Breaking News
Home / बॉलीवुड / बॉलिवूडच्या ह्या लोकप्रिय ऍक्टरने व्हिलचेअरवरून येताना एअरपोर्टवर स्वतःचा चेहरा लपवला

बॉलिवूडच्या ह्या लोकप्रिय ऍक्टरने व्हिलचेअरवरून येताना एअरपोर्टवर स्वतःचा चेहरा लपवला

दोन दिवसाअगदोरच बॉलिवूडच्या उत्तम कलाकारांपैकी एक मानले जाणारा इरफान खानला मुंबई एअरपोर्टवर चेहरा लपवून जाताना पाहिले गेले. सोशिअल मीडियावर वायरल होणाऱ्या ह्या फोटोंमध्ये व्हीलचेअर वर बसलेला इरफान खान काळ्या रंगाचे जॅकेट, डेनिम आणि सफेद रंगाच्या स्नीकर्स मध्ये दिसत आहे. सोबतच त्याने निळ्या रंगाची टोपी घातली आहे. इरफानचे हे फोटोज पाहून सर्वच जण हैराण आहेत आणि हे जाणण्यासाठी उत्सुक आहेत कि इरफानने असं कश्यासाठी केलं आहे. इरफानला अश्याप्रकारे येताना पाहून त्याच्या फॅन्सना पुन्हा त्याच्या प्रकृतीबद्दल काळजी वाटू लागली होती. इरफानचे ह्या परिस्थितीतले फोटो पाहून चिंतेत असलेले त्याचे फॅन्स त्याच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करत होते.

परंतु आता हि गोष्ट स्पष्ट झाली आहे कि इरफान ला व्हिलचेअर वर का आणले होते. इरफानच्या प्रवक्ता ने हि गोष्ट स्पष्ट करताना सांगितले कि, “अंग्रेजी मिडीयम चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर इरफानवर एक यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्याला आपल्या घराची खूप आठवण येत होती आणि आता तो मुंबईत आला आहे. आम्ही मीडियाला रिक्वेस्ट करत आहेत कि कोणताही वेगळा अंदाज लावू नका आणि ज्यांनी सपोर्ट केले त्या सर्वांचे मनापासून आभार.” तुमच्या माहितीसाठी, गेल्या वर्षीच इरफान खानने आपल्या फॅन्सना सांगितले होते कि त्याला न्यूरोण्डोक्राइन ट्युमर आहे जो एक दुर्मिळ प्रकारचा कँसर आहे. आणि ह्यानंतर इरफान जवळजवळ वर्षभर लंडनमध्ये ह्यावर इलाज करत आहे. आपल्या आजारामुळे इरफान गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून गायब आहे. त्याचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट ‘कारवां’ आहे.

त्यानंतर इरफानने आपल्या आगामी चित्रपट ‘अंग्रेजी मिडीयम’ ह्या चित्रपटाच्या शूटिंगच्या कामाला सुरुवात केली होती. चित्रपटाची शूटिंग लंडन मध्येच होती त्यामुळे त्याला प्रवासाबद्दल जास्त त्रास झाला नाही. शूटिंग लंडन मध्ये असल्यामुळे त्याला आपल्या डॉक्टरांसोबत त्वरित संपर्क साधण्यास सोपे होत होते. आणि त्याच्यावर लंडन मध्ये उपचार झाल्यामुळे तेथे शूटिंग करणे त्याला खूप सोयीस्कर होते. त्याला डॉक्टर आणि वेगवेगळ्या सुविधा सहज मिळत होत्या. ह्याव्यतिरिक्त ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाची टीम सुद्धा सेटवर त्याची विशेष काळजी घेत होती. शुटिंगचे शेड्युलसुद्धा त्याच्या सोयीस्कर आखले होते. वर्षभर लंडन मध्ये उपचार केल्यानंतर तो भारतात परतला होता. अंग्रेजी मिडीयम हा सुपरहिट ‘हिंदी मिडीयम’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर आणि राधिका मदान दिसणार आहेत.

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *