सोशल मीडियावर विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यात येत असतात. यातील काही व्हिडिओ कायम स्मरणात राहणारे असतात. असाच कायम स्मरणात राहिल असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर डान्स व्हिडिओंचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. असाच एक व्हिडिओ समोर आला असून, ज्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नीसमोर रोमँटिक स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. आजोबांच्या गाण्यावर आजींनी दिलेल्या प्रतिक्रियेने नेटकऱ्यांचं मनं जिंकलं आहे. सोशल मीडियावर तुम्ही अनेक डान्स व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही लोकांचा डान्स तुम्हालाही डान्स करायला भाग पाडतो. तर काही लोकांचा डान्स पाहून तुम्हाला स्वत:ला खूप छान वाटतं, तुम्ही तो खूप एन्जॉय करता.
पण या सगळ्यात असा व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल ज्यात एक वयस्कर माणूस त्यांच्या बायकोसमोर आणि इतर नातेवाईकांसमोर एकदम झक्कास नाचतोय. इतका सुंदर डान्स तर त्या वयस्कर व्यक्तीच्या जागी दुसरं कुणीच करू शकत. हेच तुम्ही सुद्धा म्हणाल… अनेकदा आपण विचार करतो की, वयस्कर लोक नृत्य करू शकत नाहीत. बऱ्याच अंशी हे खरं वाटतं, पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका काकांनी अहो काका तरी कसे म्हणावे…. या आजोबांनी हे चुकीचं सिद्ध केलं आहे. या 82 वर्षीय आजोबांची एनर्जी आणि स्टाईल त्याच्यासोबत नाचणाऱ्या आजींना पूर्णपणे टक्कर देतीये. दोघेही एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत. काकांच्या चेह-यावर नाचताना आनंद आणि आत्मविश्वास आहे.
नाचताना काका इतके एक्साईट होतात की मागे पुढे न बघता जोरात डान्स स्टेप्स करायला लागतात. त्यांच्या या ऊर्जादायी नृत्याने लोकांची मने जिंकलीयेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक पार्टी सुरु असल्याचे दिसत आहे. यामध्ये खूप लोक आहेत. हे सर्वच अभी तो पार्टी शुरु हुई है या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. यामध्ये एक 82 वर्षांचे आजोबा देखील डान्स करताना दिसत आहेत. हे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. कारण ते बेधूंद होऊन डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत आजी देखील आहेत. आजी देखील आपल्या अंदाजाच डान्स करत आहेत. मात्र आजोबा आपल्या तुफान एनर्जीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून सर्वच चकीत झाल्याचे दिसतेय. आता त्यांचा हाच बेधूंद डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बघा व्हिडीओ :