Breaking News
Home / बॉलीवुड / १० वर्षे डेटिंग केल्यानंतर रितेशचे झाले होते जेनेलियासोबत लग्न, सीएमचा मुलगा असल्यामुळे मिळत नव्हता भाव

१० वर्षे डेटिंग केल्यानंतर रितेशचे झाले होते जेनेलियासोबत लग्न, सीएमचा मुलगा असल्यामुळे मिळत नव्हता भाव

बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश आज १७ डिसेंबरला ४१ वर्षांचा झाला. रितेश देशमुखने १६ वर्षांअगोदर ‘तुझे मेरी कसम’ ह्या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. रितेशने कॉमेडी मध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. त्याने ‘मस्ती’, ‘क्या कुल है हम’, ‘मालामाल विकली’, ‘हे बेबी’ आणि ‘हाऊसफुल’ सारख्या चित्रपटांत काम केले आहेत. बॉलिवूडमध्ये त्याची एक फॅमिली मॅन म्हणून गणना होते. त्याच्या जन्मदिवशी आम्ही तुम्हांला त्याची आणि जेनिलियाची लव्हस्टोरी सांगणार आहोत. रितेश आणि जेनेलियाची पहिली भेट त्यांच्या पहिलाच चित्रपट म्हणजेच ‘तुझे मेरी कसम’ च्या शूटिंगवेळी झाली होती. त्यांची भेट हैद्राबादच्या एअरपोर्टवर झाली होती. रितेशला अगोदरच सांगण्यात आले होते कि त्याची हिरोईन त्याची वाट पाहत आहे. परंतु जेव्हा रितेश एअरपोर्टवर पोहोचला तेव्हा तिची हरकत पाहून हैराणच झाला. जेनेलियाला माहिती होते कि हा हिरो मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. तिला वाटले होते कि रितेश खूप गर्विष्ठ असेल. तिला वाटले रितेश स्वतः भाव खाऊन जाईल, म्हणून जेनेलियाने स्वतः रितेशला भाव दिला नाही.

परंतु रितेशने स्वतः पुढे होऊन जेनेलियाशी हाथ मिळवले. जेनेलिया हाथ मिळवल्यानंतर इकडे तिकडे पाहू लागली. पहिल्याच भेटीत जेनेलियाचे इतके भाव खाणे रितेशला आवडले नाही. परंतु हळूहळू जेव्हा त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली तेव्हा जेनेलियाला जाणवलं कि रितेश खरंच चांगल्या मनाचा आहे. दोघांमध्ये मैत्री वाढू लागली. दोघेही सेटवर खूप गप्पा मारत. जेनेलिया त्यावेळी आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होती. २४ वर्षाचा रितेश १६ वर्षाच्या जेनेलियासोबत आर्किटेक्चरबद्दल चर्चा करत आणि जेनेलिया आपल्या अभ्यासाबद्दल त्याला सांगत असे. त्यावेळी त्यांना काय माहिती होते कि एके दिवशी दोघेही नवरा बायको बनतील ते. हैद्राबादमध्ये शूटिंग संपल्यानंतर जेव्हा रितेश घरी आला तेव्हा त्याला जेनेलियाची कमतरता जाणवू लागली. ती तिला खूप मिस करू लागला होता. त्याला तिची खूप आठवण यायची. परंतु त्याला वाटले कि ती एक मुलगी आहे. आणि तिला इतक्या लवकर फोन करणे ठीक राहणार नाही. तर दुसरीकडे, जेनेलियासुद्धा रितेशच्या दिशेने पूर्णपणे आकर्षित झाली होती.

असं नाही कि ह्या दोघांना अचानक एकमेकांशी प्रेम झाले होते, हा प्रवास खूप वेळ सुरु होता. त्या दोघांना एकमेकांची इतकी सवय झाली होती कि, दोघांना समजलंच नाही कि कधी त्यांना एकमेकांशी प्रेम झाले ते. ह्यानंतर दोघांनी ‘मस्ती’ चित्रपटात एकत्र काम केले. ह्या दोघांचे नाते तर पहिल्याच चित्रपटापासून सुरु झाले होते, परंतु दोघांनीही हि बातमी मीडियामध्ये आणून दिली नाही. त्यांच्यानुसार, नात्याची सुंदरता हि राहिली आहे कि, एकमेकांना आपल्या प्रेमात वेडं करण्यासाठी कधीच महागडे कँडल लाईट डिनर किंवा गिफ्ट्सची गरज पडली नाही. त्यांच्यासाठी एकमेकांचे प्रेमच सर्व काही होते. जे न बोलताच सर्व काही समजून गेले. शेवटी ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्नाच्या अगोदर मीडियामध्ये दोघांच्या अफेअरच्या फारश्या चर्चा सुद्धा आल्या नाहीत. नोव्हेंबर २०१४ ला रितेश पहिल्यांदा वडील बनला. जेनेलियाने मुलाला जन्म दिला आणि आता त्यांचे आयुष्य त्यांचा मुलगा ‘रिआन’च्या अवतीभोवती फिरत आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.