आपण मराठी गप्पावरून नेहमी मनोरंजनाच्या बातम्या जास्त पाहतो, वाचतो. त्यात गेला काही काळ आमच्या टीमने वायरल व्हिडियोज विषयी लिहिलं असल्यामुळे त्या मनोरंजनात भर पडते. आम्ही ह्या अगोदर बहुतेक व्हिडीओज हे मनोरंजनपर हेतू शेअर केले आहेत. त्यातून तुम्हा वाचकांचे निखळ मनोरंजन व्हावे, हाच आमच्या टीमचा प्रामाणिक हेतू असतो. पण याच दरम्यान एक वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस पडला. तो पाहिला आणि क्षणभर आपली दु’ख्खं आपण किती मोठी समजतो, हे क्षणात जाणवलं. तसंच दुः’ख्ख येतात, पण त्यातही झुं’जत राहायचं हे ही यानिमित्ताने कळलं. आयुष्यात प्रत्येकालाच वाटतं कि आपलं दुः’ख खूप आहे, जगात आपल्यापेक्षा जास्त दुः’ख कोणालाच नाही. परंतु तुम्ही स्वतः आजूबाजूला पाहाल तर कळेल कि आपण खरंच खूप नशीबवान आहोत. कारण आपली तरी काही स्वप्ने आहेत. परंतु काही लोकं अशीही आहेत कि त्यांना आजच्या दिवशी पो’टासाठी अ’न्न तरी मिळेल कि नाही, ह्या प्रश्नाचे उत्तर नसते. परंतु ते हिंमत ह’रत नाहीत, परि’स्थितीशी दोन हात करण्यास सज्ज असतात. परिस्थि’तीच त्यांना जगायला शिकवते.
आज अश्याच प’रिस्थितीशी सामना करत असलेल्या मुलीचा व्हिडीओ आपण पाहणार आहोत. हा व्हिडीओ आहे एका स्त्रीने तयार केलेला. त्या अनामिक स्त्रीचं नाव आम्हाला माहिती नाही, पण त्यांनी जे वास्तव यानिमित्ताने समोर आणलं आहे, ते पाहून आणि ऐकून निःशब्द व्हायला होतं. यात ह्या स्त्रीने रस्त्यावरच्या एका मुलीची विचारपूस केली आणि त्यातून तिच्या आयुष्यातल्या काही घटनांचा खुलासा झाला. ही मुलगी म्हणजे रिद्धी. ती आणि तिची बहीण रस्त्यावर मेथी वि’कत होत्या. ज्यांनी हा व्हिडीओ काढला त्यांना मेथी वि’कायला ती आली. तेव्हा त्यांनी तिची विचारपूस झाली. तेव्हा कळलं की तिचे शे’त क’री वडील हयात नाहीत. आई घरी धु’णीभांडी करते. शे’त असलं तरीही शे’तात जे पिकतं, ते वि’कण्यासाठी रिद्धी आणि तिच्या बहिणीला जावं लागतं. या दरम्यान तिला कोणी भाऊ नाही का, म्हणून विचारणा होते. तर नाही असं उत्तर येतं आणि तिच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी ती म्हणजे मुलगा आहे, असं सांगून जास्त पै’से घेतल्याचे ती सांगते. यातील सत्य असत्य हे माहिती नाही. पण जे सांगितलं ते खरं असल्यास तिची एकूण आर्थिक प’रिस्थिती चिं’ताजनक वाटते.
गाडीत बसलेल्या त्या दोन्ही स्त्रियांनाही तिची कहाणी ऐकून राहवत नाही. त्या तिच्याकडून मेथी वि’कतही घेतात आणि तिच्या आईशी बोलण्याची इच्छा ही व्यक्त करतात आणि व्हिडियो संपतो. पण हा व्हिडीओ एक मात्र शिकवून जातो, की परिस्थि’ती कशीही असो, खचून जायचं नाही. रिद्धी आणि तिच्या बहिणीवर आलेली वेळ, तरीही काम करण्याची तयारी आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते. त्या दोघींना आणि त्यांच्या कुटुंबाची आ’र्थिक परिस्थिती लवकरच सुधारो ही मराठी गप्पाच्या टीमची मनापासून इच्छा ! आम्ही हा व्हडिओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या. आणि एक मात्र नक्की, प’रिस्थिती कशीही असो, त्या परिस्थि’तीशी सामना करण्यासाठी नेहमी तयार राहा. आज ना उद्या वेळ नक्की बदलेल, परंतु जीवनात कधीच हार मानू नका.