Breaking News
Home / मनोरंजन / ह्या सिक्युरिटी गार्ड वाल्या भाऊंनी विद्यार्थ्यांसमोर केलेला डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या सिक्युरिटी गार्ड वाल्या भाऊंनी विद्यार्थ्यांसमोर केलेला डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, बघा व्हिडीओ

डान्स बघायचा आनंद आपल्यापैकी प्रत्येक जण घेत असतो. तो कधी रियालिटी शोजमधून मिळतो तर कधी कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींकडून. एक मात्र खरं की ज्यांना डान्सची मनापासून आवड असते त्यांचा परफॉर्मन्स बघणं म्हणजे एक उत्तम अनुभव असतो. कारण ही मंडळी जो काही डान्स करतात त्यात असलेल्या प्रत्येक डान्स स्टेपचा ही मंडळी आनंद घेत असतात. एवढंच काय तर त्यांच्यासोबत इतर कोणी डान्स करणारी व्यक्ती असेल तर त्यांच्या डान्सचा आनंद ही त्यांना घायला आवडतो. कारण ते स्वतः किंवा इतर कोणीही डान्स करो, तो कलाप्रकार त्यांना महत्वाचा असतो.

या सगळ्या स्वभावाशी मिळती जुळती उदाहरण खरं तर आपल्या आजूबाजूला खूप असतात. पण आपण आपल्याच दुनियेत इतके व्यस्त आणि मस्त असतो की आपलं लक्षच जात नाही. पण काही तरी कारण घडतं आणि अशी कलात्मक व्यक्तिमत्व आपल्या समोर येतात. बरं त्यांना डान्स आवडत असेल तर सहसा त्यांचं व्यक्तिमत्व हे बऱ्याच अंशी उत्साही आणि ऊर्जेने परिपूर्ण असतं. एरवी कदाचित अगदी सामान्य वागणं असेलही, पण डान्स करायला लागल्यावर मात्र त्यांच्यातील या उर्जेचं आणि उत्साहाचं दर्शन आपल्याला होतं. याचाच अनुभव आपल्यापैकी अनेकांना सोशल मीडियावर आलेला असेल. कारण आहे एका वायरल व्हिडियोचं.

या व्हिडियोत आपल्याला एक असं व्यक्तिमत्व भेटतं ज्यांचा डान्स आपल्याला आवडून जातो. हे व्यक्तिमत्व म्हणजे एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेत काम करणारे चौकीदार दादा आहेत. ही प्रसिद्ध शिक्षण संस्था म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी होय. ही संस्था किती मोठी आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. विविध कारणांनी ही संस्था चर्चेत राहिलेली आहे. सध्या वर उल्लेख केलेल्या दादांमुळे ही संस्था पून्हा चर्चेत आली आहे. या संस्थेत एक डान्स क्लब असल्याचं या व्हिडियोतून कळून येतं. यातील विद्यार्थ्यांना या दादांविषयी कळून येतं अस जाणवतं. हे दादा मस्त डान्स करतात म्हंटल्यावर ते त्यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे मग हे दादा एका गाण्यावर डान्स करतात आणि त्यातून जो परफॉर्मन्स पुढे चित्रित रुपात समोर येतो तो म्हणजे हा व्हिडियो आहे. व्हिडियो तसा दोन मिनिटांपेक्षा ही कमी वेळेचा आहे. पण पूर्णतः मनोरंजन करणारा आहे. खासकरून या दादांनी दाखवलेलं पदलालित्य म्हणजे जबरदस्त कलाकारी आहे. एखाद्या कसलेल्या डान्सरप्रमाणे हे दादा डान्स करतात आणि आपल्याला आनंद देतात. बरं हाच आनंद तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना ही होत असतो. त्यामुळे त्यांच्यासोबत डान्स करण्याचा मोह यांतील एका मुलाला आवरत नाही. ते समोरील भिंतीवर असणाऱ्या मोठ्ठाल्या आरशात बघत डान्स करत असतात.

हे सगळं सुरू असताना आपण भिंतीवरील एक वाक्य वाचतो आणि ते किती खरं आहे हे कळून येतं. हे वाक्य प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा यांच्या सिनेमांमुळे प्रसिद्ध झालं आहे. ‘Any Body Can Dance’ हे ते वाक्य. त्या आरशात नाचताना दिसणारं दादांचं व्यक्तिमत्व हे वाक्य अगदी अधोरेखित करून जात असतं. यातील दादांचा डान्स आणि त्यांच्यासकट सगळ्यांचा असलेला उत्साह आमच्या टीमला खूप आवडला. म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी नक्कीच सांगायला हवं. कारण जे जे चांगलं ते आपल्या पर्यंत पोहोचावं ही आमची नेहमीची इच्छा असते आणि यापुढेही राहील. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *