Breaking News
Home / माहिती / 15 रुपयाची कॉफी 133 रुपयांत विकूनसुद्धा का होते नुकसान, CCD च्या आधीच्या कामगारांनी सांगितले

15 रुपयाची कॉफी 133 रुपयांत विकूनसुद्धा का होते नुकसान, CCD च्या आधीच्या कामगारांनी सांगितले

एक कप कॉफीवर किती काही होऊ शकते. ‘A lot can happen over coffee ‘ म्हणजे कॉफीच्या एका पेल्यावर भरपूर काही होऊ शकते. वीजी सिद्धार्थने याच टॅगलाइन बरोबर ‘कॅफे कॉफी डे’ ची सुरुवात केली होती. या कॉफीवर बरच काही झाले आणि होत आहे. उद्योगातील तोटा आणि कर्जदारांचा त्याच्यावरील दबावामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांनी आत्मह त्या केली. प्रश्न वीजी सिद्धार्थच्या बिझनेस मॉडलवर उठू लागले. म्हणजे जर एखादा माणूस 15 रुपयाची कॉफी 133 रुपयात विकत असेल तर त्याचा उद्योग डबघाईला आला कसा ? देशातील मोठ्या कॉफी कॅफे विषयी हे सर्व ऐकून प्रत्येक जण विचारात पडलाय. याचे कारण असे, जर कॅफे कॉफी डे ची सुरुवात सन 1996 मध्ये 6 करोडच्या भांडवलावर सुरु झाली, ती सन 2017-18 मध्ये 1,777 करोडच्या भांडवलावर येवून पोहोचली. त्यानंतर 2018 – 19 मध्ये हा आकडा 1,814 वर पोहोचला. चालू वर्ष संपताना भांडवल 2,250 करोड होण्याची संभावना होती. मग तोटा कसा ?

सीसीडीच्या आधीच्या कामगारांचे अनुभव काय आहे?

या पूर्ण गोष्टीची दुसरी बाजू आहे, ज्याला आकडे आणि बिजनेस मॉडलच्या कुशल व्यावसायिकांना समजता – समजता वेगळ्याच चिंतेत याल. त्याच वेळी आमची नजर गॉल्हेर मध्ये राहणाऱ्या भूपेंद्र सिंहच्या फेसबुक पोस्टवर पडली. भूपेंद्र पत्रकार होते आणि आता ते पीएसयू मध्ये काम करतात. परंतु या आधी त्यांनी 3 वर्ष ( 2009 – 2012 ) कॅफे कॉफी डे आणि कोस्टा कॉफी मध्ये काम केले होते. भूपेंद्रने प्रस्थावित रुपात पोस्ट शेअर करताना सांगण्याचा प्रयत्न केला की, कसे चमचमता प्रकाश आणि बडेजाव शानदार सोफ्यावर तासनतास कॉफीचे घोट घेत बसणे म्हणजे कंपनीला तोट्यात लोटण्या सारखेच आहे. भूपेंद्र सिंह सांगतात कि, “कॅफे चालवणे सोपे नाही ,त्यात बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रत्येक वर्षी सीसीडी, कोस्टा कॉफी, स्टारबक्स, बरिस्ता यासारखे तोट्यात चालणारे स्टोअर मोठ्या संख्येने बंद होतात. जर तुम्ही सतर्क असाल तर तुम्हाला कळेल की, आपल्या आजूबाजूला असणारे कॅफे शॉप आत्ता त्या ठिकाणी दिसत नाहीत.

कारण 60 टक्के कॉफी स्टोअर सतत तोट्यात चालतात. कॉफीची किंमत भलेही 15 ते 20 रुपये असेल पण इतर खर्च पाहून म्हणजेच कॉफी शॉप मधील लायटिंग, नोकरदार वर्ग आणि इतर खर्च एकत्र केला तर कॉफी 130 रुपये किंवा 200 रुपये असेल तरी कमीच आहे. मी माझ्या जीवनातील 3 पेक्षा जास्त वर्ष सीसीडी आणि कोस्टा मध्ये घालवलेत. माझा स्टोर जिथे मी काम करीत होतो तो सतत तोट्यातच राहिला. कारण दुकान भाडे, लाईट बील कामगारांचे पगार या सर्वांचा बील एव्हढा असायचा की महिनाभरची विक्री कमी व्हायची आणि त्या मालकाचा खर्च जास्त व्हायचा. राजीव चौक आणि जास्त गर्दीच्या जागा सोडल्या तर कॅफे मध्ये क्वचितच एखाद दुसरा गिराईक यायचा. असे स्टोअर 100 टक्के तोट्यात चालत असतात.”

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *