Breaking News
Home / जरा हटके / १७ वर्षानंतर सेनानिवृत्त जवान गावात आल्यानंतर लोकांनी ज्याप्रकारे स्वागत केले ते पाहून तुम्हालासुद्धा अभिमान वाटेल

१७ वर्षानंतर सेनानिवृत्त जवान गावात आल्यानंतर लोकांनी ज्याप्रकारे स्वागत केले ते पाहून तुम्हालासुद्धा अभिमान वाटेल

भारतीय जवानांची जितकी प्रशंसा कराल तितकी कमीच आहे. आपण देशामध्ये सुरक्षित राहू म्हणून आपले हे जवान देशाच्या सीमेवर दिवस रात्र सेवेत असतात. वीर जवानांच्या ह्या सेवे बदल्यात आपले सुद्धा कर्तव्य बनते कि आपण सुद्धा त्यांना तसा मानसन्मान द्यायला हवा ज्याचे ते हकदार आहेत. असंच काहीसं मध्य प्रदेशमधील निमाच गावात झाले. इथे गावातल्या लोकांनी निवृत्त झालेल्या जवानाचे अश्याप्रकारे स्वागत केले कि जे पाहून सर्वांचे डोळे भरून आले. विजय बहादूर सिंग हे गेल्या १७ वर्षांपासून भारतीय सेनामध्ये काम करत होते. काही दिवसांअगोदरच ते निवृत्त होऊन आपल्या ‘जिरून’ गावात आले. इथे सर्वांनी आपले हाथ जमिनीवर फुलांसारखे फुलवून ह्या जवानाचे स्वागत केले. गावातील लोकांनी जेव्हा जवानाच्या येण्याची बातमी मिळाली तेव्हा त्यांनी त्याच्या स्वागतासाठी सगळीकडे फुले पसरवली होती.

गावातील घराघरातून लोकं बाहेर येऊन त्यांचे स्वागत करू लागले. सर्वात सुंदर दृश्य तर ते होते, जेव्हा गावातील लोकांनी जमिनीवर आपले हाथ पसरवून जवानाला त्याच्यावरून चालण्यास सांगितले. त्यानंतर सर्व गावकरी ह्या जवानाला घेऊन पुरातन मंदिरात घेऊन गेले. इथे जवानाने गावकऱ्यांसोबत श्रीगणेशाचे दर्शन घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेतले. गावकऱ्यांनी अश्या प्रकारे केलेले स्वागत पाहून जवानाचे डोळे भरून आले. जवान विजय बहादूर सिंग ह्यांनी सांगितले कि हे गाव स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर आहे. मी माझ्या १७ वर्षांच्या नोकरीमध्ये अनेक ठिकाणी गेलो, परंतु जसा मान सन्मान आणि प्रेम गावकऱ्यांकडून मिळाला आहे तसे कुठे पाहिले नाही. आज मला जाणवलं कि सेना आणि त्यांच्या जवानांप्रती लोकांच्या मनामध्ये किती आदर आहे. जवान विजय बहादूर सिंग ह्यांनी गावकऱ्यांना उद्देशून पुढे सांगितले कि, तुम्हा सर्वांनी केलेला ह्या मान सन्मान मी कधी विसरू शकत नाही.

आतापासून माझे हेच उद्देश असेल कि आपल्या आणि जवळपासच्या गावातील लोकांना भारतीय सेनेत जाण्यासाठी चांगल्याप्रकारे ट्रेनिंग देता येईल. मी त्यांना संपूर्णपणे सेनेमध्ये जाण्यासाठी सज्ज करेल. तर दुसरीकडे, मुलगा विजय बहादूर सिंग ह्याचे अश्याप्रकारे झालेले मानसन्मान आणि स्वागत पाहून वडील लालसिंग खूप भावुक झाले. त्यांचेसुद्धा डोळे भरून आले आणि अभिमानाने छाती फुलून आली आहे. त्यांनी सांगितले कि माझी इच्छा आहे कि, गावातील प्रत्येक मुलगा भारतीय सेनेमध्ये भरती व्हावा आणि आपले वडील तसेच देशाचे नाव उज्जवल करावे. विजय बहादूर ह्यांनी आपल्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत का’रगिल, सि’याचीन ग्ले’शिअर, ब’टालिक, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, जयपूर आणि शिमला सारख्या ठिकाणी देशासाठी सेवा केली आहे. इथे ते श’त्रूंशी तग धरून सामना करून देशाची सेवा करत होते.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.