Breaking News
Home / बॉलीवुड / मला नोकरानी बनवा पण तुमच्याच घरी ठेवा, अमिताभच्या चाहतीचा किस्सा नक्की वाचा

मला नोकरानी बनवा पण तुमच्याच घरी ठेवा, अमिताभच्या चाहतीचा किस्सा नक्की वाचा

आपल्या चाहत्या स्टारसाठी चाहत्यांचा वेडेपणा ही कोणती नवीन गोष्ट नाहीये. परंतु कित्येकदा काही असे किस्से समोर येतात की, हसूच आवरत नाही. असं वाटतं की ‘काय बावळट माणूस आहे’. काही वेळा मुखातून ‘वाव’ सुद्धा येतं. काही वेळा असं ही वाटतं की ‘भावा काय वेडेपणा आहे’ . काही गोष्टी भावुक ही करून जातात. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काही मजेदार किस्से घेऊन आलो आहोत.

18 दिवस 900 किमी चालून अक्षय ला भेटायला एक चाहता पोहोचला. ही गोष्ट चकित तर करतचे, परंतु बॉलिवूड मधील चाहत्यांचे इतर किस्से असे आहेत की, हा किस्सा त्यापुढे खूप छोटा वाटू लागतो. 22-24 वर्षांचा एक मुलगा गुजरातच्या व्दारका वरून चालत मुंबईला पोहोचला. फक्त आक्षय कुमारला भेटण्यासाठी. त्या मुलाचं नाव आहे पर्वत. हा मुलगा अक्षय कुमारचा इतका मोठा चाहता आहे की, अक्षयला भेटायला व्दारका ते मुंबई मधील 900 किमी चा रस्ता चालत पार केला. मुंबई ला पोहोचायला त्याला पूर्ण 18 दिवस लागले. तेव्हा कुठे जाऊन त्याचं त्याच्या स्टार ला भेटायचं स्वप्न पूर्ण झालं. अक्षय ने त्या मुलासोबतचा एक फोटो देखील शेयर केला आहे.

जेव्हा चाहत्याचा वेडेपणा पाहून खुद्द अमिताभ बच्चन ने धरले पाय. ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा अमिताभ बच्चन ला ‘कुली’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी इजा झाली होती. ती इजा इतकी गंभीर होती की, अमिताभ बच्चन जीवन आणि मरणाला झुंज देत होते. अमिताभ चा जीव वाचवण्यासाठी चाहत्यांनी रक्तदान सुद्धा केले. तेव्हा त्यांच्या एका चाहत्याने एक अनोखा नवस केला. जर अमिताभ बच्चन बरे झाले तर वडोदरा च्या सिद्धिविनायक मंदिरा पासून उलटा चालत मुंबई च्या सिद्धिविनायक मंदिरा पर्यंत ची यात्रा करेन . जसे अमिताभ बच्चन च्या तब्येतीत सुधारणा झाली तो उलट्या पावली नवस फेडण्यासाठी निघाला . ही यात्रा 800किमी ची होती. याला पूर्ण करण्यासाठी त्याला 13 दिवस लागले. फैन मंदिरा वरून अमिताभ चा बंगला ‘प्रतिक्षा’ वर पोहोचला . हिच ती वेळ जेव्हा अमिताभ सर्वांधीक भावूक झाले. चाहत्याच त्यांच्या प्रति इतकं प्रेम पाहून ते इतके भावूक झाले की त्यांनी त्याचे पाय धरले . परंतु त्या चाहत्याने अमिताभ बच्चन यांना आपले पाय धरू दिले नाही. अमिताभ अजून ही त्या चाहत्याच्या संपर्कात आहेत. अमिताभ बच्चन यांनी ही आठवण फेसबुक वर शेअर केली होती.

सलमानसाठी अन्न-पाणी सोडलं होतं. असाच एक किस्सा झाला सलमान खान सोबत. ही गोष्ट त्या वेळेसची आहे, जेव्हा ‘हिट एंड रन’ केसचा निर्णय येणार होता. बिहार च्या राजधानी मधे राहणा-या दोन बहिणी सबा आणि फराह शकील यांनी अन्न पाणी बंद केले होते. 3 दिवस त्यांनी न खाता पिता सलमान साठी प्रार्थना केली. या दोघींचं डोकं एकमेकांना जुडलेले आहे व त्यांनी सलमान ला भाऊ मानलेले. सलमान ला जेव्हा जामीन मिळाला तेव्हा त्या खूप खुश होत्या. या गोष्टी ची खबर सलमान ला लागली व त्याने दोघींना घरी बोलावले आणि पुर्ण दिवस त्यांच्या सोबत घालवला.

अक्षय कुमार माझा हरवलेला बॉयफ्रेंड आहे. अक्षय कुमार संबंधित अजून एक किस्सा आहे. एकदा एक तरुणी, अक्षय कुमारला भेटण्यासाठी तीन दिवसापर्यंत त्याच्या घराच्या समोरच बसून राहिली. तीन दिवसानंतर सिक्युरिटी गार्ड ने अक्षयला त्या मुलीबद्दल सांगितले. दिसायला ती मुलगी चांगल्या श्रीमंत घरातली वाटत होती. अक्षयने हा विचार केला कि गोष्ट बिघडू नये म्हणून त्या तरुणीला घराच्या आत बोलावले. त्याला वाटत होतं कुणी फॅन असेल, ऑटोग्राफ घेईल, हाथ मिळवेल आणि निघून जाईल. परंतु त्या मुलीने वेडेपणाचा कहरच केला. ती तरुणी अक्षयला आपला हरवलेला बॉयफ्रेंड सांगू लागली. आणि लग्न नाही केल्यास जीव देण्याची धमकी देऊ लागली. अक्षय टेन्शन मध्ये आला. पण त्याने चलाखीने त्या तरुणीकडून तिच्या घरातल्यांचा नंबर घेतला. आणि त्या तरुणीबद्दल माहिती दिली. तरुणीचे घरातले जेव्हा अक्षयच्या घरी पोहोचले तेव्हा कुठे जाऊन हा मामला मिटला.

नोकरानी बनवून तरी ठेवा. अमिताभ बच्चन ह्यांचा अजून एक किस्सा आहे. हि गोष्ट अमिताभ ह्यांच्या ‘जलसा’ बंगल्याच्या समोरची आहे. एक बाई आपल्या मुलीला घेऊन अमिताभ बच्चन ह्यांच्या घराच्या समोर आली, पूर्ण ड्रॅमा सुरु झाला. ती बाईला अमिताभ बच्चन ह्यांच्याशी कोणत्याही परिस्थिती भेटायचे होते. ती आपल्या फेव्हरेट ऍक्टरला रिक्वेस्ट करत होती कि कसेही करून अमिताभने तिला त्याच्या इथे ठेवावे. तिला नोकरानी सारखे ठेवले तरी चालेल. ती बाई इतक्या पर्यंत नाही थांबली, ती हि सुद्धा देऊ लागली कि जर तिला तेथून हाकलले तर ती जीव देईल. तिला समजावण्यात अमिताभ बच्चन ह्यांच्या सिक्युरिटी गार्ड्सना अनेक दिवस लागले. तेव्हा कुठे ती गप्प बसली. परंतु एका अटीवर, ती अमिताभला पत्र लिहत जाईल.

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *