Breaking News
Home / मराठी तडका / ह्या ४ मराठी अभिनेत्रींनीं लॉकडाऊन मध्ये सुरू केले नवीन व्यवसाय

ह्या ४ मराठी अभिनेत्रींनीं लॉकडाऊन मध्ये सुरू केले नवीन व्यवसाय

मराठी गप्पाच्या वाचकांसाठी आमची टीम सातत्याने नवनवीन विषयांवर लेख लिहीत असते. त्यापैकी एक म्हणजे मराठी कलाकारांनी सुरू केलेले व्यवसाय. आज पर्यंत अनेक वेळेस मराठी गप्पाच्या टीमने मराठी कलाकारांच्या कलाक्षेत्राव्यतिरिक्त सुरू केलेलेल्या व्यवसायांसंदसर्भात नेहमीच लेख लिहिले आहेत. आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत असे कलाकार ज्यांनी या लॉक डाऊनच्या काळात नवीन उपक्रम हाती घेतले आणि आपल्या आवडी निवडीचं रूपांतर ते आता व्यावसायिक उपक्रमांत करत आहेत.

रश्मी अनपट आणि अमित खेडेकर :

रश्मी आणि अमित हे कलाकार जोडपं आपल्याला सर्वपरिचित आहे. त्यांनी विविध कलाकृतींतून त्यांच्या चाहत्यांचं नेहमीच मनोरंजन केलेलं आहे. मालिका, नाटक, सिनेमा या माध्यमांतून त्यांचा सहज वावर असतो. तर असं हे जोडपं सध्या रंगलंय शेतीत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे फोटोज शेअर केले होते. फोटोज च्या कॅपशन मध्ये लिहिलं होतं, ‘लॉक डाऊन च्या काळात नवीन गोष्टी शिकण्यासाठी केलेल्या मेहनतीचं फळ आता दिसतंय’. येत्या काळात त्यांच्या कडून या उपक्रमाबद्दल अजून माहिती मिळेलंच. या दोघांना या नवीन उपक्रमाबद्दल मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

जुई गडकरी :
एक उत्तम अभिनेत्री, गायिका, युट्युबर अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. तिच्या अभिनयाने, गाण्याने तिने प्रेक्षाकांना सदैव आनंद दिला आहे. अशी ही गुणी कलाकार पाककलेतही निपुण आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन वेळोवेळी तिने केलेल्या पाककृतींचे फोटोज आणि व्हिडियोज पाहिले असतीलच. त्यात आता तिने केलेल्या केक्सची भर पडली आहे. तिने केक बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. तिच्या फेसबुक अकाउंट वरून तिने तयार केलेले हे सुंदर केक्सचे फोटोज ती शेअर करत असते. विविध फ्लेवर्स असलेले हे केक्स दिसायलाही अगदी आकर्षक असतात. तिच्या या नवीन उपक्रमास मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

सई ताम्हणकर :
सई ताम्हणकर म्हणजे सदैव प्रसन्न व्यक्तिमत्व. तिच्या या व्यक्तिमत्वात तिची फॅशन स्टाईल ही भर घालत असते. अशा या स्टायलिस्ट सई ने लॉक डाऊन च्या काळात स्वतःच्या नवीन व्यावसायिक उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. ‘द सारी स्टोरी’ या नावाने तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. यात उच्च प्रतीच्या आणि विविध प्रकारच्या साड्या, द सारी स्टोरी या नामामुद्रे अंतर्गत विकल्या जातात. सईने आपली अगदी जवळची मैत्रीण असणाऱ्या श्रुती भोसले सोबत हा व्यवसाय सूरु केला आहे. तिच्या या व्यावसायिक प्रवासाला मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

शुभांगी सदावर्ते आणि आनंद ओक :
गायिका आणि संगीतकार यांच्यात उत्तम ट्युनिंग असणं महत्वाचं असतं तर उत्तम कलाकृती सादर होत असते. संगीत देवबाभळी च्या निमित्ताने हे प्रामुख्याने दिसून आलं. या संगीत नाटकाचे असंख्य प्रयोग झाले. या नाटकाचे संगीतकार म्हणजे आनंद ओक आणि मुख्य अभिनेत्री आणि गायिका म्हणजे शुभांगी सदावर्ते. नाटकात जमलेलं त्यांचं ट्युनिंग हे खऱ्या आयुष्यातही जमलं. लॉक डाऊन काळात हे दोघेही लग्नबंधनात अडकले. पण या काळात काम तसं काही नव्हतंच. पण सातत्याने कार्यरत राहायला हवं हे त्या दोघांनाही जाणवत होतं. यातून जन्माला आली ती श्रीपाद फूड्स, याची संकल्पना. एका प्रथितयश वृत्तपत्राने दिलेल्या दाखल्यानुसार आनंद यांच्या आईंनी केलेल्या पाककृतींना वाखाणलं जात असे. तसेच शुभांगी यासुद्धा उत्तम पाककृती तयार करतात. तेव्हा या पाककृतींना श्रीपाद फूड च्या माध्यमातून त्यांनी नातेवाईक आणि अन्य लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. विविध सणांच्या काळात नवनवीन पदार्थ बनवून ग्राहकांना देण्याचा प्रयत्न या जोडप्याने केला आणि तो यशस्वी झाला. आज त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक चहुबाजूंनी होते आहे. या कौतुकात मराठी गप्पाची टीमसुदधा सामील आहे. त्यांच्या आणि श्रीपाद फूड च्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.