बॉलिवूड कलाकारांना जीवनात चढ उतार सहन करावे लागतात. त्यांच्या आयुष्यात केव्हा काय होईल सांगता येणार नाही. इथे अचानक कोणी स्टार लग्न करायला तयार होतो तर कोणाच्या घटस्फोटाची बातमी येऊन कानावर ठेपते. इथे काही ठराविक नसते. इथे आल्या दिवशी नाते बनताना आणि बिघडताना दिसतात. इथे कोणी मुलीच्या वयाच्या मुली सोबत लग्न करतो तर कोणी आपल्या पेक्षा १० वर्ष छोट्या वयाच्या मुलांना आपला सहचारी(पती) बनवतात. बॉलिवूड प्रसिद्ध सुद्धा याच कारणाने आहे.
बॉलिवूड मधे पाहिले तर घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. तर काही लोकं लग्नाच्या एवढ्या वर्षा नंतर ही आपले नाते प्रेमाने निभावत आहेत. घटस्फोटाने सध्या लोकांच्या जीवनात वादळ येतो. पण आजच्या या पोस्ट मधे आम्ही तुम्हाला अशा सुंदरींविषयी सांगणार आहोत ज्या आपल्या पती पासून घटस्फोट घेऊन सुखाने आपले आयुष्य जगत आहेत.
करिश्मा कपूर
करिश्मा कपूरचा संजय कपूर सोबत २०१६ ला घटस्फोट झाला. करिश्मा ने २००३ मधे दिल्लीचे उद्योगपती संजय कपूर बरोबर विवाह केला. पण त्यांचे नाते जास्त टिकले नाही आणि २०१२ ला ते दोघे वेगळे झाले. आत्ता अशा बातम्या येत आहेत की करिश्मा पुनः लग्न करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहिती नुसार करिश्मा संदीप तोषनिवाल ला डेट करते आहे आणि कदाचित लवकरच ती विवाह बंधनात अडकू शकते.
सुजैन खान
ह्रितिक रोशन आणि सुजैनच्या घटस्फोटाची बातमी यैकून प्रत्येक जण हैराण झाला होता. दोघांचा विवाह २००० मधे झाला आणि २०१४ मधे घटस्फोट झाला. १४ वर्ष एकत्र राहिल्या नंतर दोघे का वेगळे झाले हे काही स्पष्ट झाले नाही. सुजैनला घटस्फोट घेऊन ५ वर्ष झाली आणि ती आनंदी व सुखी जीवन जगत आहे.
पूजा भट्ट
पूजा भट्ट दिग्दर्शक महेश भट्ट ची मुलगी आणि आलिया भट्ट ची मोठी बहीण आहे. ऍक्टींगच्या दुनियेत नाव कमावलेल्या पूजाने आपल्या पर्सनल लाईफ मधे खूप चढउतार पाहिले आहेत. पूजाचा विवाह साल २००३ मधे मनीष मखिजा सोबत झाला. पण लग्नाच्या ११ वर्षा नंतर दोघांनी घटस्फोट घेतला. आज पूजा एकटीच आहे आणि आपली लाईफ स्वतःच्या मर्जी नुसार जगते.
मनीषा कोईराला
मनीषा कोईरालाचे नाव ऐकून आपल्या मनात एक निरागस आणि खोडकर मुलगी अशी प्रतिमा तयार होते. तिच्या सारखी देखणी कोणीच नाही. आजही ती तेवढीच सुंदर दिसते जेवढी १० वर्षे अगोदर दिसायची. मनीषा साल २०१० मधे उद्योगपती सम्राट दहाल सोबत विवाह बंधनात अडकली. परंतु हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही आणि ते दोघे वेगळे झाले. आज कॅन्सर सारख्या मोठ्या आजारातून बाहेर पडल्या नंतर आपलं आयुष्य एकटीने जगते.
ममता कुलकर्णी
एका जमान्यात ममता कुलकर्णी चे नाव बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रीं मधे समाविष्ट होतो. पण माफिया विकी गोस्वामी बरोबर लग्न झाल्या नंतर ती बॉलिवूड पासून लांब राहिली. आत्ता ड्रग्स च्या अवैद्य धंद्या मुळे विकी गोस्वामी जेल मधे आहे. आणि ममता एकटीच साध्वी बनून आपले आयुष्य जगते.