त्यांचे वायरल व्हिडियोज ही आपण अगदी आवडीने पाहिले असतीलच. एवढंच कशाला तर या वाद्याचा उल्लेख असलेली दोन गाणी ही आपल्याला माहिती असतीलच. ‘पुढे हलगी वाजती’ आणि ‘बोल मैं हलगी बजाऊ क्या’ ही ती गाणी. यावरून या वाद्याची लोकप्रियता लक्षात यावी. या सगळ्यांची आठवण या व्हिडियोनिमित्त होते. त्यामुळे हा व्हिडियो मनोरंजन तर करतोच आणि आठवणींच्या दुनियेत ही घेऊन जातो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. कमी वेळेचा असला तरी भन्नाट आहे. आपणही जर हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्यालाही आवडला असणारच आहे. नसेल पहिला, तर आवर्जून बघा. वर उल्लेख केल्याप्रमाणे आपलं मनोरंजन होईल आणि आठवणी ही जाग्या होतील.

त्यासोबच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेख सुद्धा आपल्या पसंतीला उतरला असणार आहे हे नक्की. कारण तुम्हाला तर माहिती आहेच की तुमच्या साठी खास असे विषय निवडून आपली टीम त्यावर लेखन करत आली आहे आणि यापुढेही करत राहील. आपणही आम्हाला आतापर्यंत जो पाठींबा दिला आहेत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपलं प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहू दे ही सदिच्छा. बाकी मंडळी, लवकरच नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमने लिहिलेले बाकीचे लेख नक्की वाचा. सगळे लेख आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *