Breaking News
Home / मराठी तडका / ह्या ७ मराठी अभिनेत्रींचे आईवडीलसुद्धा आहेत लोकप्रिय मराठी कलाकार, नंबर ७ नक्की पहा

ह्या ७ मराठी अभिनेत्रींचे आईवडीलसुद्धा आहेत लोकप्रिय मराठी कलाकार, नंबर ७ नक्की पहा

आज पर्यंत आपण अनेक कलाकारांची मुलं मनोरंजन क्षेत्रात काम करताना पाहिली आहेत. त्यात आजकालच्या अनेक लोकप्रिय अभिनेत्रींचाहि समावेश आहे. आपल्या आई वडिलांच्या पाऊलावर पाउल ठेऊन त्यांनी कलाक्षेत्रात प्रवेश केला आणि स्वतःचीही एक वेगळी प्रेक्षकांच्या मनावर मोहोर उमटवली. या वर्षीच्या जागतिक कन्या दिनाच्या (२७ सप्टेंबर २०२०) निमित्ताने याच लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि त्यांच्या लोकप्रिय आई वडिलांविषयी थोडसं.

मधुरा वेलणकर – साटम

मधुरा वेलणकर-साटम यांना आपण सारेच ओळखतो ते त्यांच्या मराठी – हिंदी मधील कामांसाठी. अनेकांना त्याचं सरींवर सरी, हापूस, एक निर्णय… स्वतःचा स्वतःसाठी हे गाजलेले सिनेमे, लग्नबंबाळ, हा शेखर खोसला कोण आहे, ती नाटकं आठवत असतीलच. यातील सरींवर सरीसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. पण आता त्या केवळ अभिनेत्री राहिलेल्या नाहीयेत तर त्या उत्तम लेखिका म्हणूनही लोकप्रिय आहेत. त्यांचे “मधुरव” हे पुस्तक काही काळापूर्वी प्रसिद्ध झाले आहे. त्याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याच नावाचे त्यांनी एक युट्युब चॅनेल सुरु केले आहे. ज्या मार्फत त्या स्वतः आणि इतर मान्यवरांसोबत पुस्तक वाचन करत असतात. त्यांनी अनेक नृत्याचे देखील कार्यक्रम केलेले आहेत.

अशी हि गुणी अभिनेत्री, लेखिका मुलगी आहे ती प्रदीप वेलणकर यांची. प्रदीपजींना आपण ओळखतो ते त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीसाठी. त्यांच्या कारकिर्दीला जवळपास ५० वर्षे येत्या काळात होतील. यातील त्यांचे सर्वोत्तम कलाकृती म्हणजे बॅरीस्टर, ह्या गोजिरवाण्या घरात. तसेच नजीकच्या काळातील ह.म.बने, तू.म.बने हि मालिकासुद्धा गाजते आहे. प्रदीपजी आणि माधुराजींनी “एक निर्णय… स्वतःचा स्वतःसाठी” या सिनेमात एकत्र काम केलं आहे.

पूर्वा गोखले

पूर्वा गोखले यांना आपण ओळखतो ते स्वराज्य रक्षक संभाजी, क्युंकी सांस भी कभी बहु थी, तुझसे हे राबता या लोकप्रिय मालिकांतील भूमिकांसाठी. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत त्यांनी सईबाईंची भूमिका बजावली होती. त्यांनी सिनेमे आणि नाटकातूनही कामे केली आहेत. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांचा ‘भयभीत’ हा सिनेमा प्रसिद्ध झाला होता. तर सेल्फी हे नाटकही गाजलं होतं.

पूर्वा यांच्याप्रमाणेच, त्यांच्या आई सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांचं नाव, कांचन गुप्ते. गेला काही काळ, अगदी जोमात चालू असलेल्या माझ्या नवऱ्याची बायको मधील महाजनी काकू हि लोकप्रिय भूमिका त्या बजावत आहेत.

गिरीजा ओक गोडबोले

गिरीजा म्हणजे प्रसन्नतेचा झरा. ती ज्या ज्या कलाकृतींचा भाग असते त्या त्या कलाकृतींना चार चांद लावते. नुकत्याच सुरु झालेल्या “सिंगिंग स्टार” च्या एका एपिसोडमध्ये तिच्या उत्कृष्ठ गाण्यासाठी तिला प्रशांत दामले यांच्या कडून “हाउसफुल्ल” ची पाटी मिळाली होती. हि पाटी म्हणजे गाणं मार्कांच्या पलीकडचं झालंय. अशी हि दाद मिळवणारी त्या शो मधली ती पहिली स्पर्धक ठरली होती.

तर अशी हि गिरीजा आहे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची लेक. डॉक्टरांच्या पावलावर पाउल टाकून तिने या मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आणि आज स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे. या काळात तिने, अनेक मराठी – हिंदी सिनेमा, नाटकं, मालिका यांच्यामध्ये कामे केली आहेत. नुकतच तिने, क्वार्टर या तिच्या पहिल्या शॉर्ट फिल्मद्वारे लघुपटांच्या दुनियेतही पदार्पण केले आहे. डॉक्टरांचीहि अग्गबाई सासूबाई हि मालिकासुद्धा गाजते आहेच.

मृण्मयी गोडबोले

लॉकडाऊन सुरु झालं तेव्हा टेलीविजनवर वाहिन्यांनी अनेक नवनवीन कार्यक्रम दाखवले. यात वेब सिरीजही होत्याच. यातली वन्स अ इयर नक्कीच प्रेक्षकांच्या आठवणीत राहिली आहे. निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले या दोघांच्या केमिस्ट्रीने कथेला न्याय मिळवून दिला होता. मृण्मयी ने “चि. व चि.सौ.कां.” मध्येही अप्रतिम अभिनय केला होताच. तसेच अनेक शॉर्ट फिल्म्समध्येही तिने काम केलं होतं. पु. ना. गाडगीळ आणि सन्स च्या जाहिरातीत ती सीमा देशमुख सारंग साठ्ये यांच्यासोबत झळकली होती.

मृण्मयी हि सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांची मुलगी आहे. आपण त्यांना ओळखतो ते घडलंय बिघडलंय, चिंटू (सिनेमा) आणि कित्येक लोकप्रिय कलाकृतींसाठी.

स्वानंदी टिकेकर

सध्या सिंगिंग स्टार हा गाण्यांचा रियालिटी शो खूप गाजतो आहे. यातील कलाकार मंडळी स्वतःची गायकी आपल्या समोर सादर करताना दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे स्वानंदी टिकेकर. तिला गाण्याचा वारसा हा तिच्या आईकडून म्हणजेच आरती अंकलीकर टिकेकर यांच्याकडून मिळाला आहे. तर अभिनयाचा वारसा वडिलांकडून मिळाला आहे. तिचे वडील म्हणजे उदय टिकेकर.

उदय यांना आपण त्यांच्या अनेक भूमिकांसाठी ओळखतो. प्रामुख्याने त्यांनी केलेल्या भूमिका या खलनायिकी प्रवृत्तीकडे झुकणाऱ्या असल्या तरीही, त्यांच्या सकारात्मक भूमिकाही गाजल्या आहेत. स्वानंदि ही सुद्धा गायनाकडे वळण्याअगोदर आपल्याला अभिनेत्री म्हणून परिचित झाली ती, दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतून.

सखी गोखले

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेचा उल्लेख झाला आणि सखी गोखलेचा उल्लेख होऊ नये असं शक्य नाही. मित्रांच्या त्या ग्रुपचा ती एक महत्वाचा भाग होती. लॉकडाऊन मध्ये अनेक मालिका आल्या. त्यातील एक म्हणजे आठशे खिडक्या नऊशे दारं. त्यात तिने तिच्या नवऱ्याबरोबर म्हणजे सुव्रत जोशी बरोबर भाग घेतला होता.

आपण तिला जसे तिच्या अभिनयासाठी ओळखतो तसेच ओळखतो ते शुभांगी गोखले आणि मोहन गोखले यांची मुलगी म्हणून. दोघेही उत्तम कलाकार. शुभांगीजींना आपण ओळखतो ते साखर खाल्लेला माणूस, सूर राहू दे या नाटकांतील कामांसाठी. यांच्यासोबतच त्यांनी श्रीयुत गंगाधर टिपरे, काहे दिया परदेस, एका लग्नाची तिसरी गोष्ट या लोकप्रिय मालिकांमध्येही कामे केली आहेत. सखी यांचे वडील – मोहन गोखले – हे उत्तम अभिनेते होते. त्यांनी नाटक, सिनेमा, टेलीविजनवरचे कार्यक्रम अशा विविध माध्यमांतून अभिनय आणि दिग्दर्शन करायला सुरुवात केली. मिस्टर योगी हि त्यांची एक गाजलेली मालिका. भारत एक खोज या गाजलेल्या कार्यक्रमाचेही ते एक भाग होते.

श्रिया पिळगावकर

मनोरंजन क्षेत्रात आणि त्यातही वेबसिरीज क्षेत्रात एक नाव गाजतंय, ते म्हणजे श्रिया पिळगावकर. तिने गेल्या काही महिन्यात लागोपाठ दोन लोकप्रिय वेब सिरीज केल्या आहेत. क्रॅक डाऊन, द गॉन गेम, हि त्यांची नावं. तिने काही वर्षांपूर्वी आपलं अभिनयातलं पदार्पण केलं होतं ते एकुलती एक या सिनेमातून. त्या आधी तिने “Freedom of love” या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं. पुढे तिने अभिनेत्री म्हणून काही सिनेमे केले. तसेच तिने काही शॉर्ट फिल्म्सचे दिग्दर्शनही केले होते.


आपल्या सगळ्यांना माहिती आहेच, श्रिया हि सचिन – सुप्रिया यांची मुलगी. सचिन सुप्रिया यांची जोडी पहिल्यांदा आपल्या समोर आली ते “नवरी मिळे नवऱ्याला” सिनेमातून. पुढे त्यांनी अनेक मालिका-सिनेमे केले जसे कि बनवाबनवी, तू तू मै मै, माझा पती करोडपती, नवरा माझा नवसाचा आणि असे अनेक. ते नच बलिये या सुप्रसिद्ध डान्स शोच्या पहिल्या पर्वाचे विजेते होते. सचिनजी आणि श्रिया यांनी “एकुलती एक” या सिनेमात एकत्र काम केले आहे.
(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.