Breaking News
Home / बॉलीवुड / ३००० मुलींमधून निवडली होती शाहरुखची हिरोईन, बॉलिवूडमधून अचानक झाली गायब

३००० मुलींमधून निवडली होती शाहरुखची हिरोईन, बॉलिवूडमधून अचानक झाली गायब

मुंबईला चित्रपटसृष्टीची मायानगरी म्हटले जाते. परंतु मुंबईत आल्यावर बॉलिवूडमधे सर्वच कलाकारांचे नशीब चमकेलंच असे नाही. काही कलाकारांना खूप मेहनत करावी लागते, अडचणींचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक महिमा चौधरी आहे. होय, ही तीच परदेस वाली नटखट अभिनेत्री जिला हातोहात यश मिळाले. माहिमाला चित्रपटाच्या यशाची गोडी लागली. लग्न केले, नाते टिकले नाही आणि ती ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर राहायला लागली. आजच्या लेखात आपण महिमाच्या जीवनप्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. महिमा चौधरी हिचे खरे नाव ऋतू चौधरी असे आहे. महिमा चौधरीचा जन्म 13 सप्टेंबर 1973 ला दार्जीलिंग मध्ये झाला. करियरच्या सुरुवातीच्या काळात तिने काही जाहिराती केल्या. तिने आमिर खान आणि ऐश्वर्या राय ह्यांच्या सोबत जाहिराती मध्ये काम केले. नंतर एका म्युजिक चॅनेल साठी व्हिडीओ जॉकी म्हणून सुद्धा काम केले. तिचे वडील शीख तर आई नेपाळची आहे.

महिमाचे चित्रपटात पदार्पण खास आणि अविस्मरणीय झाले. सुभाष घईंना ‘परदेस’ चित्रपटासाठी नवीन चेहरा पाहिजे होता आणि ते तश्या खास चेहऱ्यांच्या शोधात होते. त्या रोलसाठी कमीतकमी 3000 मुलींचे ऑडिशन्स झाले. पण सिलेक्शन झाले फक्त महिमा चौधरीचे. 1997 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटातील अभिनेत्रीचे महिमा नाव सुभाष घईने दिले. तिचे खरे नाव ऋतू चौधरी असे होते. शाहरुख खान सोबत महिमाच्या जोडीला प्रेक्षकांनी उचलून धरले. ह्या जोडीला खूप पसंती मिळाली. महिमा चौधरी रातोरात स्टार बनली. ह्या चित्रपटासाठीमहिमाला सर्वोत्तम नवोदित कलाकारासाठी फिल्मफेअर मिळाला होता. ह्या दरम्यान महीमाचे नाव लोकप्रिय खेळाडूसोबत जोडले गेले. अश्या सुद्धा चर्चा होऊ लागल्या कि महिमाचे लोकप्रिय टेनिस खेळाडू लिऐंडर पेस सोबत प्रेमसंबंध होते. ते दोघे 6 वर्षे सोबत होते. परंतु हे प्रेम जास्त काळ टिकू शकले नाही.

तिला अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. शाहरुख खान, संजय दत्त, अजय देवगण आणि अनिल कपूर ह्यांच्या सोबत महिमाने काम केले. तिच्या अभिनयाचे कौतुकही झाली. २००० सुरुवातीला ती एक मोठी स्टार म्हणून पुढे आली जरूर परंतु ती हळूहळू चित्रपटसृष्टीतून दूर होऊ लागली. नंतर माहिती पडले कि तिने एका उद्योगपतीशी लग्न केले. तिच्या पतीचे नाव बॉबी मुखर्जी. 2006 साली महिमाने बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव अरियाना. तिचे लग्न जास्त काळ टिकले नाही. 2013 साली महिमा आपल्या पतीपासून वेगळी झाली. महिमा चौधरी कधीकधी राजकीय प्रचारामध्ये दिसून येत राहिली, नंतर वाटले कि ती टेलिव्हिजनवर दिसेल. ती २०१० मध्ये ‘पुशेर’ चित्रपटात दिसून आली. तिने काही टीव्ही शो केले पण ते जास्त चालले नाहीत. नवऱ्यापासून वेगळी झाल्यानंतर तिच्यावर घर चालवायची जबाबदारी आली. त्यासाठी ती इव्हेंट मध्ये सहभागी व्हायला लागली. मधल्या काळात तिचे वजन खूपच वाढले होते त्यामुळे ती खूपच चर्चेत होती. आता ती फिटनेसबद्दल जागरूक असून ती पुन्हा पहिल्यासारखी स्लिम झाली आहे. साध्ये ती आपल्या मुलीची काळजी घेण्यात व्यस्त असते. महिमाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी ती ‘परदेस गर्ल’ म्हणूनच ओळखली जाते.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.