Breaking News
Home / बॉलीवुड / ४१ चित्रपटांत एकत्र काम करूनही गोविंदाने कादर खानना शेवटच्या दिवसात ह्यामुळे फोन केला नाही

४१ चित्रपटांत एकत्र काम करूनही गोविंदाने कादर खानना शेवटच्या दिवसात ह्यामुळे फोन केला नाही

गोविंदाने ज्यावेळेला बॉलिवूडमध्ये एंट्री केली त्यावेळी बॉक्स ऑफिस वर अमिताभ बच्चन ह्यांचे राज्य होते. सोबतच तिन्ही खाननी आपल्या करिअरची चांगली सुरुवात केली होती. अशामध्ये गोविंदासाठी बॉक्स ऑफिसमध्ये आपली ओळख निर्माण करून लोकांच्या मनात आपली जागा बनवणे खूपच मुश्किल होते. परंतु गोविंदाने हि गोष्ट शक्य करून दाखवली. हि गोष्ट गोविंदाला आपल्या विनोदी टायमिंगच्या जोरावर करता आली. गोविंदाने आपल्याला एकापेक्षा एक विनोदी चित्रपट दिले आहेत. त्याच्या विनोदाच्या टायमिंगशी आजही कोणी स्पर्धा करू शकत नाही. बॉलिवूडच्या काही अभिनेत्री आहेत, ज्यांच्यासोबत गोविंदाने केलेले चित्रपट सुपरहिट झाले. जश्या कि नीलम, रविना टंडन आणि करिष्मा कपूर ह्यांच्यासोबत गोविंदाच्या जोडीला लोकांनी खूप पसंत केले. परंतु ह्या सर्व अभिनेत्रींबरोबरच गोविंदा सोबत अजून एक सहाय्यक अभिनेता असायचा, ज्यांच्यासोबत ह्या जोडीला खूप पसंत केले गेले. उलट ह्या अभिनेत्यासोबत गोविंदाने तब्बल ४१ चित्रपटांत काम केले आहे. ते कलाकार म्हणजे दिग्गज अभिनेते कादर खान होय.

कदर खान सोबत गोविंदाची जोडी खूप लोकप्रिय झाली. ह्या दोघांच्या जोडीला बॉलिवूडमध्ये इतकं पसंत केले गेले कि कधी कादर खान ने गोविंदाच्या वडिलांची भूमिका केली असेल, नाहीतर दोघे जावई सासरा बनले असेल, नाहीतर एक श्रीमंत हॉटेलमालक आणि गरीब धाब्याचा मालक असू द्या चित्रपट सुपरहिट होणे ठरलेलेच असायचे. चित्रपटांशिवाय दोघांचे नाते खूप चांगले होते. गोविंदाचे वडील नव्हते, म्हणून तो कादर खान ह्यांना वडिलांसमान मानायचा आणि त्यांना ‘उस्ताद’ म्हणून हाक मारायचा. उस्ताद म्हणजे गुरु होय. परंतु एका वेळेला गोविंदा आणि कादर खान ह्यांच्यात असा वाद झाला कि दोघांनीही आपले मार्ग बदलले. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत, कधी गोविंदा आणि कादर खान ह्यांच्यात वाद झाले, का त्या दोघांना एकमेकांवर राग आला, आणि कसे कादर खान गोविंदावर ओरडले.

कादर खान ह्यांनी बॉलिवूडमध्ये खूप मोठा प्रवास केला आहे. ते अभिनय करण्यासोबतच एक खूप मोठे लेखक सुद्धा होते. त्यांनी अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती ह्यांच्या अनेक हिट चित्रपटांचे डायलॉग्स आणि स्क्रीनप्ले लिहिले होते. गोविंदाच्या सुद्दा अनेक चित्रपटांसाठी कादर खान ह्यांनी डायलॉग्स आणि स्क्रीन प्ले लिहिले होते. जसे कि ‘आंटी नंबर वन’, ‘कुली नंबर वन’, ‘साजन चले सासुराल’ आणि ‘राजाजी’. गोविंदाचे असे मानणे होते कि त्याच्या ज्या चित्रपटासाठी कादर खान ह्यांनी लिखाण केले आहे ते सर्व चित्रपट सुपरहिट व्हायचे. हेच कारण होते कि गोविंदा कादर खान ह्यांना आपला गुरु मानायचा. एकदा एका चित्रपटाच्या सेटवर मोकळा वेळ मिळाला असताना कादर खान एका दैविक पुस्तकाचे लिखाण करत होते. गोविंदाने हे पाहिल्यावर त्यांना त्यावेळी पुस्तक लिहिण्यासाठी मनाई केली. गोविंदाने त्यावेळी कादर खान ह्यांना ह्यासाठी मनाई केली होती कारण कादर खान ह्यांनी त्यावेळी अश्या क्रिया केल्या होत्या ज्या त्यांच्या प्रकृतीसाठी तर खराब आहेच सोबत ह्या क्रिया केल्यानंतर आध्यत्मिक वस्तूंना हात लावणं चुकीचं असतं. ह्याचा प्रभाव आपल्या करियरवर आणि त्याच्या पुढच्या जीवनावर पडतो. हि गोष्ट गोविंदाने स्वतः एका इंटरव्यू मध्ये सांगितली. गोविंदा खूप धार्मिक प्रकारचा माणूस आहे त्यामुळे त्याने कादर ह्यांना असं करताना पाहिले तेव्हाच त्यांनी कादर खान ह्यांना मनाई केली.

गोविंदाची हि गोष्ट कादर खान ह्यांना आवडली नाही. कारण त्यावेळी ते वेगळ्या मनस्थितीतुन जात होते. ह्यामुळे कादर खान ह्यांना लगेचच राग आला. ते गोविंदाला ओरडले. गोविंदावर ओरडत असताना त्यांनी अश्या काही गोष्टी बोलल्या ज्या गोविंदाच्या मनाला खूप लागल्या. ह्या प्रकारानंतर गोविंदाने कादर खान ह्यांच्यासोबत बोलणेच बंद केले. परंतु त्यानंतर गोविंदाने अनेकदा कादर खान ह्यांच्यासोबत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु हे नातं पुन्हा तयार होऊ शकले नाही. साल २०१७ मध्ये जेव्हा कादर खान सर्गवासी झाली तेव्हा गोविंदाने ट्विट करून दुःख व्यक्त केले. त्याने ट्विट मध्ये लिहिले त्याचे उस्ताद, फादरफिगर कादर खान ह्या जगात राहिले नाही. गोविंदाच्या ह्या ट्विटवर कादर खान ह्यांच्या मुलाचा रिप्लाय आला आणि त्यांनी सांगितले कि ज्या व्यक्तीला तुम्ही ‘फादरफिगर’ म्हणत आहात, जेव्हा तुमचे हे ‘फादरफिगर’ तुमचे पिता समान व्यक्ती जेव्हा हॉस्पिटल मध्ये होते, दुःखामध्ये होते तेव्हा तुम्ही किती वेळा त्यांना कॉल करून विचारले. जेव्हा गोविंदाला कादर खान ह्यांच्या मुलाच्या त्या ट्विट बद्दल विचारले तेव्हा गोविंदाने सांगितले कि तो अजून मुलगा आहे आणि त्याला अजून आमच्या नात्याची माहिती नाही आहे. असं असलं तरी प्रत्येकाला वाटत असेल कि गोविंदा आणि कादर खान ह्यांचे नाते पाहिल्यासारखे व्हायला हवे होते. कादर खान गोविंदाचे चित्रपट आजही जेव्हा टिव्हीवर येतात तेव्हा सर्वांना हसवतात. ह्या दोघांच्या जोडीने तब्बल ४१ चित्रपटात एकत्र काम केले आहे. तुम्हांला आजचा लेख कसा वाटला, नक्की सांगा.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *