Breaking News
Home / बॉलीवुड / ३५ वर्षांपूर्वी सनी देओलने परदेशात लपून केले होते लग्न, आजही खूप सुंदर दिसते पत्नी

३५ वर्षांपूर्वी सनी देओलने परदेशात लपून केले होते लग्न, आजही खूप सुंदर दिसते पत्नी

प्रेम आणि दुःख हे एकमेकांपासून पासून लपू शकत नाही. कारण, हे दोघेही चेहऱ्या वरून सुख दुःख ओळखतात. बॉलिवूड मधील काही कलाकारांची लव्ह स्टोरी जग जाहीर आहे. पण काही कलाकारां विषयी तितकेच महिती असते जितके त्यांनी सांगितलेले असते. आम्ही आज बॉलिवूडचा ऍक्शन हिरो सनी देओल च्या लव्ह स्टोरी विषयी बोलत आहोत. तुम्हाला माहिती नसेल सनी देओलचे लग्न रोमांचक झालं होतं, आणि लग्ना नंतर एवढे वर्षा नंतरही त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. तसेच आजही त्यांची पत्नी खूप सुंदर दिसते. सनी देओल आपल्या वैयक्तिक जीवनावर जास्त काही बोलत नाही पण त्याने सांगितले कि त्याचे लग्न 35 वर्षा पूर्वी लपून छपून झाले. सनी देओलने गुप्तरित्या परदेशात लग्न केले होते. चला पाहूया यांची प्रेम कहाणी. हिंदी चित्रपटातील रुपेरी पडद्यावर बेताब, दामिनी, गदर, घायल आणि इंडियन यासारखे हिट चित्रपट देणारा सनी देओल एक लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रेटी आहे. परंतु तो बॉलिवूड पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये सहसा दिसत नाही. त्याने स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला बॉलिवूडच्या झगमगती दुनियेपासून लांबच ठेवले आहे.

त्याला एक पत्नी आणि दोन मुले आहेत. सनी देओलने आपले वैयक्तिक जीवन मीडिया पासून दूर ठेवले. सनी देओलने 35 वर्षा पूर्वी पूजा सोबत विवाह केला. सनी आणि पूजा एकमेकांना लहानपणा पासुन ओळखतात. कारण दोन्ही कुटुंबाचा व्यावसायिक संबंध आहेत आणि खूप वेळा ते दोघे लग्न सोहळा किंवा इतर सोहळ्यात एकत्र भेटायचे. असे सांगतात की, सनीचे लग्न बेताब चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर झाले होते पण त्याने ते लपवुन ठेवले. त्याकाळी सनी देओलची फॅन फॉलोईंग खूप जास्त होती. आणि जर एखाद्या अभिनेत्याने लग्न केले तर त्यांच्या चाहत्यांची संख्या कमी होईल अशी भीती त्याकाळी असायची. बेताब चित्रपट रोमँटिक होता आणि चित्रपट निर्माता आणि सनीचे पिता धर्मेंद्र यांना भीती होती कि लग्ना विषयी कळल्या नंतर प्रेक्षकांनी सनीला पसंत केले नाही तर. म्हणून मीडिया समोर लग्ना ची बातमी उशिरा आणली. आणि सनी- पूजा च्या सांगण्या वरून त्यांचे लग्न लपून छपून केले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सनी आणि पूजा दोन्ही कुटुंबात एक ऍग्रीमेंट झाले होते, जे सनी आणि पूजा ह्यांच्या लग्नासोबत फॅमिली रिलेशन मध्ये बदलले होते. सनीच्या कुटुंबाने त्याचे लग्न झाल्याची गोष्ट लपवून ठेवली होती. कारण आताच त्याच्या करिअरला सुरुवात झाली होती. सनीला भीती होती कि, लग्न झाल्याची बातमी माहिती झाल्यानंतर प्रेक्षक त्याला रोमँटिक हिरोसारखं पसंत करणार नाही. हेच कारण होते कि, पूजा लंडनमध्ये राहत होती आणि सनी प्रत्येक महिन्यात तिला भेटण्यासाठी लंडनमध्ये जात असे. ह्याच दरम्यान सनीचे लग्न झाल्याची बातमी वृत्तपत्रात छापून आली. परंतु सनी ह्या बातमीला नकार देत होता.

सनीची पत्नी पूजा खूप सुंदर आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर जास्त दिसत नाही. सनीची पत्नी पूजा लाइमलाइट पासून दूर राहिली आणि आपल्या मुलांच्या संगोपनाकडे लक्ष दिले. सनीचा होम प्रोडक्ट चित्रपट ‘यमला पगला दिवाना-2’ चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून पूजाला दाखवली आहे. परंतू कोणी तिला ओळखू शकले नाही. सूत्रांच्या माहिती नुसार पूजाला फिल्म इंडस्ट्री मधे ऐश्वर्या राय खूप आवडते. तिला वाचण्याचा छंद आहे. दोघांनाही दोन मुले असून मोठ्या मुलाचे नाव करण देओल तर आणि छोट्या मुलाचे नाव राजवीर देओल असे आहे. सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातुन बॉलिवूड मधे पदार्पण केले. या चित्रपटा साठी सनीने प्रथमच निर्मात्याची कमान सांभाळली आणि होम प्रोडक्शन मधे त्याने आपल्या मुलाला संधी दिली. दिसण्याबद्दल बोलाल तर करण आपल्या वडिलांसारखाच. सनीच्या पावलावर पाऊल टाकून त्याने बॉडी सुद्धा खूप छान बनवली आहे. सनीने अभिनयात चांगले प्रदर्शन केले आहेच त्या प्रमाणे तो राजकारणात सुद्धा स्वतःची चांगली ओळख निर्माण करतोय. आपलया मुलाने अभिनयामध्ये आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे घेऊन जावी, अशी सनीची इच्छा आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.