२०२० साल आता सरत आलंय. येत्या काही दिवसांत नवीन वर्षाचे वेध लागतील. या वर्षाने आपल्याला काय दिलं हा प्रश्न विचारला असता, सहसा अनेकांची उत्तरं समानच असतील. या काळात अनेक मृ त्यू झाले. क रोना किंवा इतर कारणांनी. मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही या वर्षी जगाचा निरोप घेतला. मराठी गप्पाच्या टीमकडून या सर्व जेष्ठ कलाकारांना आदरांजली.
१. जयराम कुलकर्णी :
मराठी सिनेमातील चतुरस्त्र अभिनेते. छाप पडेल असं व्यक्तिमत्त्व. त्यांनी अनेक सिनेमांतून पो लीस कमिशनर ही व्यक्तिरेखा वठवली होती. अनेक सुप्रसिद्ध कलाकृतींचा ते भाग होते. अगदी अशी ही बनवाबनवी या सिनेमातही त्यांनी प्रिया अरुण यांच्या वडिलांची भूमिका साकार केली होती. त्यांचे नि धन वयाच्या ८८ व्या वर्षी झाले. त्यांची सून म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि नातू म्हणजे विराजस कुलकर्णी. त्यांचे सुपुत्र रुचिर कुलकर्णी हे पेशाने वकील असून, अभिनय क्षेत्राशीही संबंधित आहेत.
२. आशालता वाबगावकर :
आशालताजी यांचं क रोनामुळे वयाच्या ७९ वर्षी नि धन झालं. लॉक डाऊन शिथिल होत असताना मालिकांच्या शूटिंग्सना परवानगी देण्यात आली. तेव्हा ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचंही शूटिंग सुरू झालं. मालिकेच्या निर्मात्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आणि त्यांच्या टीमने संपूर्ण खबरदारी घेतली होती. पण आशालताजी यांना दुर्दैवाने क रोनाचा संसर्ग झाला. त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आलं. पण काही काळाने त्यांचं नि धन झाल्याचं वृत्त आलं. आशालताजी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात नाटकांतून केली होती. त्या मूळच्या गोव्याच्या. त्यामुळे गोवन नाटकांतून त्यांनी अभिनय केला होता. पुढे सिनेमा आणि मालिकांतून त्यांनी अभिनय सुरू ठेवला. अनेक गाजलेल्या कलाकृतींचा त्या भाग होत्या. त्यांना लिहायला ही आवडे. त्यांचा एक कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यांनी गायलेल्या एका अवीट गोड गाण्याचे शब्द, ‘गर्द सभोवती’ म्हणजे या पुस्तकाचे नाव ठेवण्यात आले होते.
३. रवी पटवर्धन :
मराठी मनोरंजन सृष्टीतील एक पर्व रवी पटवर्धन यांच्या जाण्याने संपलं असं आपण म्हणू शकतो. त्यांनी अभिनय करायला वयाच्या सहाव्या वर्षापासून सुरवात केली ती अगदी अखेरपर्यंत. नाटक, मराठी हिंदी सिनेमे, मालिका यांतून त्यांनी सातत्याने आपला वावर कायम ठेवला. एकच प्याला सारखं अजरामर नाटक त्यांनी केलं. वेळ प्रसंगी स्वतःची संस्था त्यांनी उभारली. आपल्या भारदस्त आवाजाने, तेवढ्याच उत्तम अभिनयाने त्यांनी २०० सिनेमे, १२५ नाटकांतून विविध व्यक्तिरेखा अजरामर केल्या. आरण्यक नाटकातील धृतराष्ट्राची भूमिका त्यांनी आपल्या कारकिर्दीत दोनदा केली. काही वर्षांपूर्वी त्यांनी ही भूमिका पुन:श्च साकारली तेव्हा त्यातील ७०-८०℅ संवाद पाठ होते असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. यावरून त्यांची स्मरणशक्ती आणि कामाप्रती असलेली निष्ठा दिसून येते. नवोदित कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या या चिरतरुण अभिनेत्याचं ५ डिसेंबर २०२० ला नि धन झालं. अग्गं बाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
४. कमल ठोके :
लागिरं झालं जी ही मालिका लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचली. यातील प्रत्येक पात्र, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. यातील जिजि ही व्यक्तिरेखा तर प्रत्येकाला आपलीशी वाटली. ही व्यक्तीरेखा जिवंत केली होती ती, कमल ठोके यांनी. त्यांचा आजी म्हणून या मालिकेतील सहज वावर त्यांच्या लोकप्रियतेचं कारण ठरला. त्यांचं आयुष्य हे कष्टांचं होतं, पण त्यांच्या पतीच्या साथीने त्यांनी नेटाने आपलं आयुष्य साकार केलं. त्या अनेक वर्षे शालेय शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्या. अनेक वर्षे मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम पाहिले होते. कलेविषयी त्यांना लहानपणापासून आवड. त्यांनी ती जोपासली आणि आपलं कलाकार म्हणून कार्यरत राहण्याचं स्वप्न पूर्ण केलं. लढवैय्या वृत्तीच्या कमलजी यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी क र्करोगाने नि धन झालं.
५. अविनाश खर्शिकर :
मराठी सिनेसृष्टीतील एक देखणं व्यक्तिमत्व. मराठी नाटकं, सिनेमे, मालिका यांतून त्यांनी भरीव काम केलं. त्यांच्या दिसण्यासोबत त्यांच्या अभिनयाची चर्चा नेहमीच होत राहिली. त्यांनी अनेक गाजलेल्या कालाकृतींमधून अभिनय केला होता. मग ती दामिनी सारखी मालिका असो, वासूची सासू, अ पराध मीच केला, सौजन्याची ऐसीतैसी सारखी नाटकं असोत, वा आई थोर तुझे उपकार, लपवा छपवी सारखे सिनेमे असोत. ते ठाण्याला राहत असतं. ठाण्यातील अनेक मान्यवर कलाकारांशी त्यांचे नियमित संपर्क असे. यातूनच मराठी नाटकांचे जतन करावे म्हणून ते कार्यरत होते. त्यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी हृ दयविकाराच्या तीव्र झटक्याने नि धन झाले.
६. आशुतोष भाकरे :
तरुण, उदयोन्मुख अभिनेता अशी ओळख असणाऱ्या आशुतोष भाकरे यांचं अकाली जाणं प्रत्येकाला चटका लावून गेलं. त्याने शॉर्ट फिल्म्स, व्यावसायिक सिनेमांतून अभिनय केलेला होता. भाकर, इचार ठरला पक्का हे त्याचे गाजलेले सिनेमे. तसेच बर्थडे ही शॉर्ट फिल्मही प्रसिद्ध झाली. त्याचं काही वर्षांपूर्वी अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्यासोबत लग्न झालं होतं. दोघांचं सहजीवन आणि कलाप्रवास चालू होता. पण मधल्या काळात आशुतोष तणावाखाली असल्याचं सांगण्यात येतं. या तणावातून बाहेर पडण्यासाठी मयुरी, दोघांचे आई वडील अतिशय प्रयत्नशील होते. त्यात यश मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती. पण पुढे आशुतोष यांच्या कडून आ त्म ह त्ये चं पाऊल उचललं गेलं आणि सगळंच थांबलं. वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी तो हे जग सोडून गेला.
मराठी गप्पाच्या टीमकडून या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.
(Author : Vighnesh Khale)