या गावाची लोकसंख्या 1922 मधे 1700 होती आणि आजही तेवढीच आहे. या गावात दोन पेक्षा जास्त मुले नाहीत, इथे मुलगा मुलगी असा भेदभाव करत नाहीत. त्यामुळे या गावाची लोकसंख्या वाढली नाही. समजा आपल्याला कोणी सांगितले की, एका गावची लोकसंख्या 97 वर्षांपासून स्थिर आहे. तर हे एक कोडं आहे, असे आपल्याला वाटेल आणि ते साहजिकच आहे. पण हे सत्य आहे. मध्यप्रदेश मधील बौतूल जिल्यातील धानोरा असे गाव आहे, ज्याची लोकसंख्या सन 1922 साली 1700 होती आणि आजही 1700 आहे. इथे कोणत्याही कुटूंबात दोन पेक्षा जास्त मुले नाहीत. कारण इथे लिंग भेद केला जात नाही. त्या कारणाने या गावाची लोकसंख्या आजही तेवढीच आहे जेवढी 97 वर्षा पूर्वी होती.
जगात अडचणीचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या, कारण प्रत्येक देश – प्रदेशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे खूप अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. परंतु बौतूल मधील धानोरा गाव याला अपवाद आहे. हे गाव कुटुंब नियोजनच्या क्षेत्रात ब्रॅण्ड एबॅसिटर आहे, कारण इथे लोकसंख्या वाढत नाही. धानोरा गावाची लोकसंख्या मागील 97 वर्षापासून वाढली नाही याचीही एक रोचक कथा आहे. एस. के. बहोबिया सांगतात कि, येथे सन 1922 मधे काँग्रेसचे एक संमेलन झाले होते. त्या संमेलनात कस्तुरबा गांधी आल्या होत्या. त्यांनी गावातील लोकांना ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब ‘असा मंत्र सांगितला होता. मी मंत्र एवढ्या साठीच म्हणतोय जर एखाद्या ब्रीद वाक्यामुळे चांगले होत असेल तर त्या ब्रीद वाक्याला मंत्रच म्हणावे लागेल. कस्तुरबा गांधींचे म्हणणे गाववाल्यानी काळ्या दगडावरची रेष मानली आणि नंतर गावामध्ये कुटुंब नियोजनाचे काम चालू झाले.
जुन्या लोकांचे म्हणणे आहे की, कस्तुरबा गांधींचा संदेश गाववाल्यांच्या मनावर आणि डोक्यात असे बसले आहे. 1922 साला नंतर त्या गावात कुटुंब नियोजन म्हणजे काळाची गरज असे समजून ते जागरूक झाले. एक किंवा दोन मुलांवर कुटुंब नियोजन केले. हळूहळू गावाची लोकसंख्या स्थिर झाली.आपले कुटुंब वाढवण्याची इच्छा नष्ट केली, आणि एक किंवा दोन मुलां वर कुटुंब नियोजन सुरु झाले. मग त्या दोन मुली असल्या तरीही. कुटुंब नियोजनच्या गोष्टीत हा गाव एक मॉडल बनला. मुलगा असो की मुलगी दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन, इथे मुलगा -मुलगी असा फरक बघायला मिळत नाही. गावातील रहिवासी सांगतात अजूबाजूच्या गावांची लोकसंख्या 50 वर्षापूर्वी जेवढी होती त्यापेक्षा चार ते पाच पटीने वाढली आहे. परंतु धानोरा गावाची लोकसंख्या 1700 एवढीच आहे. गावचे पुढारी सांगतात की, गावातील कोणावर नियोजनासाठी जबरदस्ती करावी नाही लागली, ते स्वतःच या विषयी जागरूक आहेत. अशा या गावातील जनतेला माझे शतषः प्रणाम.