आपल्या देशात जितकी लोकप्रियता एखाद्या चित्रपट कलाकाराची असते, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त टीव्ही स्टार्सची असते. कारण चित्रपटातील कलाकार फक्त चित्रपटातच दिसतात. आणि साधारणतः एका कलाकाराचा चित्रपट वर्षातून ३ ते ४ वेळा येतो. परंतु सीरिअलमध्ये कलाकार रोज रोज टीव्हीवर दिसल्यामुळे सामान्य जनतेच्या मनात ते घर करून जातात. ह्याच लोकप्रिय टीव्ही सेलेब्रेटींपैकी एक आहे जुही परमार, जिने एकेकाळी ‘कुमकुम’ सीरिअल मध्ये मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारले होते आणि तिची ओळख कुमकुमच्या रूपात घराघरांत झाली होती. एकेकाळी कुमकुम खूप सुंदर दिसायची आणि आता १७ नंतर काहीशी अशी दिसतेय तुमची लाडकी कुमकुम. तुम्हांला माहिती आहे का ती सध्या कुठे आहे ते?
१४ डिसेंबर १९८० ला उडीसाच्या उज्जेन मध्ये जन्मलेली जुही परमार खूपच गुणी अभिनेत्री असून तिने आपल्या अभिनयाची कमाल छोट्या पडद्यावर दाखवलेली आहे. १७ वर्षांअगोदर जुहीने ‘कुमकुम – प्यार का बंधन’ ह्या सीरिअल मध्ये काम केले होते. ह्या सीरिअलमध्ये जुहीने एक आदर्श सून, पत्नी आणि आईची उत्तम भूमिका निभावली होते. ह्या मालिकेमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली होती. ह्यानंतर तिला खऱ्या आयुष्यात सुद्धा लोकं ‘कुमकुम’ म्हणूनच हाक मारत असत. २००२ मध्ये हा शो सुरु झाला होता आणि ह्यामध्ये तिची हुसेन कुवजर सोबत जोडी दाखवली होती आणि ह्याशिवाय ह्या शो मध्ये अरुण बाली आणि राता भादुडी सुद्धा दिसली होती. हा शो ७ वर्षांपर्यंत चालला. आणि त्यानंतर ह्या शो बंद करण्यात आला. ह्या सीरिअल नंतर जुही अनके सीरिअल्स मध्ये दिसून आली. ज्यात ‘विरासत’, ‘कुसुम’, ‘देवी’, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘तेरे इष्क मे’ आणि ‘संतोषी माँ’ ह्यासारख्या सीरिअल्सचा समावेश आहे. ह्या शिवाय जुहीने अनेक रिऍलिटी शो मध्ये सुद्धा भाग घेतला आहे. ज्यात ‘पती पत्नी और वो’, ‘नच बलिये’, ‘बिग बॉस’, ‘वो और किचन चॅम्पियन’ ह्यासारखे शो आहेत. कुमकुम सिरीयल नंतर जुही परमारच्या लूक मध्ये खूप बदल झाला आहे आणि मधल्या काळात तिचे वजन सुद्धा वाढले होते.
आपल्या वाढत्या वजनाबद्दल खुलासा जुहीने ‘बिग बॉस ५’ ह्या रिऍलिटी शो मध्ये केला होता. काही वर्षांअगोदर इकॉनॉमिक्स टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत जुहीने आपल्या वाढत्या वजनाचे उल्लेख केला होता आणि सांगितले, “मी दुसऱ्यांदा कामाची सुरुवात करत होती परंतु माझे वाढते वजन माझ्या करिअरच्या मध्ये आले. जे मेडिकल कारणांमुळे होते. इंडस्ट्री मध्ये कोणतेच तर्क चालत नाही. त्यानंतर माझ्यासाठी वजन कमी करणे हाच माझा पहिला उद्देश बनला.” जुहीने आपले वजन खूप कमी केले आणि आता ती पूर्णपणे फिट झाली आहे. जुहीने १७ किलो वजन कमी केल्यानंतर ‘दाता शनी’ पासून कमबॅक केले आणि हा सीरिअल २०१८ मध्ये ऑनएअर झाला होता. जुही शेवटची ‘तंत्र’ सीरिअल मध्ये दिसून आली होती. जुहीने अभिनेता सचिन श्रॉफसोबत २००९ मध्ये लग्न केले होते आणि २०१२ मध्ये जुही ‘बिग बॉस’ची विजेता झाली होती. ह्यानंतर तिची मुलगी समायराचा जन्म झाला होता. काही वर्षानंतर तिच्या आणि सचिनच्या नात्यात खटके उडू लागले. आणि त्यानंतर दोघांनी काडीमोड घेतला. साल २०१८ ला काडीमोड झाल्यानंतरसुद्धा ते दोघेही मुलीच्या पालनपोषण साठी एकत्र राहत आहेत.