असं म्हणतात कि बेइमानाची रोटी पचवणं इतकं सोपं नसते. परमेश्वर नंतर सर्व व्याजासकट त्याची परतफेड आपल्याकडून करून घेतो. ह्यामुळे माणसाने नेहमी प्रामाणिकच राहिले पाहिजे. जेव्हा आपण प्रामाणिक राहतो तेव्हा समाजात सुद्धा आपला मान वाढतो. हा मान पैश्यानेसुद्धा कमावला जाऊ शकत नाही. कदाचित हेच विचार चेन्नई मध्ये राहणाऱ्या एका रिक्षाचालकाचे सुद्धा असतील म्हणूनच त्याने दागिन्यांनी भरलेली बॅग आपल्या प्रवाश्याला परत केली. खरंतर श्रवण कुमार नावाचा व्यक्ती चेन्नई मध्ये रिक्षा चालवतो. एके दिवशी प्रवाशी त्याच्या रिक्षामध्ये चुकून दागिन्यांनी भरलेली बॅग विसरून निघून जातो. इतके सारे दागिने पाहूनसुद्धा रिक्षाचालकाच्या मनात बेईमानी आली नाही. त्याने प्रामाणिकपणे ती बॅग पोलीस स्थानकात जमा केली. सांगितले जात आहे कि, बॅगेमध्ये जवळजवळ २० लाखांचे दागिने होते.
हि बॅग पॉल ब्राईट नावाच्या एका व्यावसायिकाची होती. तो आपल्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी जात होता. त्याच्याजवळ काही बॅग्ज होत्या. तो फोनवर खूप वेळापासून बोलत होता. अशामध्ये फोन वर बोलता बोलता त्याची दागिने असलेली बॅग रिक्षामध्येच राहून गेली. काही वेळानंतर जेव्हा त्याला आपल्या बॅगची आठवण आली, तेव्हा तो घाबरला आणि त्याने ह्याबद्दल तक्रार करण्यासाठी क्रोमपेट पोलीस स्थानक गाठले. पोलिसांनी सुद्धा लगोलग कारवाईला सुरुवात केली आणि सांगितले कि आम्ही सीसीटीव्ही फुटेजवर रिक्षा चालकाला शोधून काढू. परंतु त्यांना माहिती पडलं कि त्या रिक्षाचालकाने अगोदरच त्याची बॅग पोलिसांकडे परत केली आहे. हि गोष्ट ऐकून पॉल ब्राईट खूप खुश झाला आणि त्याने रिक्षाचालकाचे आभार मानले. इतर दुसरीकडे रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन चेन्नई पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला.
जेव्हा सोशिअल मीडियावर हि घटना वायरल झाली तेव्हा प्रत्येकजण ह्या रिक्षाचालकाची प्रशंसा करू लागला. लोकं म्हणू लागले कि जर सर्वच रिक्षाचालक श्रवण कुमार सारखे प्रामाणिक झाले तर किती चांगलं होईल. त्यानंतर हे जग किती सुंदर बनेल. ह्या गोष्टीत कोणतीच शंका नाही कि ह्या रिक्षा चालकाने जगासमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. तुम्ही किती पैसे कमावता हे जरुरी नाही, परंतु तुम्ही किती प्रामाणिक आहात हि गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि प्रामाणिकपणाने जो वागतो त्याचा मान समाजात अजून वाढतो. धन्य तो रिक्षाचालक आणि धन्य ती त्याची प्रामाणिकता.