प्रेम कधीही, केव्हाही आणि कुणासोबतही होऊ शकते. अनेकदा आपण प्रेमात इतके आंधळे होऊन जातो कि समोरच्या माणसाच्या मनातील हेतू पाहू शकत नाही. असंच काहीसे युकेमध्ये राहणाऱ्या ६८ वर्षीय बेथ हेनिंग सोबत घडलं. वयाच्या ह्या स्टेजवर एकट्या बेथला आपल्याहून अर्ध्या वयाच्या रॉडनी सोबत प्रेम झाले. रॉडनी हा घाना येथील राहणारा आहे आणि तो म्युजिक कॉन्सर्ट सुद्धा करायचा. ह्याशिवाय तो सामाजिक कार्यातसुद्धा पुढे असायचा. तर ६८ वर्षीय बेथ सुद्धा सामाजिक कामे करते. ती घानातील लोकांसाठी पैसे गोळा करायची. ह्याच दरम्यान तिची रॉडनीसोबत भेट झाली.
दोघांनी २०१४ मध्ये फेसबुकवर बोलणं सुरु केले होते. हळूहळू दोघेही फ्लर्ट करू लागले आणि नंतर दोघांमध्ये प्रेम होऊ लागले. बेथ हेनिंगने सांगितले कि जेव्हा पहिल्यांदा कोण्या वयस्कर महिलेला तरुण मुलासोबत प्रेम होते तेव्हा ती त्याची थट्टा करते, परंतु हीच गोष्ट जेव्हा तिच्यासोबत घडली तेव्हा तीच डोक्याने काम करणंच बंद केलं. सोशिअल मीडियाच्या माध्यमातून दोघांची चांगली मैत्री झाली. प्रेमाचे वारे वाहणे सुरु झाले, तेव्हा रॉडनीने बेथ कडून काही पैसे मागितले. सुरुवातीला मागितलेली हि रक्कम फारच कमी होती, त्यामुळे बेथने सुद्धा ताबडतोब पैसे दिले. परंतु ह्याच्या काही दिवसानंतर रॉडनीने दुसऱ्यांदा आपले तोंड उघडले आणि पैश्याची मागणी करू लागला. बेथने दुसऱ्यांदा त्याची मदत केली. आता ह्या दोघांचे फेसबुकवर रोज बोलणं होत होते. एकदा बेथ आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी घानाला गेली होती. येथे पोहोचल्यावर रॉडनीने बेथला खूप खास फील केले होते. लवकरच त्याने लग्नासाठी प्रस्ताव ठेवला आणि बेथने त्याच्याशी लग्न सुद्धा केले. ह्या लग्नामुळे बेथची मुलं खुश नव्हती. बेथ म्हातारपणी एकटी झाली होती म्हणून तिने घेतलेला लग्न करण्याचा निर्णय, तिच्यासाठी योग्य वाटला.
लग्नानंतर दोघेही सोबत राहू लागले. ह्या दोघांमध्ये नंतर खूप भांडणं होऊ लागली. रॉडनीने बेडरूमऐवजी सोफ्यावर झोपणं सुरु केले. तो बेथच्या आर्थिक परिस्थितीवरून सुद्धा टोमणे मारायचा. बेथच्या घरी राहून अनेकदा तिच्याकडूनच पैसे मागायचा. जेव्हा बेथला पैसे देणे शक्य नसायचे तेव्हा तिला खूप शिवीगाळ करायचा. लवकरच बेथला कळून आलं कि रॉडनीने फक्त आणि फक्त पैश्यांसाठी तिच्याशी लग्न केले होते. तिला ह्या गोष्टीची सुद्धा माहिती मिळाली कि रॉडनीचे खरे वय ३० आहे. जे त्याने बेथला स्वतः वर्षे ४० असल्याचे सांगितले होते. शेवटी बेथने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. परंतु घटस्फो’टापर्यंत हे प्रकरण जाता जाता बेथ १७ लाख रुपये कर्जामध्ये डुबली होती. बेथ ने रॉडनीला पैसे दिले आणि त्याच्यावर खूप सारे पैसे सुद्धा उडवले. घटस्फो’टाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा वेगळे पैसे खर्च झाले. आता बेथला हे नातं संपवून आपल्या मुलांसोबत निवांत राहायचे आहे. बेथने आपली हि कहाणी सोशिअल मीडियावर शेअर करून इतर महिलांना सुद्धा अशाप्रकारच्या लबाडीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.