Breaking News
Home / बॉलीवुड / ह्या ५ कपल्सच्या वयांमध्ये आहे भरपूर अंतर, ५ व्या जोडीमध्ये तर २५ वर्षाचे अंतर

ह्या ५ कपल्सच्या वयांमध्ये आहे भरपूर अंतर, ५ व्या जोडीमध्ये तर २५ वर्षाचे अंतर

बॉलिवूडच्या जगमगीत दुनियेत कलाकारांसोबत त्यांच्या साथीदारालाही आपोआप महत्व प्राप्त होते. बॉलिवूडचे कपल्स खासकरून जास्त चर्चेत असतात. बॉलिवूडच्या अशा काही जोड्या आहेत, ज्या आपल्या साथीदारामुळे चर्चेत आल्या आहेत. त्याचबरोबर असे काही अभिनेते आहेत, जे एकदा काडीमोड झाल्यानंतर दोन ते तीन लग्न केल्या कारणाने चर्चेत आहेत. एवढेच नव्हे तर, काही कलाकारांनी स्वतःपेक्षा खूप छोट्या वयाच्या मुलींसोबत लग्न केले आहे. आज आम्ही आपल्याला अशा काही जोड्यांची ओळख करून देणार आहोत, ज्यांनी आपल्या वायापेक्षा खूप लहान मुलींसोबत लग्न केले.

1. सैफ अली खान आणि करीना कपूर
बॉलिवूड मधील सर्वात सुंदर जोडीच्या यादीत सैफ अली खान – करीना कपूर खान यांची जोडी अव्वल स्थानावर आहे. त्यांच्या वयात एक किंवा दोन नव्हे तर, तब्बल 10 वर्षांचे अंतर आहे. त्या दोघांनी एकमेकांसाठी पळून जावुन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

2. दिलीप कुमार आणि सायरा बानो
बॉलिवूडच्या सगळ्या रोमँटिक जोडींपैकी एक जोडी दिलीप कुमार आणि सायरा बानोची जोडी प्रत्येकाला एक आदर्श आहे. परंतु आपण हे जाणुन हैराण व्हाल कि, या जोडीमधे 22 वर्षाचे अंतर आहे. दिलीप कुमारने लग्न केले त्यावेळी त्यांचे वय 44 वर्षे तर सायरा बानोचे वय 22 वर्षे होते. परंतु या दोघांमधील प्रेम आपल्याला सतत कोणत्याही कार्यक्रमात बघायला मिळते.

3. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत
बॉलिवूडमधील क्युट जोडप्यांच्या यादीत शाहिद आणि मिराचे नाव येते. या जोडीमधे 13 वर्षाचे अंतर आहे. या जोडप्याबद्दल खास गोष्ट अशी की, त्यांचे लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज झाल होतेे.

4. मान्यता दत्त आणि संजय दत्त
मान्यता दत्त आणि संजय दत्त यांच्या वयात 20 वर्षाचे अंतर आहे. भलेही दोघांच्या वयात जास्त अंतर असेल, पण दोघांमधील प्रेमाला शेवट नाही. मान्यता दत्तने 20 वर्ष जास्त वय असलेल्या संजय दत्त बरोबर लग्न केले. पण लग्नाला 10 वर्ष उलटूनसुद्धा दोघांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडी म्हणून संबोधली जाते.

5. मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर
बॉलिवूड अभिनेता आणि मॉडल मिलिंद सोमण यांनी मागील वर्षी स्वतःपेक्षा 27 वर्षांनी लहान असेलेल्या मुली सोबत लग्न केले. आपल्या फिटनेससाठी सतत चर्चेत असलेले मिलिंद खूप वेळेपासून अंकिता कंवरला डेट वर घेऊन जायचे. त्यानंतर शेवटी त्यादोघांनी एकमेकांशी लग्न केले. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, 52 वर्षीय मिलिंदने आणि 27 वर्षीय अंकिता कंवर सोबत लग्न केले होते. त्यांच्या वयामध्ये तब्बल २५ वर्षांचा फरक आहे.

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.