गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन नंतर आपल्यापैकी अनेकांनी नवनवीन सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्स उदयास येताना बघितले आहेत. त्यातील अनेकांनी खूप छान काम ही केलेलं आहे. आपण यातील अनेकांच्या युट्यु’ब, इ’न्स्टाग्राम आणि फे’सबुक सारख्या अ’काउंट्सना फॉलो केलेलं असेल. यातीलच एका ‘चिरतरुण’ इन्फ्लुएन्सर चा डान्स व्हिडियो आपल्या टीमच्या बघण्यात आला. त्यांच्या विषयी थोडी माहिती ऐकण्यात आली आणि कौतुक वाटलं. या कौतुकातूनच त्यांच्या विषयी आपला एक लेख असावा, असं वाटलं आणि त्याची परिणीती म्हणजे आता हा लेख लिहिला जातो आहे. या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत रावी बाला शर्मा. वय वर्षे ६० च्या पलीकडले. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होण्यास वयाचं बंधन नसतं, हे सिद्ध करणाऱ्यांपैकी एक म्हणजे रावीजी. किंबहुना वयाने मोठे आणि मनाने तरुण असणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सच्या यादीत त्यांचं निर्विवाद पहिलं स्थान असावं. त्यांनी केलेल्या नृत्यविष्कारांमुळे त्यांना हे स्थान मिळण्यास मदत झाली आहे.
रावी या आयुष्यातील बराचसा काळ उत्तर भारतात राहिलेल्या आहेत. त्यांच्या घरी संगीत क्षेत्राचं पोषक वातावरण होतं. त्यांचे वडील संगीत क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांनी अतिशय लहान वयात संगीत साधना सुरू केली. पुढे संगीत शिक्षिका म्हणूनही काम पाहिलं. अगदी लग्न झाल्यावरही त्यांच्या पतीराजांनी त्यांना संगीत क्षेत्रातील कामासाठी प्रोत्साहन दिलं. या संपूर्ण काळात नृत्यविषयी आवड होतीच. एका मुलाखतीत आठवणींना उजाळा देताना त्या म्हणतात की या त्यांच्या आवडीला त्यांच्या सासूबाईंनी सुदधा खूप पाठिंबा दिला. त्यामुळे ही आवड जोपासली गेली ती आजतागायत. अर्थात काही काळापूर्वीपर्यंत केवळ मनापासुन आवड आहे म्हणून त्या नृत्य करत असत. मागच्या वर्षी लॉक डाऊन सुरू झाला त्या काळात त्यांनी एका कार्यक्रमासाठी आपला डान्स व्हिडियो केला होता. तो वायरल झाला. त्याच काळाच्या आसपास त्यांच्या मुलाने त्यांना सोशल मीडिया अकाउंट सुरू करून दिलं. या नवं माध्यमातून मग त्यांना सातत्याने विविध डान्स च्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करता आलं. जिथे उत्तम कला सादर केली जाते तिथे चाहते जमा होतातच.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे रावी यांचं इन्स्टाग्राम अकाउंट. आज जवळपास सवा लाखांहून अधिक फॉलोवर्स रावी यांना लाभले आहेत. बरं त्यांची चर्चा केवळ सोशल मीडिया वरच आहे असंही नाही. तर अनेक प्रथितयश वृत्तसंस्थानी त्यांच्या विषयी कौतुक व्यक्त करणारे लेख लिहिले आहेत. एवढंच काय , तर त्यांचा डान्स व्हिडियो बघून पंजाबी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले गायक, दिलजीत दोसांज यांनीही रावी यांचं कौतुक केलं आहे. यावरून रावी यांच्या वाढत्या लोकप्रियतेची कल्पना यावी. आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो ही लोकप्रिय आहे. जवळपास वीस लाखांहून अधिक व्ह्यूज लाभलेला हा व्हिडियो आहे. या व्हिडियोत आपल्याला रावी या एका सुप्रसिद्ध हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसतात. बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘पिंगा’ या सुप्रसिद्ध गाण्यावर रावी यांनी खूप उत्तम सादरीकरण केलेलं आहे. गाण्याला साजेसा असा पोशाख परिधान करून रावी या आपला डान्स सादर करत असतात.
या संपूर्ण व्हिडियोत त्यांचा प्रसन्न चेहरा, त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि नृत्यातील ठेहराव या गोष्टी विशेष लक्षात राहतात. तसेच मोजक्याच पण उत्तम स्टेप्स मुळे सादरीकरण उत्तम होतं आणि लक्षात राहतं. रावी यांचा डान्स करतानाचा उत्साह बघून आपल्यालाही स्फुरण चढल्यासारखं होतं. यातूनच त्या खऱ्या अर्थाने इन्फ्लुएन्सर आहेत हे जाणवतं. येत्या काळातही रावी यांनी साकार केलेली अनेक नृत्यं आपल्याला अनुभवायला मिळतील हे नक्की. येत्या काळातील त्यांच्या या वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आतापर्यंत जे यश मिळवलं आहे त्याबद्दल मनापासून अभिनंदन !!
आपल्याला रावी यांचे डान्स परफॉर्मन्स आवडले असतीलच. सोबतच त्यांच्या विषयी लिहिलेला हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा लेख आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. आपण आमचे लेख शेअर करता त्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं. आपलं हे प्रोत्साहन आम्हाला नेहमी मिळत राहो हीच सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :