Breaking News
Home / बॉलीवुड / ५७ व्या वयात सुद्धा अशी दिसते पूनम ढिल्लो, तारुण्यात होती खूप सुंदर

५७ व्या वयात सुद्धा अशी दिसते पूनम ढिल्लो, तारुण्यात होती खूप सुंदर

असं म्हणतात कि वय एक आकडा असतो. आपण खरं तर स्वतःला कसं प्रेझेंट करतो हे जास्त महत्वाचे असते. हेच कारण आहे कि तुम्ही कोणत्याही वयात सुंदर दिसू शकतो. आत्ता आपण बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोचेच उदाहरण घ्या ना. 18 एप्रिल 1962 मधे जन्मलेली पूनम ढिल्लो आत्ता 57 वर्षाची आहे. जेव्हा ती तयार होऊन बाहेर पडते तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या दिसतात. पूनमने या वयात सुद्धा स्वतःला चांगलं सांभाळून ठेवलं आहे. हेच कारण आहे ती एका पार्टीला पोहचली तर तिच्या समोर बाकी महिला फिक्या पडल्या. तुम्हाला खोटं वाटत असेल तर स्वतः तिच्या सुंदरतेचे फोटो पहा. आपल्या माहितीसाठी सांगतो दाक्षिणात्य चित्रपटाचे सुपरस्टार चिरंजीवीने आपल्या हैदराबाद मधील घरात एक पार्टीचे आयोजन केले होते.

या पार्टीचे मुख्य हायलाईट ८० च्या दशकातील सोबत काम केलेल्या कलाकारांचा गेट टू गेदर ठेवला होता. पार्टी मधे सोनेरी आणि काळ्या रंगाची थीम ठेवली होती. या पार्टीला पूनम ढिल्लो व्यतिरिक्त जयाप्रदा, नागार्जुन, राधिका सरतकुमार सह बॉलिवूडचे बरेच हस्ती उपस्थित होते. आणि दाक्षिणात्य चिञपटातील हस्ती सुद्धा उपस्थित होते. ८० च्या दशकातील काम करणारे कलाकार या पार्टीत दिसले आणि त्यांनी खूप एन्जॉय केले. प्रत्तेक जण इथे नटून थटून आला होता. या पार्टीत खरं लाईमलाईट पूनम ढिल्लो घेऊन गेली. पूनमने यावेळी सोनेरी काठाचा काळा टॉप घातला होता. त्यावर सोनेरी रंगाचा जॅकेट आणि पँट घातली होती. या मधे पूनम आपल्या वयाच्या तुलनेत तरुण दिसत होती. पार्टी मधे सगळ्यांची नजर पूनम वर होती. काळ्या रंगाचा छान ड्रेस घातलेली जयाप्रदा पूनम समोर फिकी दिसत होती.

तिकडे सोशल मीडियावर लोकांना पुनमचा नवा लूक खूप आवडला. तारुण्यात पूनम खूप सुंदर होती. लोकं पुनमच्या अभिनया प्रमाणे तिच्या सुंदरतेचे वेडे होते. तेरी मेहरबानीयाँ, नूरी, ये वादा रहा, तेरी कसम, रेड रोज यासारखे तिचे ओळखीचे चित्रपट आहेत. चित्रपटा व्यतिरिक्त पूनम ‘एक नई पहचान’ नावाच्या टीव्ही सिरियल मधे दिसली होती. हल्ली पूनम चित्रपटसृष्टी पासून लांब राहिली आहे. ती सध्या पार्टी आणि दुसऱ्या इव्हेंट मधे दिसते. पुनमच्या वैवाहिक जीवना विषयी बोलायचे झाले तर 1988 मधे बॉलिवूड निर्माता अशोक ठकेरीया सोबत लग्न केले. आणि १९९७ मधे दोघांचा घटस्फोट झाला. तिला दोन मुले आहेत. अनमोल आणि पलोम अशी त्या दोघांची नावे आहेत. कामा बद्दल बोलायचे झाले तर पूनम २०१८ मधे ‘दिल हि तो है’ या सिरियल मधे दिसली. या वर्षी ती २०२० मधे ‘जय मम्मी दी’ नावाच्या चित्रपटात दिसेल. चित्रपटात तिच्या सोबत सुप्रिया पाठक, सनी सिंह निज्जर आणि सोनाली सेगल दिसेल.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *