Breaking News
Home / मराठी तडका / अलका कुबल ह्यांची मुलगी आहे खूपच सुंदर, काम पाहून अभिमान वाटेल

अलका कुबल ह्यांची मुलगी आहे खूपच सुंदर, काम पाहून अभिमान वाटेल

एक काळ असा होता कि मुलींना मोजकेच शिकवले जायचे. त्यांचे जीवन चूल आणि मूल फक्त इथपर्यंत मर्यादित असायचे. परंतु आजच्या काळात मुली देखील मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्या मुलांच्या बरोबरीने काम करून आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आज आपण अश्याच एका मराठी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्रीच्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत. ‘माहेरची साडी’ फेम अलका कुबल मराठी चित्रपटसृष्टीतल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांचे लग्न प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये ह्यांच्याशी झाले. त्यांना दोन मुली असून ईशानी हे मोठ्या मुलीचे आणि कस्तुरी हे लहान मुलीचे नाव आहे. आजच्या लेखात आपण अलका कुबल ह्यांची मोठी मुलगी ईशानी आठल्ये हिच्या बद्दल जाणून घेणार आहोत. घरात चित्रपटांचा वारसा असून देखील चित्रपसृष्टीचे क्षेत्र न निवडता ईशानीने आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले आणि त्यात उंच भरारीदेखील घेतली आहे. तर तिचे आईवडील ह्यांनी देखील तिला ह्यासाठी पाठिंबा दिला होता.

लहानपणापासूनच ईशानीला विमानाची आवड होती. तिला शाळेत असताना सातवी आठवीपासूनच वैमानिक व्हावे असे वाटत होते. दहावी बारावीच्या वेळी तिच्या आई वडिलांनी ईशानीला इतर क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे का असे विचारले होते. परंतु ईशानी आपल्या निर्णयावर ठाम होती. आईवडिलांनी देखील तिला कोणती जबरदस्ती केली नाही. तिला तिच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. आपली आवड सत्यात उतरवण्यासाठी ईशानीने वैमानिकाचे शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. तिची हि मेहनत फळाला येऊन तिला व्यावसायिक विमान चालवण्याचे लायसन्स देखील मिळाले आहे. म्हणजेच ईशानी आता विमानाची पायलट होऊ शकते. ईशानीने काही वर्षांपूर्वीच म्हणजे २०१५ मध्येच अमेरिकेत अधिकृत लायसन्स मिळवले होते. परंतु तिला भारतात यायचे होते. त्यामुळे तिने इथे आल्यावर अनेक परीक्षा दिल्या आणि भारतातही लायसन्स मिळवले. मुलीच्या ह्या कामगिरीवर तिचे आईवडील खूप खुश आहेत.

ईशानी सध्या मियामी, फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. तिची लग्नगाठ लवकरच दिल्लीच्या निशांत वालियाशी बांधली जाणार आहे. ह्या वर्षी जानेवारी २०२० मध्येच तिची रोका सेरेमनी पार पडली होती. निशांत मूळचा दिल्लीचा असून तो देखील मियामीमध्येच राहतो. अलका कुबल ह्यांनाही वाटत होते कि माझ्या मुलीने चित्रपटाव्यतिरिक्त वेगळे करिअर निवडावे. त्यामुळे त्यादेखील खूप खुश आहेत. त्यांची दुसरी मुलगी देखील फिलिपाईन्सला एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करत आहे. तिला ड्रमिंटोलॉजिस्ट बनायचे आहे. दोघींनीही असे करिअर निवडले ज्याचा त्यांचा आईवडिलांच्या व्यवसायाशी काहीच संबंध नाही. त्यामुळे अलका कुबल म्हणतात कि, ” मला स्वतःला वेगळे काहीतरी करण्याची इच्छा होती, परंतु परिस्थितीमुळे काहीच करता आले नाही. आमच्या मुलींनी असे क्षेत्र निवडले ज्या क्षेत्राशी आमचा काहीच संबंध नाही. त्यामुळे आम्ही पाठिंबा देण्याव्यतिरिक्त काहीच करू शकलो नाहीत. त्या दोघीही स्वतःच्या मेहनतीवर पुढे जात आहेत.”

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.