Breaking News
Home / बॉलीवुड / ह्या ८ कलाकारांनी खूपच कमी वयात घेतला जगाचा निरोप, एकाचे वय केवळ ३४ वर्षे होते

ह्या ८ कलाकारांनी खूपच कमी वयात घेतला जगाचा निरोप, एकाचे वय केवळ ३४ वर्षे होते

ह्या जगात आलेल्या प्रत्येकालाच कधी ना कधी जावेच लागते, परंतु बॉलिवूड इंडस्टीमधील काही कलाकार असे सुद्धा होते ज्यांनी खूपच कमी वयात जगाचा निरोप घेतला. होय, ह्या कलाकारांच्या जाण्याने फक्त त्यांच्या कुटुंबीयांनाच धक्का बसला नाही, तर त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यांतून सुद्दा अश्रू आले. अशामध्ये आज आम्ही त्या कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी खूपच कमी वयात जगाचा निरोप घेतला आहे. चला तर जाणून घेऊयात त्या कलाकारांबद्दल.

१ सिद्धार्थ रे
मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांत काम केलेल्या अभिनेता सिद्धार्थ रे ह्याच्या अभिनयाला अनेकांची दाद मिळाली होती. सुशांतने ‘अशी हि बनवाबनवी’ मध्ये अशोक सराफ ह्यांचा भाऊ ‘शंतनू’ ची भूमिका केली होती, तर ‘बाजीगर’ ह्या लोकप्रिय हिंदी चित्रपटात काजोलच्या इन्स्पेक्टर मित्राची भूमिका निभावली होती. खरंतर, वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सुशांतचे नि धन झाले. त्यावेळी त्याची मुले खूप लहान होती. सुशांतने अभिनेत्री प्रिया सोबत लग्न केले होते, दोघांनाही दोन मुले आहेत.

२. इंदर कुमार
अभिनेता इंदर कुमार ह्याने सलमान खान सोबत अनेक चित्रपटांत काम केले आहे. ‘वाँटेड’ चित्रपटात त्याने सलमानच्या भावाची निभावलेली भूमिका अनेकांना आवडलेली. २०१७ साली अभिनेता इंदर कुमार ह्याचा हृदयविकाराने नि धन झाले होते. सांगितले जाते कि त्यावेळी काम न मिळाल्याच्या कारणामुळे इंदर कुमार डिप्रेशनमध्ये गेला होता. ह्यानंतर त्याच्यावर बला त्काराचा आरोप सुद्धा लावला गेला होता. जेव्हा त्याचे नि धन झाले तेव्हा त्याचे वय केवळ ४३ वर्षे होते आणि त्याच्या पश्चात त्याचे पत्नी आणि एक मुलगा आहे. ह्या अभिनेत्याच्या जाण्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली होती.

३. गुरुदत्त
पन्नास-साठ च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता दिग्दर्शक म्हणून गुरुदत्त ह्यांचे नाव घेतले जाते. अभिनेता गुरुदत्त ह्यांच्या मृ त्यूमागचे रहस्य अजून समजू शकलेले नाही. जास्त प्रमाणात मद्यसेवन आणि झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे त्यांचे अचानक नि धन झाले होते. जेव्हा त्यांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा गुरुदत्त केवळ ३९ वर्षांचे होते.

४. संजीव कुमार
संजीव कुमार ह्यांची शोले चित्रपटातील ‘ठाकूर’ ची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. एक काळ असा होता जेव्हा अभिनेता संजीव कुमार ड्रिमगर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री हेमा मालिनीवर खूप प्रेम करत होते, परंतु १९८५ मध्ये अचानक त्यांच्या नि धनाच्या बातमीने संपूर्ण देश स्तब्ध झाला होता. केवळ वयाच्या ४८ व्या वर्षी संजीव कुमार हे जग सोडून गेले. सांगितले जाते कि संजीव कुमार ह्यांना नेहमी हार्ट अटॅकचा फोबीया होता.

५. विनोद मेहरा
आपल्या काळातील सर्वात चार्मिंग अभिनेत्यांपैकी एक विनोद मेहरा हे वयाच्या केवळ ४५ वर्षी जग सोडून गेले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे नि धन झाले होते.

 

६. वाजिद खान
काही दिवसांपूर्वी लोकप्रिय म्युजिक कम्पोजर वाजिद खान वयाच्या ४३ वर्षी हे जग सोडून गेला. त्याचे नि धन कोरोना व्हायरस आणि किडनी फेलिअर मुळे झाले होते. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना संगीत दिले होते.

७. इरफान खान
२०२० मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीने अनेक महान कलाकारांना गमावले, त्यापैकीच एक म्हणजे इरफान खान. बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक इरफान खान आपल्या दमदार अभिनयामुळे बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा लोकप्रिय होते. ते इंडस्ट्रीमधले एक साम्मानीय व्यक्तींपैकी एक होते. इरफानने केवळ वयाच्या ५३ वर्षी जगाचा निरोप घेतला. २९ एप्रिलला न्यूरोएंडोक्राइन ट्युमर मुळे इरफानचे नि धन झाले होते.

८. सुशांत सिंग राजपूत
तरुण अभिनेता सुशांत सिंग राजपूत ह्याच्या नि धनाने बॉलिवूडसमवेत संपूर्ण देशाला धक्का बसला. ३४ वर्षीय अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जूनला दुपारी वांद्रे येथील आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफा स घेऊन आत्मह त्या केली होती. रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, सुशांत खूप काळापासून डिप्रेशन मध्ये होता. दुसरीकडे हे सुद्धा म्हटले जात आहे कि, तो इंडस्ट्रीच्या नेपोटी ज्म पासून खूप वैतागलेला होता, ज्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.