असं म्हटलं जातं कि मैत्रीचं नातं सर्वात खास असतं. मित्रांशिवाय आयुष्यच अधुरं आहे, असं मानलं जातं. प्रत्येकाला हेच वाटत असतं कि त्याला खरा मित्र मिळावा. तसं तर आयुष्यात प्रत्येक वळणावर अनेक लोकं भेटतात, परंतु काही लोकं अशी असतात जे हृदयात जागा निर्माण करतात. मैत्री तर सहज होऊन जाते परंतु एक खरा मित्र सारखे सारखे नाही भेटत. शालेय जीवनात आपले खूप सारे मित्र बनतात. परंतु असं पाहिलं गेलं आहे कि मोठे झाल्यानंतर बहुतेकजण शाळेतल्या मित्रांना विसरून जातात. कदाचित तुम्हाला तुमच्या खास मित्राचे नाव लक्षात असेल, परंतु जो वेळेला कामाला येतो तोच खरा मित्र असतो. आज आम्ही तुम्हांला एक अशीच घटना सांगणार आहोत ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही सुद्धा म्हणाल, “वाह! मैत्री असावी तर अशी.” आम्ही शाळेतल्या अश्या मित्रांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपली पूर्ण मैत्री निभावली आहे.
सूत्रानुसार असं सांगितलं जात आहे कि, ४४ वर्षीय मुत्थु कुमार ट्रक चालवून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होता. लॉकडाऊनच्या अगोदर तो महिन्याला जवळजवळ १० ते १५ हजार कमवत होता. परंतु लॉकडाऊन झाल्यापासून त्याची परिस्थिती खूपच वाईट झाली. त्याची कमाई जवळजवळ नसल्याचा बरोबरीचीच होती. लॉकडाऊन मुळे जेमतेम १ ते २ हजारच महिन्याकाठी जमत होते. अश्या बिकट परिस्थितीत घर चालवणं खूपच कठीण झालं होतं. त्याच्या कुटुंबात ६ सदस्य आहेत, जे एका झोपडीत आपले जीवन जगत आहेत. आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती कि दोन वेळेच्या खाण्याची व्यवस्था करणे देखील खूप कठीण झाले होते.
सप्टेंबर महिन्यात मुत्थुकुमार आपल्या शाळेतील शिक्षकांना भेटण्यासाठी गेला होता. जिथे त्याची भेट आपल्या शाळेतील मित्र नागेंद्रनसोबत झाली. ३० वर्षांनंतर शाळेतील खास मित्र नागेंद्रन भेटल्यामुळे मुत्थुकुमार खूप खुश झाला. त्याने नागेंद्रनला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. जेव्हा नागेंद्रन शाळेतील आपला खास मित्र मुत्थुकुमारच्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या घराची परिस्थिती पाहून त्याला खूप दुःख झाले. तेव्हा नागेंद्रन ह्याने आपल्या मित्राची मदत करायचे ठरवले आणि त्याच्या TECL शाळेतील मित्रांच्या व्हा’ट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पैसे जमवले.
नागेंद्रनने असं सांगितले होते कि, ” जेव्हा मी आपल्या मित्राच्या घरी पोहोचलो तेव्हा घराची परिस्थिती पाहून खूप दुःख झालो होते. च’क्रीवा’दळाने घराचे छप्पर आणि जवळपासच्या झाडांना देखील पाडलं होतं. घराच्या आत जाण्यासाठी सुद्धा झुकावे लागत होते. तेव्हा मी आपल्या मित्राची मदत करण्याचे मनात ठरवले आणि मी एक व्हॉ’ट्सअप ग्रुप बनवून त्याच्या घरातील फोटो आणि व्हिडीओ काढून शेअर केले होते. ज्यानंतर अनेकांनी त्याची मदत करण्यासाठी हात पुढे केले होते.”
कोणत्याही इंजिनिअर शिवाय नागेंद्रन आणि त्याच्या साथीदारांनी ३ महिन्याच्या आत जवळजवळ १.५ लाख रुपये जमवले. ह्यानंतर दिवाळीला नागेंद्रन आणि त्याच्या सर्व मित्रांनी मुत्थुकुमार आणि त्याच्या कुटुंबाला नवीन घर बनवून भेट स्वरूपात दिले. नागेंद्रन ह्याचे असं सांगणं आहे कि, “भलेही आम्ही संपर्कात नसतील, परंतु शाळेतील मित्र नेहमी खास असतात. जर कोणत्याही मित्रावर कोणत्याही प्रकारचे सं’कट आले असेल तर अश्या परिस्थितीत मित्रांची मदत हि करायलाच हवी.”