Breaking News
Home / मनोरंजन / ह्यो डान्स तर गरबापेक्षा पण भारी हाय… तुम्हीसुद्धा हा जगावेगळा डान्स शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही

ह्यो डान्स तर गरबापेक्षा पण भारी हाय… तुम्हीसुद्धा हा जगावेगळा डान्स शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही

गेला काही काळ, आपल्याकडे डान्सच्या रियालिटी शोजचं अगदी पेव फुटलेलं दिसून येतं. अर्थात यामुळे एक गोष्ट फार चांगली होते. ती म्हणजे विविध प्रकारच्या डान्सचा आनंद आपल्याला घेता येतो. नवीन प्रकार कळतात आणि त्यांचं सादरीकरण आवडून जातं. अर्थात यातील डान्सर्स बद्दल आपल्याला अप्रूप असतंच. पण त्यासोबतच, हा डान्स बसवणाऱ्या व्यक्तींचं म्हणजेच कोरिओग्राफर्सच विशेष कौतुक वाटतं. कारण अनेकवेळा अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा ते अगदी लीलया करून घेतात.

किंबहुना आपल्याला तसं वाटतं. त्यापाठी असणारी त्यांची मेहनत ही क्वचितच दिसून येते. पण काही डान्स असेही असतात जे टीव्ही वरील कार्यक्रमात कधी दिसतीलच असं नाही. अशी बहुतांश नृत्य बहुधा लोककलांमधील असतात. एखाद्या कार्यक्रमात त्यांचं दर्शन होतं आणि त्यांची ओळख होते. अर्थात बदलत्या काळासोबत टीव्ही आणि सोशल मीडिया ही दोन्ही माध्यम प्रबळ झाली आहेत. त्यामुळे आधी जे केवळ टीव्ही वर होऊ शकत असे ते आता सोशल मीडियावर पण दिसतं. याचा प्रत्यय, आमच्या टीमला नुकताच आला. तसा तो नेहमी येत असतो. पण यावेळी तो प्रकर्षाने जाणवला. कारण या व्हिडियोत, दिसणाऱ्या डान्सला आपल्यापैकी फार कमी जणांनी पाहिलं असेल.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा काही वेळ आपल्याला जमीन दिसत राहते. बहुधा सगळी मंडळी, आपापल्या जागी उभी राहत असावीत आणि म्हणून हा थोडा वेळ घेतला गेलेला असावा. पण एकदाचा कॅमेरा वर येऊन स्थिरावतो. समोर बघतो तर सगळी मंडळी हातात काठ्या घेऊन, गोलाकार उभी असतात. मग संगीत ही वाजायला लागतं. ते एकदा सुरू झालं की ही सगळी मंडळी नाचायला सुरवात करतात. यात सुरुवातीला हा डान्स गरब्यासारखा वाटू शकतो. पण गरबा हा त्यामानाने संथपणे खेळला जातो. एकमेकांच्या डोळ्यात बघत बघत खेळण्याचा तो प्रकार आहे. पण इथे नाचणाऱ्या व्यक्तींचा वेगच इतका प्रचंड असतो की डोळ्यात डोळे घालून नाचायला वेळच नसतो. बरं असं कोणी करू पाहिलं, तर टाळक्यात थेट दंडुकाच पडायची भीती. पण अस करेल तरी कोण म्हणा. कारण ज्यांना उत्साह आहे अशीच मंडळी यात समावेश करू शकतात आणि मस्त नाचू शकतात. बरं कधी एका हाताने तर कधी दोन हातांचा वापर करून डान्स करावा लागतो. तसेच पुढे मागे पळणं ही होतंच.

एक क्षण असाही येतो की नक्की काय चाललंय ते काही कळत नसतं, पण तरीही आवडत असतं. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेल. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर आवर्जून बघा. आपल्याला नक्की आवडून जाईल. बरं कुठे जाऊन पाहायचा याची चिंता नाही. कारण आपल्या टीमने सदर व्हिडियो आपल्या।वाचकांसाठी खाली शेअर केलेला आहे. हा लेख संपल्यावर आपण तो वाचू शकता.

बरं, तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *