Breaking News
Home / बॉलीवुड / ८५ व्या वर्षी बॉलिवूडच्या ‘ह्या’ लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचे दिवाने होते एम एफ हुसेन

८५ व्या वर्षी बॉलिवूडच्या ‘ह्या’ लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचे दिवाने होते एम एफ हुसेन

प्रसिद्ध पेंटर मकबूल फिदा हुसैन ( एम एफ हुसेन ) आपल्या काढलेल्या चित्रांमुळे फार लोकप्रिय होते. त्यांनी रेखाटलेल्या चित्रांमुळ ते फार चर्चेत राहिले. त्यांना भारताचा ‘पिकासो’ म्हणून संभोधले जाते. त्यांच्या चित्रांमुळे ते काहीवेळ वादविवादात सुद्धा अडकले होते. एम एफ हुसैन ह्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1915 मध्ये मुंबईत झाला. त्यांचे निधन ९ जून २०११ लंडनमध्ये झाले. एम एफ हुसेन हे आपल्या मेहनतीच्या बळावर यशाच्या इतक्या मोठ्या शिखरावर पोहोचले जिथपर्यंत पोहोचणं एका पेंटरचं एक स्वप्न असतं. भलेही ती कितीही मोठे पेंटर बनले परंतु चित्रपटांशी त्यांची आवड नेहमीच खास राहिली आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्र्यांची त्यांनी स्तुती केली आहे. चित्रांसोबतच त्यांचे चित्रपट आणि अभिनेत्रीं सोबत चांगलं नातं राहिले आहे. काही अभिनेत्रींचे ते वेड्यासारखे चाहते होते.

असे सांगितले जाते की, त्यांच्या आवडत्या अभिनेत्रिंच्या यादीत माधुरी दीक्षितचे नाव सर्वात अग्रस्थानी होते. त्यांना ती अतिशय प्रिय होती, माधुरीवर त्यांनी चित्रांची पुर्ण सिरीज बनवली होती. त्यांना माधुरीचा ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट एवढा आवडला होता की, त्यांनी तो 67 वेळा पहिलेला. एवढच नव्हे, तर त्यांनी 2000 साली माधुरीला घेवून ‘गजगामीनी’ नावाचा चित्रपट बनवला. त्यावेळी हुसैनचे वय 85 वर्ष एवढे होते. त्या चित्रपटासाठी त्यांना दोन करोड पन्नास लाख खर्च करावे लागले. पण दुर्दैवाने तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 26 लाखाचाच गल्ला केला.

माधुरीसाठी ते एवढे वेडे होते की, 2007 साली माधुरीने कमबॅक केले, तेव्हा तिचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘आजा नचले’ पाहण्यासाठी पूर्ण चित्रपटगृह बुक केलेलेे. त्यावेळी हुसैन दुबईला होते. दुपारचा शो पाहण्यासाठी हुसैनने दुबईतील लैम्सी चित्रपटगृह पूर्ण बुक केले होते. माधुरी व्यातिरिक्त आणखी काही अभिनेत्रींवर सुद्धा एम एफ हुसैनचे मन आले होते. त्यापैकी तब्बू एक होती. तब्बू सोबत त्यांनी ‘मीनाक्षी ; अ टेल ऑफ थ्री सिटिज’ चित्रपट बनविला. याशिवाय ते ‘विवाह’ चित्रपटाची अभिनेत्री अमृता राव वर खुश झाले. हुसैनने अमृताच्या वाढदिवसाला तीन पेंटिंग भेट दिल्या, त्यांची किंमत एक करोड असेल असं जाणकार सांगतात.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *