Breaking News
Home / मनोरंजन / ह्या ६ वर्षाच्या लहानग्या मुलीचा कारनामा पाहून तुम्हीसुद्धा अचंबित व्हाल, बघा हा व्हिडीओ

ह्या ६ वर्षाच्या लहानग्या मुलीचा कारनामा पाहून तुम्हीसुद्धा अचंबित व्हाल, बघा हा व्हिडीओ

मराठी गप्पा हमारा नाम है, और आप वाचकों का मनोरंजन करना हमारा काम है. होय, मराठी गप्पाच्या वाचकांचं मनोरंजन करण्याचा वसाच आमच्या टीमने घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला आनंदित करतील असे विविध लेख आपली टीम लिहीत असते. त्यातही वायरल व्हिडियोज वरील लेख तर अगदीच खास आपल्या आवडीचे. पण त्यातही ना, सतत काही तरी गंमत जंमत असणाऱ्या व्हिडियोज विषयी लिहिलं की त्यातली मजा निघून जाते. वाचक म्हणून तुमचीही आणि लेखक म्हणून आमची ही. यावर उतारा म्हणून आपल्या टीमने आज असा एक वायरल व्हिडियो शोधून काढला आहे, जो बघून भल्या भल्यांना अचंबित व्हायला झालं होतं. केवळ भारतातच नाही तर जगभरात. कारण हा व्हिडियो पण परदेशातील आहे. तर असा हा व्हिडियो आहे तरी काय? तर हा आहे एका चायनीज लहान मुलीचा व्हिडियो.

आपल्याला माहितीच आहे, की जिम्नॅस्टिक हा क्रीडा प्रकार चीन मध्ये किती लहान वयापासून शिकवला जातो. एका अर्थाने ही मुलगी त्याचंच प्रतिक म्हणायला हवी. तर जेव्हा व्हिडियो सुरू होतो, तेव्हा ही चिमुरडी तिच्या घरातील पलंगावर उभी असते. कॅमेऱ्यामागील तिच्या वडिलांनी सांगितल्यावर ती आपली करामत करण्यास सुरूवात करते. ही करामत काय असते तर समरसॉल्ट हा प्रकार करून दाखवणे. यात खेळाडू किंवा सादरकर्ती व्यक्ती पूर्ण ३६०° उडया मारत असते. अर्थात यासाठी प्रचंड शारीरिक क्षमता, स्वतःवर नियंत्रण असणं आणि प्रचंड आत्मविश्वास असणं महत्वाचे असते. या मुलीमध्ये हे तिन्ही गुण दिसून येतात. कारण केवळ एका मिनिटाच्या या व्हिडियोत ती किती समरसॉल्ट उड्या मारत असावी याचा अंदाज करा जरा. तब्बल ८० समरसॉल्ट उड्या ती एका मिनिटात पूर्ण करू शकते. त्यामुळे हा व्हिडियो बघताना एक क्षण असाही येतो जिथे आपलं डोकं चक्रावून जातं. नक्की हा खरा व्हिडियो आहे की एडिटिंग करून बनवला आहे असं वाटत राहतं.

पण तसं नाहीये. हा खरच एकसंध व्हिडियो आहे. कारण हा व्हिडियो बघून आपली टीम तर चक्रावली बुवा. पण एखाद्या गोष्टी विषयी उत्सुकता वाटली की त्याविषयी माहिती मिळवायची ही आपल्या टीमची सवय. मग काय, आपल्या टीमने थोडा रिसर्च केला तर या मुलीविषयी थोडी माहिती मिळाली. या चिमुरडीचं नाव आहे ‘ली’ आणि ती तिच्या कुटुंबासमवेत चीन मध्ये राहते. तिचे वडील मिक्सड मार्शल आर्टस् क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्ती आहेत. तिच्या लहानपणापासून त्यांना आपली मुलगी इतर मुलांपेक्षा जास्त कणखर असल्याचं लक्षात आलं होतं. त्यात एका ऑनलाईन व्हिडियो ने तिला समरसॉल्ट विषयी आकर्षण वाटू लागलं, हे ही त्यांना लक्षात आलं. स्वतः एका क्रीडा प्रकाराचा भाग असलेले तिचे वडील मग तिला प्रशिक्षण देऊ लागले. सुरुवातीस काही वेळेस ती पडत असे, पण तिच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणं मात्र सुरू ठेवलं. त्याचा परिणाम असा झाला की तिला या प्रकारात आवड निर्माण झाली आणि मग तिची प्रगती होत गेली.

ती प्रगती एवढी झाली की आज ती एका मिनिटांत वर उल्लेख केल्याप्रमाणे ८० समरसॉल्ट करू शकते. तिने या प्रकारातील जागतिक विक्रम मोडावा, ही तिच्या वडिलांची इच्छा आहे. पण साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या हवाल्यानुसार तिने पुढे खेळाडूच व्हावं अशी त्यांची अपेक्षा नाहीये. तर तिने उच्च शिक्षण घेऊन जे तिला आवडेल ते क्षेत्र निवडावं असं त्यांचं मत आहे. पण सध्या तरी तिला आवडणाऱ्या या क्रीडा प्रकारावर वडील आणि मुलीने लक्ष केंद्रित केल्याचं कळतं आहे. ते रोज दोन तास तरी सराव करतात असं कळतं. तसेच जिम्नॅस्टिक मधील इतरही कसरती तिचे वडील तिच्याकडून करून घेत असतात. एकूणच हा व्हिडियो आपल्याला जसा आश्चर्यचकित करतो तसेच तिच्या वडिलांनी तिच्या वर घेतलेली मेहनत पाहून मनही भरून येतं. या वडील मुलीच्या फिट आणि हिट जोडीला मराठी गप्पाच्या टिमकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

आपल्याला हा लेख आवडला असणारच तेव्हा आपल्या सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या टीमने लिहिलेले नवनवीन लेखही वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया देत राहा. तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला उत्तमोत्तम लेख लिहिण्याचं प्रोत्साहन देत असतात. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *